मुंबईतील सी विभागात लोक वस्तीत असलेल्या सोने-चांदी गलाई व्यावसायिकांच्या चार भट्टी, धुराडे नष्ट करण्याची कारवाई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आली आहे. वायू प्रदूषणास कारणीभूत ठरत असल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. सी विभागातील धानजी मार्ग आणि मिझा मार्ग येथील सोने-चांदी वितळवणाऱ्या अर्थात गलाई व्यावसायिकांचे एकूण ४ धुराडे (चिमणी) काढून टाकण्यात आले आहेत. (BMC)
मुंबई महानगरातील वायू प्रदूषण धूळ नियंत्रणासाठी महानगरपालिका प्रशासनाने उपाययोजना आखाव्यात, अशी सूचना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महानगरपालिका प्रशासनाला केली आहे. महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल यांच्या निर्देशानुसार आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिकेच्या सर्व २४ प्रशासकीय विभागांमध्ये उपाययोजनांची अंमलबजावणी सुरु आहे. त्यासोबतच आता व्यापक आरोग्य हित लक्षात घेता, वायू प्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्या इतर घटकांवरही महानगरपालिका प्रशासनाने कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. (BMC)
(हेही वाचा – UPI Payment : युपीआय माध्यमातून चुकून पैसे वळते झाले असल्यास काय कराल?)
या निर्देशांना अनुसरुन, नागरी वस्तीत सोने चांदी वितळवणाऱ्या भट्टींवर (गलाई व्यवसाय) महानगरपालिकेच्या सी विभाग कार्यालय अंतर्गत इमारत व कारखाने विभागाने सक्त कारवाईचा बडगा उगारला आहे. सोमवारी ६ नोव्हेंबर २०२३) सी विभागातील धानजी मार्ग आणि मिझा मार्ग येथील सोने-चांदी वितवळणाऱ्या अर्थात गलाई व्यावसायिकांचे एकूण ४ धुराडे (चिमणी) काढून टाकण्यात आले आहेत. अशा प्रकारची कार्यवाही यापुढेही सुरू राहणार आहे. (BMC)
सोने-चांदी गलाई व्यवसायात सोने-चांदी वितळवण्यात येते. त्यासाठी छोटेखानी स्वरुपाचा कारखाना असतो. यामध्ये सोने-चांदी वितळवण्यासाठी भट्टीचा वापर केला जातो. त्यातून निर्माण होणारा वायू चिमणी/धुराडे याद्वारे हवेत सोडला जातो. शास्त्रीय प्रक्रिया न करता सोडण्यात आलेल्या वायूमुळे मानवी आरोग्याला धोका पोहोचतो. या घातक वायूमुळे प्रदूषणात भर पडत असल्याने मुंबई महानगरपालिकेने वायू प्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्या गलाई व्यावसायिकांविरोधात सक्त कारवाई हाती घेतली आहे. या अंतर्गत चार भट्टी, धुराडे यांचे निष्कासन करण्यात आले. (BMC)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community