Blinkit Scam : दिल्लीच्या एका तरुणाची ब्लिंकइटवर फसवणूक, १ ग्रॅम सोन्याच्या ऑर्डरवर मिळालं अर्धा ग्रॅम सोनं

सोनं घरी पोहोचल्यानंतर २० मिनिटांत रिटर्न करण्याची सोय बंद झाल्याचं ग्राहकाचं म्हणणं आहे.

52
Blinkit Scam : दिल्लीच्या एका तरुणाची ब्लिंकइटवर फसवणूक, १ ग्रॅम सोन्याच्या ऑर्डरवर मिळालं अर्धा ग्रॅम सोनं
Blinkit Scam : दिल्लीच्या एका तरुणाची ब्लिंकइटवर फसवणूक, १ ग्रॅम सोन्याच्या ऑर्डरवर मिळालं अर्धा ग्रॅम सोनं
  • ऋजुता लुकतुके

नवी दिल्लीतील मोहित जैन (Mohit Jain) एका रहिवाशाने ब्लिंकइट या ई-कॉमर्स वेबसाईटवर १ ग्रॅम सोनं ऑनलाईन मागवलं होतं. लक्ष्मीचं चित्र असलेलं हे नाणं त्यांना लक्ष्मीपूजनासाठी हवं होतं. पण, घरपोच आलेलं नाणं हे मागवल्याप्रमाणे १ ग्रॅमचं नाही तर अर्ध्याच ग्रॅमचं असल्याचं त्यांना नंतर लक्षात आलं. शिवाय ते २४ कॅरेटचंही नव्हतं. ब्लिंक इट ही झोमॅटोचे मालक दिपेश अगरवाल यांची क्विक कॉमर्स कंपनी आहे. आणि मागवलेली वस्तू १५ मिनिटांत घरपोच करण्याची सेवा ही कंपनी देते. यात २० मिनिटांचं रिटर्न धोरणही आहे. म्हणजेच वस्तू घरपोच दिल्यानंतर २० मिनिटांच्या आत तुम्ही ती रिटर्न करू शकता. पण, जैन यांना सोन्याच्या बाबतीत फसवलं गेल्याचंच उशिरा लक्षात आलं. तेव्हा २० मिनिटं उलटून गेली होती. आणि त्यानंतर ॲपवर वस्तू परत करण्याचा पर्याय आता बंद झाला आहे. आणि ब्लिंटइट कंपनीकडून जैन यांना समाधानकारक उत्तरंही मिळत नाहीएत. शेवटी वैतागून जैन यांनी सोशल मीडियावर झालेला प्रकार सांगितला आहे. तिथे ही पोस्ट चांगलीच व्हायरल झाली आहे. (Blinkit Scam)

(हेही वाचा – Paper Leak : पेपरफुटीमुळे १.४ कोटी उमेदवारांना फटका; कायद्याचा ‘असा’ होईल फायदा)

जैन यांनी डिलिव्हरी बॉयशीही संपर्क केला. आणि त्याने चुकीची वस्तू दिल्याचं कबूलही केलं आहे. पण, पुढे तो काहीही मदत करू शकलेला नाही, असं जैन यांचं म्हणणं आहे. जैन यांच्यामते त्यांच्याकडे चुकीची वस्तू आल्याचं सीसीटीव्ही फुटेजङी आहे. आणि मागवलेल्या वस्तूची ऑर्डर प्रतही आहे. (Blinkit Scam)

मागवलेली वस्तू आणि त्यांच्यापर्यंत पोहोचलेली वस्तू यातील फरकही ते फोटोंच्या आधारे दाखवतात. त्यांनी ब्लिंकइट ॲपवर हे कळवण्याचा प्रयत्न केला तर त्यांना, ‘या वस्तूसाठी तक्रार करण्याची मुदत आता संपली आहे,’ असं उत्तर मिळालं. या पोस्टवर अनेकांनी उत्तरं दिली आहेत. आणि त्यातील काहींनी त्यांनाही क्विक कॉमर्स कंपन्यांचा असाच अनुभव आल्याचं म्हटलं आहे. ‘किराणा सामाना व्यतिरिक्त कुठलीही वस्तू क्विक कॉमर्सवरून मागवू नये. ते या बाबतीत अगदीच हलगर्जीपणे वागतात,’ असं एकाने लिहिलं आहे. (Blinkit Scam)

दरम्यान, जैन यांना या व्हायरल पोस्टनंतर ब्लिंकइटकडून त्यांच्या ईमेलला उत्तर आलं आहे. आणि त्यांनी रिटर्न प्रक्रिया सुरू करण्याचं वचनही दिलं आहे. पण, मूळात क्विक कॉमर्स आणि ई कॉमर्स कंपन्यांकडून फसगत होत असल्यास काय करावं ते पाहूया,

सोन्यासारखी मौल्यवान आणि मोठी वस्तू क्विक कॉमर्स ऐवजी थेट दुकानात खरेदी करणं उत्तम असा सल्ला तज्जांनी दिला आहे. शिवाय अनेक सोनारांनी दिवाळी किंवा सणांच्या दिवसातील मागणी लक्षात घेऊन ऑनलाईन विक्री सुरू केली आहे. तिथे सोने किंवा इतर मौल्यवान वस्तूंसाठी नोंदणी करावी. ते क्विक कॉमर्सपेक्षा विश्वासू असतात. आणि अशा दुकानांमध्ये जाऊन दादही लवकर मागता येते.

(हेही वाचा – Diwali 2024 : नवी मुंबईतील मोगलाई; दिवाळीनिमित्त रोषणाई केल्याने धर्मांधांची हिंदू महिलांना अश्लील शिवगाळ आणि दमदाटी)

सुरुवातीला क्विक कॉमर्स कंपनीच्या ग्राहक तक्रार निवारण केंद्राशी फोन किंवा ईमेलवरून संपर्क करावा, त्यांच्याकडून काहीही उत्तर न आल्यास मग कायदेशीर कारवाईसाठी तुम्ही मोकळे आहात.

मौहित जैन (Mohit Jain) यांनी स्वीकारलेला सोशल मीडियाचा पर्यायही चांगला आहे. तुमच्या सोशल मीडिया पोस्टवर तुम्ही कंपनीला टॅग केलंत तर ही तक्रार त्यांच्यापर्यंत जाते. आणि मग लोकभावनेला घाबरून कंपनीकडून त्वरित प्रतिसाद मिळण्याची शक्यता वाढते. अशं अनेकदा घडलं आहे. ही पद्धत सोपी आणि् सुटसुटीत आहे.

तुम्हाला कंपनीविरुद्ध कायदेशीर तक्रार करायची असल्यास ग्राहक व्यवहार व हितसंगोपन मंत्रालयाकडे तुम्ही तक्रार करू शकता. त्यांनी एक हेल्पलाईन आणि वेबसाईट सुरू केली आहे. तिथे तक्रार नोंदवून पुरावे सादर केल्यास तुम्हाला दाद मिळू शकते. (Blinkit Scam)

सरकारी ग्राहक तक्रार निवारण वेबसाईटची लिंक – https://consumerhelpline.gov.in/public/

तर राष्ट्रीय तक्रार निवारण हेल्पलाईनचा नंबर – १८००-११-४००० किंवा १४४०४. सकाळी साडेनऊ ते साडेपाच या वेळेत ही हेल्पलाईन सुरू असते.

मोबाईलवरून तक्रार करायची असल्यास ८१३०००९८०९ या क्रमांकावर तुम्ही एसएमएस करू शकता.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.