Blue Whale Game: भारतात बंदी घातलेल्या ब्लू व्हेल गेमने ८ वर्षानंतर पुन्हा काढलं डोकं वर!

256
Blue Whale Game: भारतात बंदी घातलेल्या ब्लू व्हेल गेमने ८ वर्षानंतर पुन्हा काढलं डोकं वर!
Blue Whale Game: भारतात बंदी घातलेल्या ब्लू व्हेल गेमने ८ वर्षानंतर पुन्हा काढलं डोकं वर!

ब्लू व्हेल चॅलेंज (Blue Whale Game) हा एक आत्मघाती मोबाइल गेम आहे, ज्यामध्ये खेळाडूंना प्रतिस्पर्ध्याकडून काही आव्हाने दिली जातात. ही आव्हाने खूप कठीण असतात, ज्यात खेळाडूंना आपला जीवही गमवावा लागतो. ब्लू व्हेल चॅलेंजमध्ये एकूण 50 स्तर आहेत. उदाहरणार्थ, हातावर ब्लेडने शेप बनवणे, रात्री घरातून एकटे बाहेर पडणे, स्वतःला त्रास देणे आणि आत्महत्या करणे हे शेवटचे आव्हान आहे. मोबाईलमध्ये एकदा इन्स्टॉल केल्यानंतर ते पूर्ण होईपर्यंत काढता येत नाही. रशियाच्या फिलिप बुडेकिनने (Philip Budekin) 2013 मध्ये हा गेम (Blue Whale Game) तयार केला होता. खेळताना आत्महत्या केल्याची पहिली घटना 2015 साली नोंदवण्यात आली होती. भारतात यासंबंधी अनेक प्रकरणे नोंदविण्यात आल्यानंतर गेमवर बंदी घालण्यात आली होती. मात्र, आता पुन्हा या गेमने डोकं वर काढलं आहे. (Blue Whale Game)

 

image 2024 05 06T083103.548

 

(हेही वाचा –Lok Sabha Election : शिवसेना असली-नकली ठरवणारी निवडणूक, मुख्यमंत्री शिंदे यांच्या अस्तित्वाची लढाई)

ब्लू व्हेल गेमची प्रकरणे

१. ब्लू व्हेल गेममुळे (Blue Whale Game) मृत्यूची पहिली घटना हिमाचल प्रदेशातून समोर आली आहे होती. या गेममुळे 10 वर्षीय मुलाने आत्महत्या केली होती. मृत्युनंतर मुलाजवळ एक चिठ्ठी सापडली होती. त्यात लिहीले होते की, ‘मला एक कोडे सोडवता न आल्याने मी आत्महत्या करत आहे.’ यानंतर हे प्रकरण ब्लू व्हेल गेमचे असल्याचे समोर आले. (Blue Whale Game)

(हेही वाचा –Temple : श्री देव बोडगेश्वर मंदिरातील चोरी प्रकरणी एका बांगलादेशीसह ६ मुसलमानांची टोळी पोलिसांच्या ताब्यात)

२. ब्लू व्हेल (Blue Whale Game) या आत्मघातकी गेममुळे अमेरिकेत एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. ज्यामध्ये ब्लू व्हेल चॅलेंज गेमचे नाव समोर येत आहे. अमेरिकेतील मॅसॅच्युसेट्स विद्यापीठात शिकणाऱ्या एका 20 वर्षीय विद्यार्थ्याचा मृतदेह विद्यापीठाजवळील जंगलात सापडला. पोलिस अहवालात असे म्हटले आहे की, विद्यार्थ्याने दोन मिनिटे श्वास घेणे थांबवले होते, ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला. या मृत्यूचे कारण ब्लू व्हेल चॅलेंज मोबाइल गेम असू शकते, ज्यामध्ये विद्यार्थ्याला श्वास रोखण्याचे आव्हान दिले गेले असावे. (Blue Whale Game)

ब्लू व्हेल हा गेम नसून एक सापळाच

किशोरवयीन मुले ब्लू व्हेलच्या (Blue Whale Game) जाळ्यात फसत असून याला गेम समजत आहेत. मात्र प्रत्यक्षात तो गेम नाही की ॲपही नाही. हा गुन्हेगारी प्रकारातील लोकांचा सापळा आहे, ज्यांनी आतापर्यंत जगभरात 130 हून अधिक लोकांचा जीव घेतला आहे. नकळत लहान मुले सहज याला बळी पडत आहेत. सरकारने प्रमुख सर्च इंजिन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना हा गेम डाउनलोड करण्याशी संबंधित लिंक काढून टाकण्यास २०१७ मध्ये सांगितले होते. तत्कालिन मंत्रालयाचे वरिष्ठ संचालक अरविंद कुमार यांनी जारी केलेल्या सूचनांमध्ये, ब्लू व्हील चॅलेंज गेमशिवाय, समान नावांच्या ऑनलाइन गेमच्या लिंक्स देखील काढून टाकण्यास सांगितले होते. त्यानंतर ब्लू व्हेलवर बंदी घालण्यात आली. परंतु लोकांकडे अजूनही त्याच्या काही लिंक्स आहेत, ज्यामुळे हे घडत असल्याचे सांगण्यात येत आहे. (Blue Whale Game)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.