मुंबईतील विविध विभागांमध्ये होणाऱ्या पावसाची नोंद अचूक करता यावी यासाठी महापालिकेच्यावतीने आणखी ६० ठिकाणी स्वयंचलित हवामान दर्शक यंत्र बसवली जाणार आहेत. सध्या मुंबईमध्ये ६० अशाप्रकारची हवामान दर्शक यंत्रे बसवण्यात आलेली असून यासर्व जागांमधील पोकळी शोधून त्या जागांच्या ठिकाणी ही यंत्रे बसवण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईतील प्रत्येक ठिकाणी पावसाळ्यात किती पाऊस पडला याची अचूक माहिती नोंदवली जाईल आणि ज्या भागांमध्ये अधिक पावसाची नोंद असेल त्याठिकाणी महापालिकेच्या संबंधित विभाग कार्यालयातील आपत्कालिन नियंत्रण कक्षासह विभाग कार्यालयातील कर्मचाऱ्यांना अलर्ट करत उपाययोजना हाती घेतल्या जातील, अशी माहिती मिळत आहे.
सन २०१८ मध्ये भारत सरकारच्या पृथ्वी व विज्ञान विभागामार्फत नॅशनल सेंटर फॉर कोस्टल रिसर्व या संस्थेस मुंबई शहराला अतिवृष्टीमुळे होणा-या पुराची पूर्वसूचना देणारी प्रणाली विकसीत करण्याचे आदेश देण्यात आले होते. या अनुषंगाने सन – २०१९ मध्ये एनसीसीआर ने इंटीग्रेटेड फ्लड वॉर्निंग सिस्टीम ही प्रणाली विकसीत करून कार्यान्वित करण्यात आली होती. मात्र, या प्रणालीमार्फत प्राप्त होणारा अहवाल आणि प्रत्यक्ष पाणी साचण्याची ठिकाणे यामध्ये तफावत आढळून आली. त्यामुळे ही तफावत दूर करण्यासाठी अतिरिक्त ६० हवामान दर्शक यंत्रणा बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
(हेही वाचा BMC : खासदार शिंदे यांची महापालिका आयुक्तांना सूचना; मुख्यमंत्र्यांना स्पष्ट करावी लागली अखेर सरकारची भूमिका)
सध्या मुंबईमध्ये महानगपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागामार्फत मुंबई शहरात पडणारा पाऊस तसेच इतर महत्वाचे वातावरणीय घटकांची अद्ययावत माहिती दर १५ मिनीटांनी आपत्कालीन नियंत्रण कक्षास तसेच नागरीकांस उपलब्ध व्हावी याकरिता ६० स्वयंचलित हवामानदर्शक यंत्रण बसवण्यात आले आहेत. या हवामानदर्शक यंत्रणेची अद्ययावत माहिती बाह्य यंत्रणेमार्फत उभारण्यात आलेल्या इंटरनेट क्लाऊड सर नोंदविण्यात येते व क्लाऊड मार्फत ही माहिती नियंत्रण कक्ष व नागरीकाना आपत्कालीन व्यवस्थापनाच्या संकेतस्थळ व मोबाईल ऍप द्वारे उपलब्ध करण्यात येते.
साठण्याचे ठिकाणे यामध्ये तफावत आढळून आली, त्याअनुषंगाने एनसीसीआर, चेन्नई यांनी केलेल्या त्यामुळे अतिरिक्त ६० स्वयंचलित हवामान दर्शक यंत्र ३ वर्षाच्या हमी कालावधीसहित पुरवठा करण्यासह उभारणी करण्यासाठी निविदा मागवली होती. यासाठी डायनॉकॉन्स सिस्टम्स एँड सोल्यूशन ही कंपनी पात्र ठरली असून यासाठी १७ कोटी ७८ लाख रुपये खर्च केले जाणार आहे.
Join Our WhatsApp Community