OM Certificate ला साधू संतांचे आशीर्वाद

ओम प्रमाणपत्राची (OM Certificate) संकल्पना प्रभावी ठरत आहे. त्यानुसार हिंदू व्यापाऱ्यांची नोंदणी केली जात आहे. सोबतच हिंदू ग्राहकांचीही नोंदणी केली जात आहे.

71

देशात हलाल प्रमाणित उत्पादनांची विक्री करून मुसलमानांची समांतर अर्थव्यवस्था उभी केली जात आहे. देशातील कंपन्यांना हलाल प्रमाणपत्र घेण्यास भाग पाडून ती उत्पादने हिंदूंच्या माथी मारून त्यांच्याकडून पैसा जमा केला जातो. त्यानंतर तो पैसा दहशतवादी कारवायांसाठी वापरला जात असल्याचे वास्तव समोर आले आहे. त्यामुळे याला पर्याय म्हणून हिंदूंचा पैसा हिंदूंकडे जावा यासाठी ओम प्रतिष्ठानच्या माध्यमातून ओम प्रमाणपत्राची (OM Certificate) संकल्पना राबवण्यात येत आहे. या प्रमाणपत्राच्या माध्यमातून हिंदू व्यापाऱ्यांचे संघटन निर्माण केले जात आहे. त्यासाठी साधू संतांचे आशीर्वाद मिळत आहेत.

एका योग शिबिरात मार्गदर्शन करताना योगगुरू रामदेव बाबा म्हणाले की, हिमालयाची फेसवॉश खरेदी कराल तर त्यातून मदरसे, मशिदी उभ्या राहतील. हिमालय हे कट्टर मुसलमानाची कंपनी आहे. त्यांची सनातन संस्कृतीशी काही संवेदना नाही, त्यांची मदरसे आणि मशिदीशी संवेदना आहे. हिमालय कंपनीने हलाल प्रमाणपत्र घेतले आहे. त्यामुळे या कंपनीची उत्पादने हिंदूंनी घेतली तर तो निधी मुसलमानांकडे जाणार आहे. त्यांचा हा व्हिडिओ सध्या समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. त्यांनी यातून हिंदूसाठी जो धोका व्यक्त केला आहे, तोच मुद्दा घेऊन ओम प्रमाणपत्राची मोहिम राबवली जात आहे. त्यामुळे एकप्रकारे या मोहिमेला साधू संतांचे आशीर्वादच मिळत आहेत.

(हेही वाचा नॅशनल हेराल्डप्रकरणी आरोपपत्रात सोनिया आणि Rahul Gandhi यांचे नाव)

रामदेव बाबा यांच्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर ओम प्रमाणपत्राची (OM Certificate) संकल्पना प्रभावी ठरत आहे. त्यानुसार हिंदू व्यापाऱ्यांची नोंदणी केली जात आहे. सोबतच हिंदू ग्राहकांचीही नोंदणी केली जात आहे. या माध्यमातून कोणत्याही हिंदू ग्राहकाला वस्तू खरेदीपासून ते इलेक्ट्रीक, प्लम्बर, सुतारकाम, रंगकाम अशा अनेक सेवांसाठी हिंदू व्यापाऱ्यांची माहिती सहज उपलब्ध होणार आहे. हिंदू ग्राहक कोणत्या ठिकाणी अधिक आहेत याची माहितीही हिंदू व्यापाऱ्यांना याच माध्यमातून मिळणार आहे. अशा रीतीने हिंदूंचा व्यवसाय हिंदूंपर्यंत अशी हे संकल्पना या ओम प्रमाणपत्राची (OM Certificate) आहे. याचा आरंभ जून २०२४ पासून झाला, त्यानंतर योगगुरू रामदेव बाबा यांनी हिमालय कंपनीच्या उत्पादनांवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन हिंदू ग्राहकांना केले, त्यामुळे ओम प्रमाणपत्राला (OM Certificate) प्रोत्साहन मिळाले आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.