मालाडच्या समुद्र किनारी वसलेल्या मढ मार्वे परिसरातील ४९ बंगले तसेच स्टुडीओ हे बेकायदेशी बांधल्याचा आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्यांनी केल्यानंतर आता पहिल्या टप्प्यात ६ बेकायदेशीर बंगल्यांवर कारवाईची प्रक्रिया सुरु झाली आहे. त्या अंतर्गत मढ मधील भाटीया बंगल्यावर महापालिकेच्या पी उत्तर विभागाच्या माध्यमातून कारवाई करण्यात आली. मागील अनेक वर्षांपासून भाटीया बंगल्यांवर मालिकांचे शुटींग केले जाते आणि काही नावाजलेल्या मालिकांसह चित्रपटांचे शुटींग या बंगल्यात पार पडले होते.
( हेही वाचा : मला जेलमध्ये टाकण्यासाठी उद्धव ठाकरेंची मूकसंमती होती; देवेंद्र फडणवीसांचा आरोप )
मालाड मढ मार्वे परिसरात ४९ बेकायदेशी स्टुडीओ, बंगले असून याला स्थानिक आमदाराचा आशिर्वाद असल्याचा आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला होता. किरीट सोमय्यांच्या आरोपानंतर महापालिकेने चौकशी समिती सीआरझेडचे उल्लंघन करणाऱ्या दोन स्टुडीओंवर कारवाई केली होती. त्यानंतर सोमय्यांच्या आरोपांनंतर ४९ नेमके स्टुडीओ कोणते याचा शोध घेण्यात आला. यानुसार महापालिकेने सर्व बंगल्याच्या बांधकामाचे पुरावे सादर करण्याच्या सूचना केल्या.
त्यानुसार सहा बंगल्यांच्या मालकांना पुरावे सादर करता आलेले नाही. त्यामुळे ज्या ज्या बंगल्यांना तसेच स्टुडीओंच्या बंगल्यांनी पुरावे सादर केले त्यांना वगळता ज्या सहा बंगल्यांनी पुरावे सादर केले नाही त्यांच्यावर महापालिकेच्या पी उत्तर विभागाच्यावतीने तोडक कारवाई करण्याचे काम हाती घेतले आहे.
महापालिकेच्या पी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त किरण दिघावकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या कारवाईमध्ये सोमवारी मढ येथील प्रसिध्द मालिकांचे शुटींग केल्या जाणाऱ्या भाटीया बंगल्यावर बुलडोझर चढवण्यात आला आहे. या बंगल्याच्या बांधकामावर कारवाई करण्यात आली असून टप्प्याटप्प्याने एकेक बंगल्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे पी उत्तर विभागाने स्पष्ट केले आहे. भाटीया बंगला हा जुना असला तरी बंगला मालकाला याचे पुरावे सादर करता आलेले नाही. त्यामुळे या बंगल्यावर कारवाई करण्यात आल्याचे महापालिकेने म्हटले आहे.
Join Our WhatsApp Community