मध्य प्रदेशातील हरदामध्ये फटाक्याच्या कारखान्यात मंगळवार, ६ फेब्रुवारी रोजी भीषण स्फोट (Blast) झाला. या दुर्घटनेत 25 हून अधिक जण होरपळून ठार झाल्याची माहिती मिळत आहे. जेव्हा आग लागली तेव्हा फटाक्यांच्या कारखान्यात एका मागोमाग स्फोट झाल्याने भीषण आग लागली. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या दाखल झाल्या. यात आगीत आणखी काही कामगार अडकले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
मध्य प्रदेशातील हरदा जिल्ह्यात एका फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट (Blast) झाला आहे. या आगीनंतर कारखान्यात सतत स्फोट होत आहेत, त्यामुळे उंचच उंच आगीचे लोट उठत आहेत. या कारखान्यात काम करणारे अनेक कामगार कारखान्यात अडकलेले असल्याची शक्यता आहे. दरम्यान, या आगीत आतापर्यंत 25 जण होरपळले असून त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
(हेही वाचा कुत्र्याने न खाल्लेले बिस्कीट दिले कार्यकर्त्याला; Rahul Gandhi झाले ट्रोल)
25 हून अधिक जण होरपळले
मध्य प्रदेश हरदा येथील फटाक्यांच्या कारखान्याला लागलेल्या भीषण आगीत जखमी झालेल्या लोकांना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात येत आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून अनेक लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
Join Our WhatsApp Community