शाळांप्रमाणेच महाविद्यालयातही राष्ट्रगीत सुरु होणार?

69

शाळांप्रमाणेच महाविद्यालयातही दररोज राष्ट्रगीत सुरु करावं, अशी मागणी भाजपचे प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी केली आहे. त्यामुळे आता महाविद्यालयातही राष्ट्रगीताचे सूर ऐकू येणार का? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केल्यानंतर, 17 ऑगस्ट 2022 ला संपूर्ण देशभर एकच आवाज घुमला तो म्हणजे राष्ट्रगीताचा आणि याच प्रतिसादामुळे भाजप प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी महाविद्यालयातही राष्ट्रगीत सुरु करण्याची मागणी केली. शाळेत जसं राष्ट्रगीत होतं, तसंच महाविद्यालयातही रोज राष्ट्रगीत सुरु करा, अशी मागणी राम कुलकर्णी यांनी केली आहे.

( हेही वाचा: मुंबई -अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावर वर्षभरात 168 अपघात; Safety Audit ची गरज )

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.