BMC Action : सोने-चांदी गलाई व्यावसायिकांच्या १२ भट्टी, धुरांडे हटवले

वायू प्रदूषणास कारणीभूत ठरत असल्याने सी विभागात महानगरपालिकेची कारवाई

2432
BMC Action : सोने-चांदी गलाई व्यावसायिकांच्या १२ भट्टी, धुरांडे हटवले
BMC Action : सोने-चांदी गलाई व्यावसायिकांच्या १२ भट्टी, धुरांडे हटवले
मुंबईतील सी विभागात नागरी वस्तीत असलेल्या सोने-चांदी (gold and silver) गलाई (BMC Action) व्यावसायिकांच्या बारा भट्टी, धुराडे काढून टाकण्याची कारवाई मुंबई महानगरपालिकेच्या (Municipal Corporation) वतीने करण्यात आली आहे. (BMC Action) वायू प्रदूषणास कारणीभूत ठरत असल्याने सी विभागातील पटवा चाळ आणि तेली गल्ली ( Patwa Chawl and Teli Galli) येथील सोने-चांदी वितळवणाऱया अर्थात गलाई व्‍यावसायिकांचे एकूण १२ धुराडे (चिमणी) आदींवर कारवाई करण्यात आली आहे. (BMC Action)
मुंबई महानगरातील (Municipal Corporation) वायू प्रदूषण (air pollution) व धूळ नियंत्रणासाठी (BMC Action) महानगरपालिका प्रशासनाकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार महानगरपालिका (Municipal Corporation) प्रशासनाकडून सातत्याने कारवाई सुरु आहे. महानगरपालिका आयुक्‍त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल यांच्‍या निर्देशानुसार आणि अतिरिक्त  आयुक्त (शहर) डॉ.  अश्विनी जोशी, अतिरिक्त  आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिकेच्‍या (Municipal Corporation) सर्व २४ प्रशासकीय विभागांमध्ये उपाययोजनांची अंमलबजावणी सुरु आहे. त्यासोबतच व्यापक आरोग्य हित लक्षात घेता, वायू प्रदूषणास (air pollution) कारणीभूत ठरणा-या इतर घटकांवरही महानगरपालिका (Municipal Corporation) प्रशासनाकडून कठोर कारवाई केली जात आहे.  (BMC Action)
नागरी वस्‍तीत सोने चांदी (gold and silver) वितळवणा-या भट्टींवर (गलाई व्‍यवसाय) आणि आम्ल भट्टींवर (ऍसिड फर्नेस) महानगरपालिकेच्या सी विभाग कार्यालय अंतर्गत इमारत व कारखाने विभागाने सक्त कारवाईचा बडगा उगारला आहे. गुरुवारी २९ फेब्रुवारी २०२४ रोजी सी विभागातील पटवा चाळ आणि तेली गल्ली येथील सोने-चांदी (gold and silver) वितळवणाऱया अर्थात गलाई व्‍यावसायिकांचे एकूण १२ धुराडे (चिमणी) काढण्यात  आले आहेत. अशा प्रकारची कार्यवाही यापुढेही सुरू राहणार आहे, अशी माहिती सी विभागाचे सहायक आयुक्त उद्धव चंदनशिवे यांनी दिली. (BMC Action)
सोने-चांदी (gold and silver) गलाई व्यवसायात सोने-चांदी वितळवण्यात येते. त्यासाठी छोटेखानी स्वरुपाचा कारखाना असतो. यामध्ये सोने-चांदी (gold and silver) वितळवण्यासाठी भट्टीचा वापर केला जातो. त्‍यातून निर्माण होणारे आम्ल आणि वायू आदी चिमणी / धुराडे याद्वारे हवेत सोडले जातात. (BMC Action) शास्‍त्रीय प्रक्रिया न करता सोडण्‍यात आलेल्‍या वायूमुळे मानवी आरोग्‍याला धोका पोहोचतो. या घातक वायूमुळे प्रदूषणात भर पडत असल्‍याने बृहन्‍मुंबई महानगरपालिकेने वायू प्रदूषण (air pollution) नियमांचे उल्लंघन करणाऱ्या गलाई व्‍यावसायिकांविरोधात सक्त कारवाई केली आहे. या अंतर्गत बारा भट्टी, धुराडे यांचे निष्‍कासन करण्यात आले. (BMC Action)
हेही पहा- 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.