वीर सावरकरांच्या आत्मार्पण दिनाच्या निमित्ताने बांदोडकर महाविद्यालयामध्ये Blood Donation Camp

Blood Donation Camp : २५ फेब्रुवारी या दिवशी सकाळी ८ वाजल्यापासून ठाणे (Thane) येथील बांदोडकर महाविद्यालयात (Bandodkar College) रक्तदान शिबिरा

13

२६ फेब्रुवारी या दिवशी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा (Veer Savarkar) आत्मार्पण दिन आहे. त्या निमित्ताने २५ फेब्रुवारी या दिवशी सकाळी ८ वाजल्यापासून ठाणे (Thane) येथील बांदोडकर महाविद्यालयात (Bandodkar College) रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरासाठी लायन्स क्लब कांजुर-विक्रोळी आणि जिमखाना यांचे सहकार्य लाभले आहे. (Blood Donation Camp)

(हेही वाचा – नवीन शैक्षणिक वर्षापासून स्कूल बसेससाठी नवे धोरण लागू करणार; Minister Pratap Sarnaik यांचे निर्देश)

महाविद्यालयाच्या एनएसएस आणि एनसीसी युनिटकडून हा उपक्रम राबवण्यात येत आहे. जिमखाना येथे सुरु असलेल्या या रक्तदान शिबिरात रक्त दान करून सामाजिक कार्याला हातभार लावावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

वीर सावरकरांच्या आत्मार्पण दिनाच्या निमित्ताने राज्यभर विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येत आहेत. काही ठिकाणी व्याख्याने, सावरकरांच्या पुस्तकांचे अभिवाचन, काही ठिकाणी सावरकर कुटुंबातील महिलांच्या त्यागाचे स्मरण, अशा विविध माध्यमातून वीर सावरकरांचे (Veer Savarkar) स्मरण करण्यात येत आहे.  (Blood Donation Camp)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.