Bloomberg Billionaires Index : श्रीमंतांच्या यादीत फेसबुकच्या मार्क झुकरबर्ग यांची तिसऱ्या स्थानावर झेप

Bloomberg Billionaires Index : २०२४ मध्ये झुकरबर्ग यांच्या मालमत्तेत ७१ अब्ज अमेरिकन डॉलरची वाढ.

117
Bloomberg Billionaires Index : श्रीमंतांच्या यादीत फेसबुकच्या मार्क झुकरबर्ग यांची तिसऱ्या स्थानावर झेप
  • ऋजुता लुकतुके

ब्लूमबर्गच्या अब्जाधीशांच्या यादीत मेटा कंपनीचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांनी मोठी मुसंडी घेतली आहे. २०२४ या एका वर्षात त्यांच्या मालमत्तेत ७१ अब्ज अमेरिकन डॉलरनी वाढ झाली आहे. त्या जोरावर त्यांनी अब्जाधीशांच्या यादीत तिसरं स्थान मिळवलं आहे. पहिल्या स्थानावर टेस्लाचे एलॉन मस्क कायम आहेत. तर दुसऱ्या स्थानावर ॲमेझॉनचे जेफ बेझॉस आहेत. (Bloomberg Billionaires Index)

(हेही वाचा – Sleep Internship Program मध्ये झोपेतच केली ९ लाखांची कमाई)

ब्लूमबर्गने याच आठवड्यात आपली अब्जाधीशांची यादी अपडेट केली आहे. यात एलन मस्क २६८ अब्ज डॉलर्ससह पहिल्या स्थानावर आहे. तर, जेफ बेजोस यांची एकूण मालमत्ता २१६ अब्ज अमेरिकन डॉलर इतकी आहे. तिसऱ्या स्थानावरील मार्क झुकरबर्ग यांची एकूण मालमत्ता २०० अब्ज अमेरिकन डॉलर इतकी आहे. मार्क झुकरबर्गच्या संपत्तीमध्ये ७१ अब्ज डॉलरची वाढ झाली आहे. तर, जेफ बेजोसची संपत्ती ३९.३ अब्ज डॉलरनी आणि मस्क यांची संपत्ती ३८.९ अब्ज अमेरिकन डॉलरनी वाढली आहे. झुकरबर्ग मेटा या आपल्या कंपनीतर्फे फेसबुक, व्हाटसअप, इन्स्टाग्राम आणि थ्रेडस हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म चालवतात. (Bloomberg Billionaires Index)

(हेही वाचा – रेशीमबाग ते केशवकुंज; RSS चे मुख्यालय दिल्लीत?)

लुई व्हितॉचे अध्यक्ष बर्नार्ड अरनॉल्ट यंदा २०० अब्ज अमेरिकन डॉलरच्या क्लबपासून थोडे दूर राहिले आहेत. सध्या त्यांची एकूण मालमत्ता १८३ अब्ज अमेरिकन डॉलर इतकी आहे. डेटाबेस कंपनी ओरॅकलचे लॅरी एलीसन यांची संपत्ती १८९ अब्ज अमेरिकन डॉलर इतकी आहे. बर्नार्ड अरनॉल्टच्या संपत्तीत २४.२ अब्ज डॉलरची घट झाली आहे. ब्लूमबर्ग अब्जाधीशांच्या यादीत समावेश असलेले भारतीय आहेत मुकेश अंबानी आणि गौतम अदानी. मुकेश अंबानी यांची संपत्ती ११३ अब्ज अमेरिकन डॉलर इतकी आहे. तर अदानी समुहाचे गौतम अदानी यांची संपत्ती १०५ अब्ज अमेरिकन डॉलर इतकी आहे. अंबानी यांच्या संपत्तीत १६.७ अब्ज डॉलरची तर अदानी यांच्या संपत्तीत १६.७ अब्ज अमेरिकन डॉलरची वाढ झाली आहे. (Bloomberg Billionaires Index)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.