-
विशेष प्रतिनिधी, मुंबई
मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) माध्यमातून पूर्व उपनगरातील विक्रोळी, कांजूरमार्ग, भांडूप परिसरातील महिला व बालकांसाठी स्पेशालिटी रूग्णालयाचे भूमिपूजन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या हस्ते कांजूरमार्ग (पूर्व) येथे रविवारी १३ ऑक्टोबर २०२४ रोजी पार पडले. या अद्ययावत रूग्णालयाच्या रुपाने एस विभागातील नागरिकांना आपल्या घरानजीक विविध स्वरूपाच्या मोफत वैद्यकीय सुविधा उपलब्ध होणार आहे.
या प्रसंगी खासदार नरेश म्हस्के, माजी आमदार मंगेश सांगळे, अशोक पाटील, श्याम सावंत, माजी नगरसेविका सुवर्णा करंजे, सारिका मंगेश पवार, भाजपचे ईशान्य मुंबई जिल्हाध्यक्ष दळवी यांच्यासह विविध मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे याप्रसंगी बोलतांना म्हणाले की, मुंबईत नागरिकांना मोफत वैद्यकीय सुविधेसाठी सुमारे २५० हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करण्यात आले आहेत. महानगरपालिकेच्या मोठ्या रूग्णालयांच्या ठिकाणी मोफत आणि कॅशलेस असे वैद्यकीय उपचार देण्यासाठी झिरो प्रिस्क्रीप्शन धोरण राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे वैद्यकीय सुविधेत रूग्णांना औषधांची खरेदी करण्याची गरज भासणार नाही. रुग्ण सेवा हे प्रथम कर्तव्य मानून शासनाने वेगवेगळ्या योजना अंमलात आणल्या आहेत, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी नमूद केले.
स्पेशालिटी रूग्णालय विषयी संक्षिप्त माहिती –
महानगरपालिकेच्या एस विभाग अंतर्गत कांजूरमार्ग (पूर्व) (कांजूर गाव) येथे माता व बालकांसाठी सहा मजली स्पेशालिटी रूग्णालय उभारण्यात येणार आहे. एकूण ९० रूग्णशय्या क्षमतेचे हे रूग्णालय असणार आहे. इमारतीचा बांधकाम पूर्ण करण्याचा नियोजित कालावधी ३३ महिने इतका आहे.
(हेही वाचा – Pandharpur येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिराची दर्शन रांग होणार अधिक सुसज्ज ; सरकारची ‘एवढ्या’ कोटींची तरतूद)
रूग्णालयाच्या ठिकाणी विभाग रचना –
आय. व्ही.एफ प्रयोगशाळा, निदान विभाग, बाह्य रूग्ण विभाग, शस्त्रक्रियागृह, प्रसुति विभाग (०२), बाल / शिशु चिकित्सा विभाग, वैद्यकीय विभाग, शस्त्रक्रिया पूर्व निरीक्षणालय विभाग, शस्त्रक्रिया पश्चात निरीक्षणालय, शस्त्रक्रियागृह (५), प्रतीक्षालय अशा प्रकारची या इमारतीत विभाग रचना असेल.
नवजात बालकांसाठी (एनआयसीयू) ची सुविधा..
विक्रोळी, कांजूरमार्ग, भांडूप परिसरातील नागरिकांकडून या रूग्णालयाची मागणी होत होती. या मागणीच्या पूर्ततेमुळे गरोदर स्त्रियांना प्रसूतिसाठी अद्यावत सुविधेचे रूग्णालय उपलब्ध होईल. तसेच बालकांसाठीही बाह्यरुग्ण विभागाच्या माध्यमातून वैद्यकीय उपचार उपलब्ध होणार आहेत. तसेच स्पेशालिटी रूग्णालय अंतर्गत नवजात बालकांसाठी (एनआयसीयू) ची सुविधा मिळणार आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community