BKC Underground Metro Station: मुंबई बीकेसीतील अंडरग्राऊंड मेट्रोला भीषण आग; मेट्रो-३ च्या फेऱ्या रद्द

81
BKC Underground Metro Station: मुंबई बीकेसीतील अंडरग्राऊंड मेट्रोला भीषण आग; मेट्रो-३ च्या फेऱ्या रद्द
BKC Underground Metro Station: मुंबई बीकेसीतील अंडरग्राऊंड मेट्रोला भीषण आग; मेट्रो-३ च्या फेऱ्या रद्द

मुंबईतील वांद्रे कुर्ला संकुलातील अंडरग्राऊंड मेट्रोला (BKC Underground Metro Station) आग लागली आहे. मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनमध्ये ही आग लागली आहे. सध्या ही आग विझवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. यामुळे मेट्रो-३ (Metro-3) च्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढलं आहे.

(हेही वाचा-Baba Siddique Murder : पोलिसांनी मारेकऱ्यालाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’)

बीकेसी मेट्रो (BKC Underground Metro Station) स्टेशन हे अंडरग्राउंड स्टेशन असून पहिल्यांदाच या ठिकाणी आग लागल्याची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. सध्या घटनास्थळी अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात आणण्याचे कार्य सुरू आहे. सुमारे 40 ते 50 फूट खोल तळघरातील लाकडी साठा आणि फर्निचर असलेल्या ठिकाणी ही आग पसरली होती. घटनास्थळी अग्निशामक दलाच्या गाड्या आणि स्थानिक पोलिसांची टीम कार्यरत आहे.

(हेही वाचा-MNS Manifesto : विधानसभेसाठी मनसेचा जाहीरनामा प्रसिद्ध! जाहीरनाम्यात वेगळं काय?)

सध्या आग आटोक्यात आणल्याची माहिती असून कुलिंग ऑपरेशन सुरु आहे. मात्र, आता अंडरग्राऊंड मेट्रोची वाहतूक पूर्ववत होण्यासाठी किती वेळ लागणार, याबद्दल कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. (BKC Underground Metro Station)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.