BMC : महापालिकेने मोफत प्रशिक्षण आणि परवाने दिलेल्या ५० महिलांना रिक्षाचे वाटप

1520
BMC : महापालिकेने मोफत प्रशिक्षण आणि परवाने दिलेल्या ५० महिलांना रिक्षाचे वाटप
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई

मुंबई महानगरपालिका, केंद्र सरकार पुरस्कृत दीनदयाल अंत्योदय योजना अंतर्गत स्थापन नारी शहर समूह-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान आणि टीव्हीएस यांच्या संयुक्त विद्यमाने एकूण ५० महिलांना स्वयंरोजगारासाठी प्रवासी रिक्षा वाटप करण्यात आल्या. मुंबई महानगरपालिकेकडून यासाठी महिलांना रिक्षा चालविण्याचे प्रशिक्षण आणि सर्व प्रकारचे परवाने मोफत देण्यात आले होते. त्यानुसार या महिलांना बँकेचे कर्ज कमी व्याजदरात उपलब्ध करून दिल्यानंतर या रिक्षा प्रवासी वाहतुकीसाठी सज्जा झाल्या आहे. या ५० महिलांपैकी बहुतांश महिलांमध्ये या भांडूप आणि कुर्ला परिसरातील महिलांचा समावेश आहे. (BMC)

New Project 2025 04 09T194819.031

कुर्ला येथील नेहरू नगरातील मुंबई पब्लिक स्कूलमध्ये मंगळवारी ८ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी हा कार्यक्रम पार पडला. परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे मान्यवरांच्या उपस्थितीत या ५० रिक्षांना हिरवा झेंडा दाखविण्यात आला. ‘वुमेन्स ऑन व्हिल’ या महत्वाकांक्षी उपक्रम अंतर्गत या रिक्षांचे वितरण करण्यात आले. आमदार मंगेश कुडाळकर, दिव्याज फाऊंडेशनच्या अध्यक्षा अमृता फडणवीस, मुंबई महानगरपालिकेच्या संचालक (नियोजन) डॉ. प्राची जांभेकर आदींसह महिला बचत गटाच्या सदस्यांच्या उपस्थितीत या रिक्षांचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला टिव्हीएसचे अधिकारी निशांत दास, अभ्युदय बँकेच्या सहाय्यक महाव्यवस्थापक प्रिती सावंत आदींसह बचत गटाच्या महिला उपस्थित होत्या. (BMC)

(हेही वाचा – Property Tax : विक्रमी मालमत्ता कर वसूल; करनिर्धारण आणि संकलन विभागाच्या अधिकाऱ्यांचा आयुक्त्तांच्या हस्ते गौरव)

मुंबईतील होतकरू महिलांचे आर्थिक सशक्तीकरणासाठी मुंबई महानगरपालिका महिलांना वेगवेगळे व्यासपीठ उपलब्ध करून देत असते. त्यामुळे बचत गटांना विविध माध्यमातून रोजगार उपलब्ध होतो. त्याचाच एक भाग म्हणून आता महिलांना बँकांकडून कमी व्याजदरावर या रिक्षा उपलब्ध करून देण्यात आल्या. या रिक्षांतून महिला प्रवाशी वाहतूक करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. त्यासाठी महिलांना वाहन चालविण्याचे प्रशिक्षण, आवश्यक परवाने, रिक्षा नोंदणी बिल्ला इत्यादी सर्व सुविधा पूर्णपणे मोफत उपलब्ध करून देण्यात आल्या. (BMC)

New Project 2025 04 09T194940.527

या ५० महिलांपैकी बहुतांश महिला या भांडूप आणि कुर्ला परिसरातील रहिवासी आहेत. रिक्षा चालक लाभार्थी सविता तावरे यांनी स्वतः रिक्षा चालवत दिव्याज फाऊंडेशनच्या अध्यक्षा अमृता फडणवीस आणि आमदार मंगेश कुडाळकर यांना छत्रपती शिवाजी महाराज मैदानात आणले. मुंबई महानगरपालिकेकडून या प्रकल्प अंतर्गत महिलांना रिक्षा चालविण्याचे प्रशिक्षण तसेच शिकाऊ परवाना, कायमस्वरूपी परवाना, वाहन नोंदणी, परवाना आणि परवाना प्रमाणपत्र (परमिट) या सुविधा मोफत देण्यात आल्या. या योजनेचा मुख्य उद्देश महिलांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आणि त्यांना स्वावलंबी बनविणे हा आहे. या उपक्रमासाठी नारी शहर समूह, टीव्हीएस मोटर कंपनी आणि सीजी कॉर्पोरेशन यांचे सहकार्य लाभले आहे. (BMC)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.