Protest : बिल्डरकडून होणाऱ्या त्रासविरोधात कारवाई न केल्याने महापालिका के पूर्व विभाग कार्यालयाबाहेर भाजपाचे आंदोलन

96
Protest : बिल्डरकडून होणाऱ्या त्रासविरोधात कारवाई न केल्याने महापालिका के पूर्व विभाग कार्यालयाबाहेर भाजपाचे आंदोलन
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई 

विलेपार्ले पूर्व येथील अंतिम भूखंड क्रमांक १८७, नगर योजना क्रमांक पाच या भूखंडावरील सतत होत असलेल्या अनधिकृत ताबा बाबत कडक कारवाई करण्यासाठी वेळोवेळी मागणी होत असूनही महानगरपालिकेकडून कोणतीच कारवाई केली जात नाही. त्यामुळे या विरोधात के पूर्व विभाग कार्यालयाबाहेर स्थानिक रहिवाशांनी आंदोलन (Protest) केले. विलेपार्ले विधानसभेचे भाजपा आमदार पराग अळवणी यांच्या नेतृत्वाखाली रहिवाशांनी हे आंदोलन केले.

हा भूखंड हा महानगरपालिकेच्या मालकीचा आहे. मात्र, महानगरपालिकेने परवानगी किंवा ना – हरकत प्रमाणपत्र दिलेले नसतानाही विकासकाने भूखंडाचा कब्जा घेतला आहे. या ठिकाणी विकासकांनी महिला व पुरुष बाऊंसर ठेवले असून तसेच विकासकाच्या विरोधात असलेल्या रहिवाशांना जाणीवपूर्वक त्रास देत आहेत. या संपूर्ण भूखंडाभोवती पत्रे लावून हवा व उजेड अडवला असून रहिवाहांची गैरसोय होते आहे. भूखंडावर कार्यालय थाटून तेथून सर्व भूखंडावर आपले नियंत्रण ठेवले आहे. (Protest)

(हेही वाचा – आयपीएलच्या १८ वर्षांच्या इतिहासात १ हजार धावांचा टप्पा गाठणारा Virat Kohli ठरला एकमेव फलंदाज)

भूखंडाचा अनधिकृतपणे विभाजन करून सुमारे १०० झोपडीधारकांना योजनेतून वगळून स्वतःचे बहुमत असल्याचे भासवले आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार त्यांना योजनेत समाविष्ट करून घेण्यासाठी आदेश आल्याने पुरवणी परिशिष्ट दोन तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सुमारे १०० झोपडीधारकांना वगळून उर्वरित झोपडीधारकांचे परिशिष्ट दोन तयार करताना सुमारे अर्ध्याहून अधिक बोगस व अपात्र लोकांना मसुदा परिशिष्ट दोन मध्ये समाविष्ट केले होते. त्यांना अपात्र घोषित केल्यास त्यांची मते जाऊन आपले बहुमत जाईल, या भीतीने चार वर्षांपासून मसुदा अद्याप अंतिम केला नाही असा आरोप भाजपाचे आमदार पराग अळवणी यांनी या निवेदनाव्दारे केला आहे. (Protest)

एलओआय देण्यापूर्वी अंतिम परिशिष्ट दोन घोषित करावे लागते तसेच जमीन मालक या नात्याने महानगरपालिकेची ना – हरकत घ्यावी लागते या अटी शिथिल करून एलओआय तर मिळवला पण आता पुन्हा आणखी शिथिल करून सीसी सुद्धा मिळवण्याचा प्रयत्न होत आहे. यामुळे मुळात दिलेला एलओआय बेकायदेशीर असून तो रद्द करावा ही रहिवाशांची मागणी आहे.

(हेही वाचा – औरंगजेब उद्धव ठाकरेंचे नवीन आराध्य दैवत ; Sanjay Nirupam यांची जहरी टीका)

अशा सर्व परिस्थितीत विकासक भूखंडावर रोजच्या रोज रहिवाशांना त्रास देण्यासाठी हालचाली करत असून त्यावर आजही जमीन मालक असलेल्या महानगरपालिकेने कारवाई करावी यासाठी सतत तगादा लावला आहे. तरीही कोणतीही कारवाई होत नसल्यामुळे रहिवाशांनी आंदोलनाचा (Protest) मार्ग पुकारला स्वीकारला असल्याची माहिती आमदार पराग अळवणी यांनी दिली. त्वरित कारवाई न झाल्यास येत्या काळात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही अळवणी यांनी रहिवाशांच्या वतीने दिला आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.