मुंबईत एकाच दिवसात ३६१० नवे रुग्ण! बाबांनो, आता तरी मास्क लावा!

मागील दहा ते बारा दिवसांपासून कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होण्यास सुरुवात झाली असली तरी मागील चार दिवसांमध्ये प्रत्येक दिवशी हजारांहून अधिक बाधित रुग्ण आढळून येऊ लागले आहेत. मागील दोन ते तीन दिवसांमध्ये १०० ते  १५० टक्क्यांनी रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचे पहायला मिळत आहे. गुरुवारी दिवसभरात बुधवारच्या २ हजार ५१० रुग्णांच्या तुलनेत गुरुवारी ३ हजार ६७० रुग्ण आढळून आले आहे. मात्र, गुरुवारी एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नसून डिसेंबर महिन्यातच मृत्यूने शुन्याचा आकडा गाठण्याची किमया सातव्यांदा गाठली आहे.

मंगळवारी दिवसभरात ३२ हजार ३६९ चाचणी केल्यानंतर १ हजार ३७७ बाधित रुग्ण आढळून आले होते, तर बुधवारी  ५१ हजार ८४३ चाचण्या करण्यात आल्यानंतर २ हजार ५१० रुग्ण आढळून आले  होते. तर, गुरुवारी दिवसभरात ४६ हजार ३३६ चाचण्या करण्यात आल्यानंतर ३ हजार ६७१  नवीन रुग्ण आढळून आले आहेत. मात्र, या तिन्ही दिवसांमध्ये सरासरी १२०० ते १३०० रुग्णवाढ झाल्याचे पहायला मिळत आहे. तर दिवसभरात ३५१ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर बुधवारी मुंबईतील विविध कोविड सेंटर आणि रुग्णालयांमध्ये  ८ हजार ६० रुग्ण उपचार घेत होते, ही संख्या गुरुवारी  ११ हजार ३६०वर पोहोचली आहे. रुग्ण दुपटीचा दर हा ५०५ दिवस एवढा आहे.

डिसेंबरमध्ये सातव्यांदा मृत्यू शुन्यात

कोविडच्या विषाणूचा प्रादुर्भाव झाल्यानंतर डिसेंबर पूर्वी दोन शुन्यात मृत्यूचा आकडा आला होता, परंतु डिसेंबर महिन्यातच सातव्यांदा मृत्यूचा आकडा शुन्यावर आला आहे. त्यामुळे शुन्यावर मृत्यूचा आकडा आला असला तरी बाधित रुग्णांचा वाढता आकडा हा पुन्हा एकदा भीती निर्माण करणारा ठरत आहेत.

मुंबईतील ४ झोपडपट्या कंटेन्मेंट झोन

मुंबईत मागील अनेक महिन्यांपासून झोपडपट्यांमधून कोरोनाचा आजार हद्पार झाल्याचे दिसून येत होते. परंतु मागील अनेक महिन्यांमध्ये झोपडपट्टयांमधून बाधित रुग्ण आढळून येत नसले तरी दोन ते तीन दिवसांपासून पुन्हा झोपडपट्टयांमध्ये रुग्ण आढळून येवू लागले. त्यामुळे मुंबईत एकच झोपडपट्टी कंटेन्मेंट झोनमध्ये असताना आता ही संख्या चारवर पोहोचली आहे. सीलबंद इमारतींच्या संख्येतही दुपटीने वाढ होत ४५ वरून ही संख्या ८८ वर पोहोचली पोहोचली आहे.

मागील बारा दिवसांमधील बाधित रुग्णांची आकडेवारी

 • ३० डिसेंबर २१: चाचण्या ४६,३३६, बाधित रुग्ण- ३६७१, मृत्यू-०,बरे झालेले रुग्ण- ३७१
 • २९ डिसेंबर २१: चाचण्या ५१, ८४३, बाधित रुग्ण- २५१०, मृत्यू-१,बरे झालेले रुग्ण- २५१
 • २८ डिसेंबर २१ : चाचण्या -३२,३६९, बाधित रुग्ण – १३७७, मृत्यू -१, बरे झालेले रुग्ण -३३८
 • २७ डिसेंबर २१ : चाचण्या -४३,३८३, बाधित रुग्ण – ८०९, मृत्यू -३, बरे झालेले रुग्ण -३३५
 • २६ डिसेंबर २१ : चाचण्या -३४,८१९, बाधित रुग्ण – ९२२, मृत्यू -२, बरे झालेले रुग्ण -३२६
 • २५डिसेंबर २१ : चाचण्या -४२,४२७ बाधित रुग्ण – ७५७, मृत्यू -०, बरे झालेले रुग्ण -२८०
 • २४ डिसेंबर २१ : चाचण्या -४०,४७२, बाधित रुग्ण – ६८३, मृत्यू -१, बरे झालेले रुग्ण -२६७
 • २३ डिसेंबर २१ : चाचण्या -३९,४२३, बाधित रुग्ण – ६०३, मृत्यू -१, बरे झालेले रुग्ण -२०७
 • २२ डिसेंबर २१ : चाचण्या -४५,०१४, बाधित रुग्ण – ४०९, मृत्यू -०, बरे झालेले रुग्ण -२२९
 • २१ डिसेंबर २१ : चाचण्या – ३७,९७३, बाधित रुग्ण – ३२७, मृत्यू -१, बरे झालेले रुग्ण -२२७
 • २० डिसेंबर २१ : चाचण्या -३०,६७२, बाधित रुग्ण – २०४, मृत्यू -०, बरे झालेले रुग्ण -२२९
 • १९ डिसेंबर २१ : चाचण्या -४०,८५७, बाधित रुग्ण – ३३६, मृत्यू -२, बरे झालेले रुग्ण -२०१

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here