गणेशोत्सवासाठी मोठ्या संख्येने चाकरमानी कोकणात जातात. त्यामुळे या काळात कोकणात जाणाऱ्या बस तसेच रेल्वेगाड्या फुल्ल असतात. म्हणूनच, भाजपाने गणेशोत्सवासाठी कोकणात १५० बस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे या बसने चाकरमान्यांना मोफत प्रवास करायला मिळणार आहे. त्यासाठी भाजप सुमारे ३५ लाखांपेक्षा जास्त खर्च करणार आहे.
( हेही वाचा : अलर्ट! शुक्रवारी पाणीपुरवठा 8 तासांसाठी राहणार बंद)
मोफत प्रवास
गणपतीत कोकणवासीयांसाठी विशेष बस सोडण्याचा निर्णय मुंबई भाजपने घेतला आहे. गणेशचतुर्थीच्या पूर्वी तीन ते चार दिवस या बस सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांमध्ये धावणार आहेत. या दोन्ही जिल्ह्यांतील प्रत्येक तालुक्यात किती बस सोडाव्यात, याबाबत कोकणातील भाजप नेते आणि मुंबईतील नेत्यांमध्ये चर्चा सुरू आहे. एक बसचे भाडे सुमारे २३ ते २४ हजार रुपये आहे. त्याकरिता सुमारे ३५ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. परंतु चाकरमान्यांना यातून मोफत प्रवास करता येणार आहे. कोकण रेल्वेसह एसटी, खासगी गाड्यांचे आरक्षण फुल असल्यामुळे या विशेष बसचा प्रवाशांना फायदा होणार आहे.
भाजप एक्सप्रेस
कोकणातील चाकरमान्यांसाठी येत्या गणेशोत्सवासाठी दादर येथून थेट कुडाळ, सिंधुदुर्ग पर्यंत विनामूल्य रेल्वे प्रवास नितेश राणेंनी आयोजित केला असून याकरता भाजप एक्सप्रेस (दादर- कुडाळ नॉनस्टॉप ) ही विशेष ट्रेन ३० ऑगस्ट रोजी सुटणार आहे. दादर पूर्व रेल्वे स्टेशनवरून सकाळी १०:३० वाजता सुटेल आणि कुडाळला संध्याकाळी ९:०० वाजता पोहोचेल (सदर ट्रेन मध्ये कुठल्याही स्थानकावर थांबणार नाही)
Join Our WhatsApp Community