वीर सावरकरांच्या आत्मार्पण दिनाच्या निमित्ताने मुलुंडमध्ये रक्तदान महायज्ञाचे (Blood Donation) आयोजन करण्यात आले होते. २ मार्च या दिवशी मुलुंड (Mulund) येथील चित्पावन ब्राह्मण संघ हॉल येथे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर स्मारक समिती आणि अन्य सामाजिक संस्था यांच्या वतीने हे रक्तदान आयोजित करण्यात आले होते.
‘हिंदुस्थान पोस्ट’चे (Hindusthan Post) संपादक आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे (Swatantryaveer Savarkar Rashtriya Smarak) सहकार्यवाह स्वप्नील सावरकर (Swapnil Savarkar) यांच्या हस्ते वीर सावरकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर स्मारक समितीचे कार्यकारी प्रमुख उदयकुमार गोखले, समितीच्या सदस्या अस्मिता गोखले, सावरकर स्टडी सेंटरचे विनायक काळे आदी उपस्थित होते. स्थानिकांनी या शिबिराला उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत चालू असलेल्या या शिबिरात ७० बाटल्या रक्त संकलित झाले.
जेव्हा सावरकरांची नाहक अपकीर्ती करण्यात आली, तेव्हा सावरकरांचे कार्य सर्वांपर्यंत पोहोचवायला हवे, असे वाटले आणि मी या कार्याशी जोडले गेले. त्यासाठी आम्ही १२ वर्षांपूर्वी रक्तदान शिबिर आयोजित करत आहोत. यंदा त्याला १२ वर्षे पूर्ण होत आहेत, अशा भावना आयोजकांनी व्यक्त केल्या. (Blood Donation)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community