-
विशेष प्रतिनिधी, मुंबई
माटुंगा रेल्वे स्थानक आणि फूल बाजार परिसरात सलग दुसऱ्या दिवशी अतिक्रमित आणि अनधिकृत स्टॉल्सवर महापालिकेच्या एफ उत्तर विभागाने केली. सलग दुसऱ्या दिवशी अशाप्रकारे ३० दुकानांवर कारवाई करण्यात आलेली आहेत. एफ उत्तर विभागाच्या सहायक आयुक्त पदी नितीन शुक्ला यांची प्रथमच नियुक्ती झाली असून आपल्या पहिल्याचे पोस्टींगमध्ये शुक्ला यांनी सिंघम स्टाईल कारवाई करण्याचे चित्र निर्माण करताना प्रत्यक्षात रस्त्यावरील हातगाड्यांसह फेरीवाल्यांवर कारवाई न करता परवानाधारक फुल विक्रेत्यांवर कारवाई केल्याने विभागातील जनतेकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. त्यामुळे सहायक आयुक्तांनी, चमको कारवाई न करता विभाग चमकवून टाकण्यासाठी कारवाई करावी अशी प्रतिक्रिया स्थानिकांकडून ऐकायला मिळत आहे. (BMC)
(हेही वाचा – Aurangzeb च्या कबरीसाठी लाखो रुपये, पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरासाठी हात आखडता)
महानगरपालिकेच्या (BMC) एफ (उत्तर) विभागाच्या वतीने सलग दुसऱ्या दिवशी माटुंगा रेल्वे स्थानक आणि भांडारकर मार्गावरील फूल बाजार परिसरात स्टॉल्सवर कारवाई करण्यात आली. या अंतर्गत अतिक्रमण झालेली आणि अनधिकृत बांधकाम असलेली ३० दुकानांवरही ही कारवाई करण्यात आली आहे. उप आयुक्त (परिमंडळ-२) प्रशांत सपकाळे, एफ (उत्तर) विभागाचे सहायक आयुक्त नितीन शुक्ला यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली. माटुंगा रेल्वे स्थानक आणि भांडारकर मार्गावरील फूल बाजार परिसरात पदपथ आणि रस्त्यांवर अतिक्रमण तसेच अनधिकृत बांधकाम होत असल्याचे निदर्शनास आले होते. या पार्श्वभूमीवर, एफ (उत्तर) विभागाच्या वतीने निष्कासन मोहीम हाती घेण्यात आली आहे. गुरुवारी ०६ मार्च २०२५) रोजी ५२ दुकानांवर निष्कासनाची कारवाई करण्यात आली होती. ही मोहीम सलग दुसऱ्या दिवशी सुरू ठेवत शुक्रवारी ०७ मार्च २०२५ रोजी आणखी ३० दुकाने तोडण्यात आली. यापैकी अतिक्रमण झालेली १४ दुकाने होती. तर, उर्वरित दुकानांवर वाढीव बांधकाम करण्यात आले होते. या कारवाईसाठी सुमारे ६५ मनुष्यबळासह १ जेसीबी व अन्य वाहने तैनात करण्यात आली होती. (BMC)
(हेही वाचा – ‘स्थगिती द्यायला मी उद्धव ठाकरे नाही’; मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांचा टोला)
विशेष म्हणजे माटुंगा येथील भांडारकर मार्गावरील फुल मार्केट हे मागील ६० ते ७० वर्षांपासून असून याठिकाणच्या अनधिकृत तथा अतिक्रमित बांधकामांवर कारवाईला कुठलाच विरोध नाही. हे स्टॉलधारक हे परवानाधारक असून त्यांना नोटीस देवूनही यावर काराई करता येऊ शकते. परंतु माटुंगा पूर्व परिसरातील रुईया आणि पोद्दार महाविद्यालयासह माटुंगा मार्केट, गांधी मार्केट, डॉन बॉस्को आदी ठिकाणी मोठ्याप्रमाणात फेरीवाल्यांचे अतिक्रमण सुरु आहे. पदपथांवर स्टॉल्स टाकले गेले आहेत. त्या अनधिकृत स्टॉल्सवर कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाही. हातगाड्या आणि खाद्या पदार्थांच्या स्टॉल्यमुळे पदपथ अडले गेले आहेत आणि यासाठी वाहने रस्त्यावर लावली जात असल्याने तिथे वाहतूक कोंडी होते. ही प्रमुख समस्या असताना त्यावर महापालिकेच्या (BMC) नवनियुक्त शुक्ला यांना कारवाई करता येत नाही आणि जे परवानाधारक आहेत त्यांच्यावर ते कारवाई करत आहेत. त्यामुळे नवीन सहायक आयुक्तांनी चमकण्यासाठी कारवाई करु नये तर विभाग चमकून टाकण्यासाठी कारवाई करावी अशी प्रतिक्रिया भाजपाच्या माजी नगरसेविका नेहल शाह यांनी दिली आहे. फुल विक्रेते हे परवानाधारक असल्याने तसेच त्यांचा कुणालाही त्रास नसतानाही ही कारवाई झाली, परंतु ही कारवाई नोटीस देऊनही करता आली असती, असे त्या म्हणाल्या. (BMC)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community