पुरस्कार मिळाला म्हणून काहीही! वाचा, कंगनाची स्वातंत्र्याची नवी परिभाषा

बॅालिवूडची क्वीन अभिनेत्री कंगना रणौत तिच्या अभिनयासाठी कमी आणि तिच्या वादग्रस्त विधानासाठी जास्त ओळखली जाते. आता पुन्हा एकदा कंगनाने वादग्रस्त भाष्य केलं आहे.  राष्ट्रपती भवनात नुकत्याच पार पडलेल्या सोहळ्यात तिला भारत सरकारकडून पद्मश्री पुरस्कार प्रधान करण्यात आला. या पुरस्कारानंतर तीने टाइम्स नाऊला दिलेल्या मुलाखतीत भारताला 1947 ला जे स्वातंत्र्य मिळाले ते स्वातंत्र्य नसून भारताला भीक देण्यात आली होती. देशाला खरे स्वातंत्र्य 2014 ला मिळाले आहे. असे वादग्रस्त विधान केले आहे. त्यामुळे आता कंगनावर सर्वच स्तरावरुन टीका करण्यात येत आहे.

काय म्हणाली कंगना

देशात जेव्हा काँग्रेसचं सरकार होतं, तेव्हा मला 2 राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. मी राष्ट्रवादाच्या मुद्द्यावर चर्चा करते, सैन्य दलाबद्दल बोलते किंवा आपल्या संस्कृतीला प्रमोट करण्याचं काम करते, तेव्हा मला भाजपसोबत जोडलं जातं. पण, हे मुद्दे भाजपचे कसे काय होऊ शकतात, ते तर देशाचे मुद्दे आहेत, असे कंगनाने टाइम्स नाऊला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. कंगनाने या मुलाखतीदरम्यान आणखी एक वादग्रस्त विधान केलं आहे. आपल्याला जे स्वातंत्र्य मिळाले ते भीक होती, देशाला खरं स्वातंत्र्य 2014 मध्येच मिळालं, असं कंगनाने म्हटलं आहे.

(हेही वाचा :‘वीर सावरकरां’चा विसर; नाशिककर आक्रमक)

वरुण गांधीनी व्यक्त केला संताप

वरुण गांधी यांनी कंगनाविरुद्ध संताप व्यक्त केला आहे. कधी महात्मा गांधीजींचा त्याग आणि तपस्याचा अपमान, कधी त्यांच्या हत्याऱ्याचा सन्मान, आणि आता शहीद मंगल पांडेंपासून ते राणी लक्ष्मीबाई, भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, नेताजी सुभाषचंद्र बोस आणि लाखो स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाचा तिरस्कार. या विचारधारेला मी वेडेपणा म्हणू की देशद्रोह? अशा शब्दात वरुण गांधी यांनी कंगनाविरुद्ध संताप व्यक्त केला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here