World Health Day निमित्त ‘आरोग्यम धनसंपदा’ उपक्रमांतर्गत सावरकर स्मारकात रक्त तपासणी शिबीर संपन्न; २०० जणांनी घेतला लाभ

या रक्त तपासणी उपक्रमासाठी अ‍ॅजिलस डायग्नोस्टिक्स फडके लॅबचे प्रमुख डॉ. अविनाश फडके यांचं मोलाचे सहकार्य लाभले. अर्थसंकेत आणि 'हिंदुस्थान पोस्ट' हे या उपक्रमाचे आऊटरिच पार्टनर आहेत.

56

जागतिक आरोग्य दिनानिमित्त (World Health Day) रचना आर्टस् अँड क्रीएशन (Rachna Arts and Creation) तर्फे २ एप्रिल ते ७ एप्रिल दरम्यान आरोग्यम धनसंपदा सप्ताह आयोजित करण्यात आला आहे.  या सप्ताहात मोफत आरोग्य शिबीर, चर्चासत्रे आणि आरोग्यविषयक उपक्रमांची मालिका सुरु आहे. शनिवार, ५ एप्रिल या दिवशी दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात मोफत रक्त तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. याचा २०० जणांनी लाभ घेतला.

यावेळी बाजारात ज्या रक्त तपासणीच्या चाचण्यांसाठी दीड ते दोन हजार रुपये लागतात, त्या चाचण्या केवळ २०० रुपयांत करण्यात आल्या. त्यामुळे या रक्त तापण्याचा लाभ घेतलेल्या नागरिकांनी आयोजकांचे आभार मानले. यावेळी जागतिक आरोग्य दिनानिमित्त रचना आर्टस् अँड क्रीएशन (Rachna Arts and Creation) तर्फे ‘आरोग्यम धनसंपदा’ या साप्ताहिक कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या आयोजक रचना लचके- बागवे आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्यवाह राजेंद्र वराडकर उपस्थित होते. या रक्त तपासणी उपक्रमासाठी अ‍ॅजिलस डायग्नोस्टिक्स फडके लॅबचे (Agilus Diagnostics Phadke Lab) प्रमुख डॉ. अविनाश फडके (Dr. Avinash Phadke) यांचं मोलाचे सहकार्य लाभले. अर्थसंकेत आणि ‘हिंदुस्थान पोस्ट’ हे या उपक्रमाचे आऊटरिच पार्टनर आहेत. (World Health Day)

या उपक्रमाला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. दीडशे लोकांनी यासाठी ऑनलाईन नोंदणी केली होती. परंतु ऑफलाईनही ५० हुन अधिक नागरिकांनी लाभ घेतला. अशा प्रकारे २०० जणांनी यांचा लाभ घेतला. जागतिक आरोग्य दिनाच्या (World Health Day) निमित्ताने प्रथमच ‘आरोग्यम धनसंपदा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहाच्या निमित्ताने मोफत आरोग्य शिबीर, चर्चासत्रे आणि आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
–  रचना लचके- बागवे, आयोजक, आरोग्यम धनसंपदा

सात दिवस चाललेल्या या उपक्रमात आरोग्य तपासणी आणि मानसिक आरोग्य या महत्वाच्या बनलेल्या मुद्यावर मार्गदर्शन, चर्चा आणि उपाय- योजना सांगितल्या जातील. नेत्रतपासणी शिबिरात काचबिंदू, मोतीबिंदू किंवा मॅक्युलर डीजनरेशन आणि अन्य डोळ्यांच्या समस्यांवर तपासणी केली जात आहे. महिलांना जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर आरोग्य कसे राखायचे याबद्दल जागृकता निर्माण करण्यासाठी सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये हार्मोनल असंतुलन, प्रजनन आरोग्य आणि प्रतिबंधात्मक काळजी कशी घ्यायची हे सांगितले जाईल. अ‍ॅक्युपंक्चर आणि अ‍ॅक्युप्रेशर या प्राचीन पद्धती आहेत ज्या दीर्घकालीन आजारणावर उपयुक्त असतात, त्यामुळे विशेष सत्र आरोग्य सप्ताहात असणार आहे. अ‍ॅक्युपंक्चर आणि अ‍ॅक्युप्रेशर च्या साहायाने बरेच जण आपल्या वेदना कमी झाल्याचे सांगतात त्या सर्वांसाठी हे सत्र आहे. (World Health Day)

जागतिक आरोग्य दिनानिमित्ताने (World Health Day) आयोजित ‘आरोग्यम धनसंपदा’ या सप्ताहाच्या निमित्ताने स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात शनिवारी मोफत रक्त तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. या निमिताने तरुणांचे आरोग्य उत्तम रहावे. तरुण शक्तीचे आरोग्य उत्तम असले तर देशाचे आरोग्य सुदृढ बनेल. तसेच रक्त तपासणी शिबिराच्या निमित्ताने ज्येष्ठ नागरिकांचेही आरोग्य उत्तम राहणार आहे. हा उपक्रम स्तुत्य आहे.
– राजेंद्र वराडकर, कार्यवाह, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक.

(हेही वाचा Kokan Properties : ‘कोकणात घर गुंतवणूक नव्हे गरज’; मुंबईत ‘कोकण प्रॉपर्टीज’ प्रदर्शनाला मुंबईकरांचा उत्तम प्रतिसाद)

जागतिक आरोग्य दिनी (World Health Day) ७ एप्रिलला सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी दोन परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. मधुमेहाविषयी डॉ. अविनाश फडके आणि डॉ. मनीषा तालीम या संवाद साधतील. डॉ. भूषण लचके हे मान्यवरांशी संवाद साधतील. ओबेसिटी आणि लाइफस्टाइल डिसऑर्डर याविषयी डॉ. पुष्कर शिकारखाने (Dr. Pushkar Shikarkhane) आणि डॉ. श्रीनिवास कुडवा या परिसंवादात सहभागी होतील. डॉ. भूषण लचके (Dr. Bhushan Lachke) हे तज्ञांशी संवाद साधतील. मधुमेह आणि स्थूलता या दोन आजारांवर वेळीच कसे उपाय करायचे, त्यांना प्रतिबंधित कसे करता येईल यावर विचारमंथन होईल. सोबतच आरोग्य दिनाचे औचित्य साधत डॉक्टर, नर्स ,वॉर्ड बॉय, रुग्णवाहिका सेवक आणि सर्व आरोग्यदूतांचा सन्मान या दिवशी करण्यात येणार आहे. अवयव दान आणि शरीर दानाचा प्रसार देखील या कार्यक्रमात करण्यात येणार आहे.

आरोग्य धनसंपदा सप्ताहाचे वेळापत्रक :

  • २ एप्रिल २०२५: वाशी येथील इन्फिगो आय केअर येथे मोफत डोळ्यांची तपासणी ( वेळ सकाळी १० ते सायंकाळी ५ )
  • ३ एप्रिल २०२५:दिवाईन हेल्थकेयर सेंटर, भांडुप ईस्ट येथे महिला आरोग्य तपासणी आणि चर्चासत्र ( वेळ दुपारी ३ ते सायंकाळी ७ ) ( १९९ रुपये )
  • ४ एप्रिल २०२५: ई-बायोटोरियम, दादर येथे ताण आणि चिंता व्यवस्थापनावर मानसिक आरोग्य जागरूकता सेमिनार ( वेळ दुपारी ४ ते सायंकाळी ७ )
  • ५ एप्रिल २०२५: अ‍ॅजिलस डायग्नोस्टिक्स फडके लॅब,दादर येथे माफक दरात रक्त चाचणी ( २०० रुपये ) ( वेळ सकाळी ७ ते सकाळी ११ )
  • ६ एप्रिल २०२५: दादर पश्चिम येथील वीरा विहार येथे मोफत अ‍ॅक्युप्रेशर आणि कान अ‍ॅक्युपंक्चर ( वेळ सकाळी १० ते दुपारी ४ )
  • ७ एप्रिल २०२५: इन्स्टिटयूट ऑफ केमिकल टेकनॉलॉजि, माटुंगा येथे जागतिक आरोग्य दिन सोहळा ( वेळ सायंकाळी ५ ते सायंकाळी ७ :३० )

वरील सर्व सत्रात नाव नोंदणी करण्यासाठी संपर्क करा : ८४५९१४८९१४ / ९९३००२६०२०

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.