अमेरिकेत बसून भारतीय जनता पक्षावर आगपाखड करणारे काँग्रेस नेते राहुल गांधी यांना प्रत्युत्तर देण्याची जबाबदारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खासदारांनी आपल्या खांद्यावर घेतली आहे. भाजपवर आरोप करण्यापूर्वी आपण आपल्या भूतकाळात डोकावून पहा, असा सल्ला राहुल गांधी यांना दिला आहे.
सविस्तर वृत्त असे की, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अमेरिकेत बसून भाजपवर हल्ला केल्यामुळे सत्ताधारी पक्षाच्या खासदारांच्या तळपायातील आग मस्तकात गेली आहे. खासदार पूनम महाजन, खा. कर्नल राज्यवर्धन सिंग राठोड आणि प्रवेश साहिब सिंग यांनी राहुल गांधी यांना पत्र लिहून आपला भूतकाळ आठवण्याचा सल्ला दिला आहे. तिन्ही नेत्यांनी लिहिलेल्या संयुक्त पत्रात इंदिरा गांधी यांनी २८ मार्च १९८२ रोजी रात्री ११ वाजता धाकटी सून मनेका गांधी यांना घराबाहेर कसे फेकले होते याची आठवण करून दिली. तेव्हा वरूण गांधी तापाने फणफणत होते, असे लिहिले आहे.
‘प्रेम की द्वेषाचा मेगा मॉल’ अशा आशयाच पत्र भाजपच्या खासदारांनी लिहिले आहे. यात काँग्रेसच्या राजवटीत सर्वाधिक दंगली झाल्या आणि द्वेषाची दुकाने कशी चालविली जात होती याचा उल्लेख केला आहे. नेहरू-गांधी घराण्याने काँग्रेस नेत्यांशी कसे गैरवर्तन केले. आपल्याच नातेवाईकांना कसली अमानुष वागणूक दिली आणि देशाच्या महान व्यक्तिमत्त्वांबद्दल तुमच्या (राहुल) कुटुंबातील द्वेष आजही दिसून येतो, असा आरोप त्यांनी केला. या पत्रात अनेक संदर्भ लिहिले गेले आहेत, परंतु सर्वात कठोर हल्ला कौटुंबिक वादांवर केला गेला आहे. ‘रक्ताच्या नात्यातही द्वेष’ असे वर्णन करून पत्रात लिहिले आहे की, ‘तुम्हाला 28 मार्च 1982 ही तारीखही आठवत असेल, जेव्हा तुमच्या आजीने त्यांची धाकटी सून मनेका गांधी यांच्याशी इतकं प्रेम केलं होतं की त्या रात्रभर झोपू शकल्या नव्हत्या.
तेव्हा देशभरातील वर्तमानपत्रांच्या पहिल्या पानावर एकच चित्र होते. त्या चित्रात मेनका गांधी डोळ्यात असहाय्यतेचे अश्रू घेऊन पंतप्रधानांच्या निवासस्थानातून बाहेर जात होत होत्या. लहान मुलगा वरुण तिच्या मांडीवर होता, त्याला त्यावेळी खूप ताप आला होता. इंदिरा गांधी यांनी ड्राइवरला मनेका गांधी म्हणतील तिथे सोडून या, असा आदेश दिला होता.
(हेही वाचा Mukesh Khanna : नसीरुद्दीन शाह यांना मुकेश खन्नांनी सुनावले; म्हणाले, ‘लव्ह जिहाद’च्या टीममध्ये सामील व्हा)
या कौटुंबिक वादाच्या पुढच्या घटनेचा उल्लेख करताना त्यांनी लिहिले की, ‘तुमचा भाऊ वरुण गांधी स्वतः त्यांच्या लग्नाचे आमंत्रण घेऊन 10 जनपथ येथे मोठी आई सोनिया गांधी यांच्या घरी गेला होता. तुम्हाला आठवत असेल की प्रेमसंबंध टिकवण्यासाठी तुम्ही किंवा तुमची आई आणि बहीण या लग्नाला हजर राहिले नव्हते. याउलट वरुण गांधी यांनी प्रियंका गांधींच्या लग्नाला हजेरी लावली होती. तसेच भाजप नेत्यांनी राहुल गांधींना विचारले की, ‘तुम्ही मला सांगा तुमच्या प्रेमाच्या दुकानात तुमचे आजोबा फिरोज गांधी यांना कुठे जागा आहे? तुम्ही इकडे तिकडे किती थडग्यांना भेट देत राहता माहीत नाही, पण फक्त तुमच्या हृदयावर हात ठेवून सांगा की शेवटची वेळ तुम्ही त्यांच्या कबरीवर प्रेमाची फुले घेऊन कधी गेला होता?
- 1948 मध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या हत्येनंतर महाराष्ट्रात हजारो लोक मारले गेले. तेव्हा तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी शांतता आणि सौहार्दाऐवजी प्रक्षोभक भाषण केले.
- 7 नोव्हेंबर 1966 रोजी गोहत्या बंदीच्या मागणीसाठी संसदेबाहेर जमलेल्या संत आणि संतांच्या जमावावर अंदाधुंद गोळ्या झाडण्यात आल्या. हजारो संत मारले गेले.
- 1984 मध्ये इंदिरा गांधींच्या हत्येनंतर शिखांची कत्तल झाली आणि राजीव गांधी म्हणाले होते की, जेव्हा एखादे मोठे झाड पडते तेव्हा पृथ्वी थोडी हलते.
- 15 डिसेंबर 1950 रोजी माजी गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या निधनानंतर पंडित नेहरूंनी तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद, सरकारचे मंत्री आणि अधिकारी यांना अंत्यसंस्काराला न जाण्याची सूचना केली होती.
- डॉ भीमराव आंबेडकरांना राजकारणाच्या मुख्य प्रवाहापासून दूर ठेवण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले.
- काँग्रेसचे तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष सीताराम केसरी यांचा अपमान करून त्यांना पदावरून काढून टाकण्यात आले होते. त्यांना बाथरूममध्ये बंद केले.
- माजी पंतप्रधान नरसिंह राव यांच्या पार्थिवाला एआयसीसीच्या आवारात प्रवेश दिला गेला नाही, असा उल्लेख पत्रात केला आहे.