Juinagar Block : 25 ते २७ ऑगस्ट दरम्यान जुईनगर स्थानकावर ब्लॉक… जाणून घ्या तपशील

201
Juinagar Block : 25 ते २७ ऑगस्ट दरम्यान जुईनगर स्थानकावर ब्लॉक... जाणून घ्या तपशील
Juinagar Block : 25 ते २७ ऑगस्ट दरम्यान जुईनगर स्थानकावर ब्लॉक... जाणून घ्या तपशील

जुईनगर स्थानकात डाउन आणि अप हार्बर मार्गावर आणि ट्रान्स-हार्बर मार्गावर शुक्रवार, २५ ऑगस्ट ते रविवार, २७ ऑगस्ट दरम्यान जुईनगर स्थानकावर इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगच्या तरतुदीसह ४ नवीन उपनगरी गाड्यांसाठी (EMU) स्टॅबलिंग साइडिंग सुरू करण्यासाठी विशेष ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे. जुईनगर स्थानकावर उपनगरी गाड्यांसाठी (EMU) ४ नवीन साइडिंग बांधण्याची योजना आहे. या ४ नवीन उपनगरी गाड्यांसाठीच्या (EMU) साईडिंग्जच्या बांधकामामुळे पनवेल आणि वाशी प्लॅटफॉर्मवर उपनगरी गाड्यांच्या (EMU) रेकची दैनंदिन गर्दी कमी होण्यास मदत होईल. यामुळे सानपाडा कारशेडच्या स्टॅबलिंग लाईन्सवरील गर्दीही कमी होईल. जुईनगर येथील या नवीन स्टेबलिंग लाईन्सवर उपनगरी गाड्यांच्या (EMU) रेकची तपासणी सुलभ करेल.

(हेही वाचा – Chandrayaan – 3 चंद्रावर पोहचले, पाकिस्तानी म्हणतात आम्ही आधीच पोहोचलोय, व्हिडिओ व्हायरल)

ब्लॉकची तारीख, वेळ आणि कालावधी
शुक्रवार, २५ ऑगस्ट ते रविवार, २७ ऑगस्ट या कालावधीत रोज सकाळी ८.०० वाजल्यापासून ते दुपारी ३.३० वाजेपर्यंत हा ब्लॉक घेण्यात येईल. त्यानंतर वाहतूक सुरळीत असेल.

ब्लॉकमुळे उपनगरीय गाड्यांच्या वेळांमध्ये होणारे बदल

२५ आणि २६ ऑगस्ट (शुक्रवार- शनिवार रात्रीची वेळ) आणि २६ आणि २७ ऑगस्ट (शनिवार- रविवार रात्रीची वेळ) रोजी खालील उपनगरीय गाड्या वाशी येथे संपुष्टात ( Short Terminate) येतील.

• छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून २०.०० वाजता आणि २२.५० वाजता सुटणाऱ्या P-175 आणि P-199
पनवेलकरीताच्या लोकल वाशी येथे संपुष्टात (Short Terminate) येतील.

• छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून २१.३८ वाजता आणि २१.५८ वाजता सुटणाऱ्या BR-57 आणि BR-59
बेलापूर करीताच्या लोकल

२५ आणि २६ ऑगस्ट (शुक्रवार- शनिवार रात्रीची वेळ) (Short originating) पुढील उपनगरीय गाड्या वाशी येथून सुटतील.

  • बेलापूर सीबीडी येथून ०५.५० वाजताची BRVD-2 बेलापूर-वडाळा रोड लोकल
  • बेलापूर सीबीडी येथून ०७.०४ वाजताची BR-16 बेलापूर – छत्रपती शिवाजी महाराज लोकल.
ब्लॉकमुळे होणारे परिणाम
  • सानपाडा कारशेडच्या जुईनगरच्या टोकापासून /पर्यंत प्रवेश आणि निर्गमन उपलब्ध होणार नाही.
  • रविवारच्या ब्लॉक दरम्यान हार्बर आणि ट्रान्सहार्बर सेवा देखील उपलब्ध होणार नाहीत.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.