Mahad Fire News : महाडच्या जेट इन्सुलेशन हेल्थकेअर कंपनीत स्फोट, पाच जण जखमी

स्फोटानंतर मोठ्या प्रमाणात गॅसची गळती झाली

195
Mahad Fire News : महाडच्या जेट इन्सुलेशन हेल्थकेअर कंपनीत स्फोट, पाच जण जखमी
Mahad Fire News : महाडच्या जेट इन्सुलेशन हेल्थकेअर कंपनीत स्फोट, पाच जण जखमी

रायगड-महाड एमआयडीसी येथे मोठा स्फोट झाल्याची घटना घडली आहे. जेट इन्सुलेशन हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेड असे या कंपनीचे नाव आहे.शुक्रवारी (३नोव्हेंबर) सकाळी दहा वाजताच्या सुमारास शॉर्ट सर्किट होऊन भीषण स्फोट झाला आहे. या स्फोटात पाच कामगार देखील जखमी झाले आहेत. तर महाड ग्रामीण रुग्णालयात जखमींवर उपचार सुरु असल्याची माहिती देण्यात आली आहे . (Mahad Fire News)

यावेळी झालेल्या मोठ्या आवाजामुळे आजुबाजूचा परिसर हादरला.स्फोटानंतर मोठ्या प्रमाणात गॅसची गळती झाली. यामुळे कामगारांना त्रास झाला आहे. स्फोटानंतर प्लांट मध्ये लागली आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. यानंतर अग्नीशमन यंत्रणा, पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन वाहनांकडून परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. या स्फोटामध्ये कंपनीचे अतोनात नुकसान झाले आहे. जखमी कामगारांना एमएमएसीइटीपी हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

(हेही वाचा : St News : एसटीच्या सर्व आगारातून वाहतूक सुरू; दिवाळीसाठी जादा गाड्या सोडणार)

या स्फोटानंतर कंपनीच्या प्लांटमध्ये असलेल्या रियाक्टर्सचा एका मागून एक असे स्फोट होत गेले. या स्फोटात कंपनीच्या प्लांटचे अतोनात नुकसान झाले आहे. दहा वाजता लागलेली आग दुपारी बारा वाजले तरी आटोक्यात आणता आली नव्हती. दरम्यान, महाड आग दुर्घटनेमध्ये ११ जण अजूनही अडकून पडल्याची माहिती आहे.  या कंपनीत ५७ कामगार काम करत होते.  अशी माहिती महाडच्या प्रांताधिकाऱ्यांनी दिली.स्फोट झाल्यानंतर लागलेल्या आगीमुळे शेजारी असलेल्या विरल आणि एक्वा फार्म तसेच ज्वारीमधील कामगारांनी कंपनीबाहेर धाव घेतली विरल कंपनीच्या कामगारांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न केले.

 

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.