वांद्रे-कुर्ला संकुल येथे सध्या वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होते. मात्र आता लवकरच सप्टेंबर २०२३ पासून कुर्ला ते बीकेसी मार्गावर प्रवाशांचा प्रवास हा जलद आणि सुकर होणार आहे. बीकेसी ते एलबीएस रोड उड्डाणपुलाचे काम सप्टेंबर २०२३ पर्यंत पूर्ण होऊन हा पूल वाहतूक सेवेत दाखल करण्याचा निर्णय मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने घेतला आहे.
( हेही वाचा : इंग्लंडविरूद्ध रोहित शर्मा खेळणार की नाही? पत्रकार परिषदेत दिली माहिती )
जोडरस्ता प्रकल्पाचा विस्तार करण्याचा निर्णय
कुर्ल्यावरून बीकेसीला येण्यासाठी वाहनचालक, प्रवाशांना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना कराला लागत आहे. यामुळेच एमएमआरडीएने सांताक्रुझ-चेंबूर जोडरस्ता प्रकल्पाचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे.बीकेसी ते एलबीएस कुर्ला उड्डाणपुलाच्या कामाला MMRDA ने वेग दिला आहे. एलबीएस ते बीकेसी हा पूल सेवेत दाखल झाल्यास कुर्ला ते एलबीएस रोड आणि बीकेसीतील वाहतूक कोंडी दूर होणार असून कुर्ल्यावरून बीकेसीला पोहोचणे सोपे होणार आहे. तसेच पुढे कलानगर जंक्शन, माहिम आणि वांद्रे-वरळी सागरी सेतूला जाणेही सोपे होणार आहे. त्यामुळे मुंबईकरांसाठी हा पूल अत्यंत महत्त्वाचा आहे.
Join Our WhatsApp Community