दरवर्षी दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकातर्फे मुंबईसह दादर, विद्याविहार आणि कुर्ला या भागात रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात येते. रविवारी ठाण्यात हे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक आणि हनुमान सेवा मंडळ यांच्या सहकार्याने या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी, १० एप्रिल २०२२ रोजी झालेल्या रक्तदान शिबिरात ४२ बाटल्या रक्त संकलन झाले.
किती जणांनी नोंदणी केली?
सकाळी १० ते दुपारी ३ या दरम्यान हे रक्तदान शिबीर हनुमान मंदिर, पोलीस चौकीसमोर, सावरकर नगर, रोड क्रमांक २२, ठाणे पश्चिम येथे झाले. यावेळी एकूण ५४ जणांनी नोंदणी केली होती, त्यात एकूण ४२ बाटल्या रक्त जमा झाले. ६ महिलांनी रक्तदान करण्यासाठी नाव नोंदविले होते, त्यातील ५ महिलांचे हिमोग्लोबिन कमी असल्यामुळे त्या महिला रक्तदान करू शकल्या नाहीत. एका महिलेने रक्तदान केले. सहा पुरुषांनाही काही कारणास्तव रक्तदान करता आले नाही.
(हेही वाचा पवारांच्या बंगल्यावरील हल्ला भोवला, १०९ एसटी कामगारांनी नोकरी गमावली)
Join Our WhatsApp Community