सांताक्रूझमध्ये भाजपचे खड्डे भरा आंदोलन

115
गणेश चतुर्थी निमित्त आपल्या लाडक्या बाप्पाचे अर्थात गणरायाचे आगमन अगदीच काही दिवसांवर आले आहे. परंतु एच पूर्व विभागातील खार पूर्व भागातील शांतीलाल कंपाऊंड येथील रस्त्याची दुरावस्था झाली आहे. त्यामुळे हे खड्डे तातडीने भरण्यासाठी भाजपच्यावतीने खड्डे भरा आंदोलन करण्यात आले असून हे खड्डे तातडीने भरण्यासाठी  महापालिका विभागाच्या सहायक आयुक्त अलका ससाणे यांना निवेदन देण्यात आले आहे.
श्री गणरायांच्या आगमन मार्गात अनेक ठिकाणी खड्डे पडलेले असून या खड्ड्यांबाबत महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधून घेऊनही त्यांनी खड्डे बुजवण्याचे काम हाती घेतले नाही. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या रस्त्यांवर खड्डे पडलेले असल्याने भाजपचे माजी नगरसेवक कृष्णा पारकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपने खड्डे भरो आंदोलन हाती घेतले.
सद्य परिस्थितीची कनिष्ठ अभियंता विशाल कोयरे साहेब यांच्यासोबत अनेक वेळा पाहणी करूनही या रस्त्याचे काम पूर्ण होत नव्हते. याचाच  निषेध म्हणून खड्डे भरा आंदोलन केले, असे कृष्णा पारकर यांनी सांगितले. याबाबत एच -पूर्व विभागाच्या सहायक आयुक्त अलका सामने यांना निवेदन देण्यात आले. या आंदोलनाची तत्काळ दखल घेत एच-पूर्व वॉर्ड प्रशासनाने बाप्पाच्या आगमनापूर्वी कोणत्याही परिस्थितीत खड्डे भरून हे काम पूर्ण करून देऊ असे आश्वासन सहायक आयुक्त यांनी दिले असल्याने तूर्तास अधिकाऱ्यांचा मान राखून आम्ही हे आंदोलन स्थगित केले जात असल्याचे पारकर यांनी स्पष्ट केले.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.