पंतप्रधानांनी 13 दिवसांपूर्वीच उद्घाटन केलेल्या रेल्वे ट्रॅकवर स्फोट, परिसरात खळबळ

उदयपूर-अहमदाबाद रेल्वे ट्रॅकवर काही समाजकंटकांकडून शनिवारी रात्री स्फोट घडवण्यात आला आहे. या प्रकारामुळे परिसरात मोठी दहशत निर्माण झाली आहे. मुख्य म्हणजे 13 दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उदयपूर-अहमदाबाद रेल्वे मार्गाचे उद्घाटन करण्यात आले होते. त्यानंतर शनिवारी हा स्फोट घडवण्यात आला असून, यामुळे रेल्वे ट्रॅक उखडले आहेत. याप्रकरणी पोलिस आणि रेल्वे अधिका-यांकडून तपास करण्यात येत आहे.

शनिवारी रात्री ट्रॅकवर स्फोट

शनिवारी रात्री उशिरा या रेल्वा मार्गावरील ओढा रेल्वे पुलाच्या साळुंबर येथे ही घटना घडल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. रेल्वे ट्रॅक उखडून काढण्यासाठी स्फोटकांचा वापर करुन स्फोट घडवून आणल्याचे सांगण्यात येत आहे. रात्री स्फोटाचा आवाज झाल्यानंतर परिसरात राहणा-या स्थानिकांना स्फोटाचा आवाज आला. त्यानंतर स्थानिकांनी रेल्वे ट्रॅकवर धाव घेतली. त्यावेळी तिथे स्फोटकांमधील दारु पडली असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी पोलिस यंत्रणा आणि रेल्वे प्रशासनाला याबाबतची माहिती दिली.

(हेही वाचाः कोरोनाचा पुन्हा उद्रेक, ऑस्ट्रेलियात एकाच क्रूझवर आढळले 800 कोरोनाबाधित)

पोलिसांकडून तपासणी

रेल्वे ट्रॅकवर झालेल्या या स्फोटामुळे रेल्वे ट्रॅक ठिकठिकाणी तुटला असून, नट-बोल्टही गायब झाल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या रेल्वे ट्रॅकच्या दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात आले आहे. दरम्यान प्रकरणाची तपासणी करण्यासाठी एफएसएल टीम घटनास्थळी पोहोचल्याचे उदयपूरचे पोलिस अधीक्षक विकास शर्मा यांनी सांगितले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here