पालघर जिल्ह्यातील तारापूर औद्योगिक वसाहतीत बुधवारी भीषण अपघात झाला आहे. वसाहतीतील भगेरिया इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीत भीषण स्फोट झाला असून या स्फोटात तीन कामगारांचा मृत्यू झाला असून काही कामगार जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. या कारखान्यात एकूण 18 कामगार कार्यरत असून मुख्यमंत्री शिंदे यांनीही या घटनेची दखल घेतली आहे. जखमींना सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
तीन कामगारांचा मृत्यू
तारापूर औद्योगिक वसाहतीतील प्लॉट नंबर डी 117 वरील भगेरिया इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीत उत्पादन सुरू असताना संध्याकाळी 4.30 च्या सुमारास बॉयलरचा मोठा स्फोट झाला. या स्फोटात कंपनीत काम करणा-या दोन कामगारांचा जागीच मृत्यू झाला तर एका कामगाराचा रुग्णालयात उपचारांदरम्यान मृत्यू झाला. या घटनेत कंपनीत काम करणा-या 18 पैकी 10 पेक्षा जास्त कामगार भाजले आहेत. ते गंभीररित्या जखमी झाले असून त्यांना बोईसर येथील शिंदे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
(हेही वाचाः कॅनडात खलिस्तानी समर्थकांकडून भारतीयांना मारहाण, दिवाळीच्या कार्यक्रमात निंदनीय कृत्य)
मृतांची ओळख पटली
जखमी झालेल्या कामगारांपैकी काही जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे. तसेच मृत कामगारांची ओळख पटली असून गोपाल सिसोदिया(वय 35),पंकज यादव(वय 32) आणि सिकंदर(वय 27) अशी या मृत कामगारांची नावे आहेत. जखमींची ओळख पटवण्याचे काम पोलिसांकडून करण्यात येत आहे.
सकाळी तीन वाजता डाईंग प्रक्रियेत आवश्यक असणा-या अॅसिडचे उत्पादन या कंपनीत सुरू करण्यात आले होते. या दरम्यान बॉयलरचे तापमान आणि दबाव क्षमतेपेक्षा जास्त झाल्याने हा स्फोट झाला असल्याची प्राथमिक माहिती कंपनीच्या माध्यमातून देण्यात आली आहे.
जखमींची नावे –
1) मुकेश चेनू दास. वय 33 वर्ष,
2) श्रवण मुरारी दास, वय 33 वर्ष
3)हिमांशू प्रमोद पाठक, वय 30वर्ष
4) घनश्याम रामप्यारे निषाद, वय 45 वर्ष
5) देवेंद्र कुबेर यादव, वय 22 वर्ष
6) अरुण ओमप्रकाश पटेल, वय 27 वर्ष,
7) राजू कुंजीलाल पासवान, वय 40 वर्ष
8) हंसराज लालधारी यादव, वय 40 वर्ष
9) नारायण श्रीकिशोर मिश्रा, वय 24 वर्ष
10) सुनील हिरा, वय 31 वर्ष
11) भवानी रामसजीवन शिंग, वय 19 वर्ष
12) श्रीराम मनिलाल मेहता, वय 18 वर्ष
Join Our WhatsApp Community