स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या सन्मानार्थ चंद्रपुरात पेटल्या मशाली! अवमान सहन करणार नाही, सुधीर मुनगंटीवारांनी दिला राहुल गांधींना इशारा

79

देशातील स्वातंत्र्य सैनिकांचा आणि महापुरुषांचा अवमान करण्याची काँग्रेसची प्रथाच आहे. स्वातंत्र्यवीरांचा अवमान करणाऱ्या या काँग्रेसला आता धडा शिकविण्याची वेळ आली आहे, असे टीकास्त्र राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सोडले.

( हेही वाचा : महापालिकेच्या निवडणुका ‘या’ महिन्यात होणार; चंद्रकांत पाटलांची माहिती )

वीर सावरकर गौरव यात्रेदरम्यान आयोजित मशाल यात्रेत ते बोलत होते. याप्रसंगी भाजपा महानगरचे अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, माजी उपमहापौर राहुल पावडे, महानगरचे महामंत्री राजेंद्र गांधी, ब्रिजभूषण पाझारे, सुभाष कासनगोट्टुवार, रवींद्र गुरनुले, कोषाध्यक्ष प्रकाश धारणे, मंडळ अध्यक्ष रवी लोणकर, दिनकर सोमलवार, सचिन कोतपल्लीवार, संदीप आगलावे, विठ्ठल डुकरे, महिला मोर्चा अध्यक्ष अंजली घोटेकर, युवा मोर्चा अध्यक्ष विशाल निंबाळकर उपस्थित होते.

यावेळी बोलताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, वीर सावरकरांविरोधात बोलणाऱ्यांची बुद्धी भ्रष्ट झाली आहे असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. अशा भ्रष्ट लोकांची डोकी ठिकाणावर आणण्यासाठी वीर सावरकर गौरव यात्रा काढण्यात येत आहे. वीर सावरकरांवर विनाकारण टीका करणाऱ्यांचा मेंदू आणि बुद्धी ठिक व्हावी अशी जागतिक आरोग्य दिनानिमित्त प्रार्थनाही त्यांनी यावेळी केली. इतिहासातील सत्य परिस्थितीवर जो नीच शब्दात टीका करतो त्याला भविष्य कधीही माफ करीत नाही, असे मुनगंटीवार म्हणाले.

राहुल गांधी नेहमी म्हणतात की, ते सावरकर नाहीत. ही बाब अगदी सत्य आहे. अनेक जन्म घेतले तरी राहुल गांधी सावरकर होऊच शकत नाही. इतकेच काय तर ते गांधी देखील नाही. परदेशात शिक्षणासाठी जाण्यापूर्वी राहुल गांधी यांनी राहुल विंची असे नामांतर केले होते. जो व्यक्ती आपल्या नावाशी एकनिष्ठ राहू शकत नाही. त्याला राष्ट्रभक्ती काय कळणार असा कणखर सवालही मुनगंटीवार यांनी उपस्थित केला. स्वातंत्र्यवीर सावरकर हे केवळ नावच नाही तर ते अनेक स्वातंत्र्य सैनिकांचे प्रेरणास्थान आहे. राष्ट्रभक्तीने ओतप्रोत असलेल्यांचे ते ऊर्जास्थान आहे, असे मुनगंटीवार ठामपणे म्हणाले.

चाफेकर बंधुंना फाशी देण्यात आली त्यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर अस्वस्थ झाले. त्यांचा जीव कासावीस झाला. त्यावेळी कमी वयातच सावरकरांनी कुलदेवतेसमोर शपथ घेतली की आपले आयुष्य ते देशाच्या स्वातंत्र्यासाठी समर्पित करतील. हे सावरकर राहुल गांधी यांना कधी कळुच शकत नाहीत, असे मुनगंटीवार म्हणाले. राहुल गांधी स्वातंत्र्यवीर सावरकरांना माफीवीर म्हणतात. परंतु सावरकर जगातले एकमेव असे स्वातंत्र्यवीर आहेत ज्यांना मातृभूमीसाठी लढताना दोनदा जन्मठेपेंची शिक्षा ठोठावण्यात आली. या शिक्षेमध्ये अमानुष अत्याचार सावरकरांवर करण्यात आलेत. अन्याय सहन करूनही स्वातंत्र्यासाठी सावरकरांनी लढा दिला, हे राहुल गांधी यांना दिसत नाही. त्यामुळे इतिहासावर अपशब्द काढणाऱ्या काँग्रेसला आता धडा शिकवा असे आवाहनही मुनगंटीवार यांनी केले.

याप्रसंगी अजय सरकार, छबुताई वैरागडे , शीला चव्हाण, किरण बुटले, भारती दुधानी, जयश्री जुमडे, महेंद्र जुमडे, सूर्यकांत कुचनवार, सुरज पेद्दुलवार, यश बांगडे, सतीश तायडे, सुनिल डोंगरे, पप्पु बोपचे, मनिष पिपरे, संजय पटले, गणेश रामगुंडावर, राहुल पाल, मुघदा गायकवाड, जयश्री जुमडे, विनोद शेरखी, धनराज कोवे, धम्माप्रकाश भस्मे, संदीप आगलावे, विठ्ठल डुकरे, रवी लोणकर, सचिन कोतपल्लीवार, दिनकर सोमलकर, दशरथ सिंग ठाकूर, अनिल डोंगरे, रेणु घोडेस्वार, सूर्या खजांची,मोनिषा महातव,कविता जाधव, सपना नामपल्लीवार, वंदना संतोषवार, प्रभा गुळढे, चंद्रकला सोयाम, मायाताई मांडाळे, रंजिता येले, दिवाकर पुद्दटवार, सुरेश तालेवार, राहुल घोटेकर, प्रमोद शास्त्रकार, राजेंद्र खांडेकर, मधुकर राऊत, उमेश आष्टनकर, गजू भोयर, स्वप्नील भोपय, हिमांशू गादेवार, धनंजय मुफकलवार, योगेश चौधरी, सचिन यामावर, आकाश ठुसे, अखिलेश रोहिदास, लिलावती यादव, अमित कासनगोट्टुवार, बाळू कोलणकर, चंदन पाल, चांदभाई सय्यद, सारीका संदूरकर व भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.