Jammu – Kashmir : जम्मू-काश्मीरच्या पूंछमध्ये हिंदू मंदिराजवळ बॉम्बस्फोट

137

जम्मू-काश्मीरच्या (Jammu – Kashmir) पूंछमध्ये हिंदू मंदिराजवळ बॉम्बस्फोट झाला असून पोलिसांनी एका सरकारी शिक्षकासह 3 दहशतवाद्यांना अटक केली. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि रोख रक्कम जप्त केली.

जम्मू-काश्मीरमधील (Jammu – Kashmir) पुंछ येथील हिंदू मंदिरात बॉम्बस्फोट झाल्याची घटना घडली. या स्फोटानंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. सुरक्षा दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला. मंदिरांच्या भिंतींवर बॉम्बस्फोटामुळे तडे पडल्याचे दिसत आहेत. या स्फोटात कोणीही जखमी झाले नाही. या बॉम्बस्फोटामागे कोणाचा हात आहे, हे अद्यापी कळू शकलेले नाही. पूंछच्या सुरनकोट भागात हे मंदिर आहे. सुरनकोटच्या पोलिसांनी या बॉम्बस्फोटाला दुजोरा दिला आहे. फॉरेन्सिक पथकही घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी तपास केला आहे.

(हेही वाचा CM Eknath Shinde : कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी कृती आराखडा सादर करा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश)

स्थानिक पोलीस आणि सुरक्षा दलांनी परिसराला घेराव घालून शोधमोहीम सुरू केली आहे. मंदिराचे पुजारी अतुल शर्मा यांनी सांगितले की, बुधवारी, 15 नोव्हेंबर 2023 रोजी रात्री 8 वाजून 50 मिनिटांनी हा स्फोट झाला. त्यावेळी ते दारात असताना मोठा आवाज ऐकू आल्याचे त्यांनी सांगितले. त्याच वेळी त्यांना पोलीस जवानांनी  आत जाण्यास सांगितले आणि येथे स्फोट झाल्याचे सांगितले. त्यानंतर पुजाऱ्याने अधिकाऱ्यांना फोन केला. यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.