मुंबईत येत्या शनिवार आणि रविवारी भारतीय हवाई दलाच्या (IAF) वतीने सुर्यकिरण एअर शो (Airshow) होणार आहे. ही हवाई प्रात्यक्षिके मरीन ड्राईव्ह (Marine Drive) येथून पाहता येणार असून यासाठी विशेष व्यवस्था करण्यात येणार आहे. भारतीय हवाई दलाच्या या कार्यक्रमाची संपूर्ण जबाबदारी मुंबई महापालिकेची राहणार आहे. हवाई प्रात्यक्षिकांच्या कार्यक्रमाची महापालिकेच्यावतीने व्यवस्था केली जाणार आहे. (BMC)
इंडियन एअर फोर्सच्या (IAF) वतीने सुर्यकिरण एअर शो चे आयोजन ११ ते १४ जानेवारी २०२३ रोजी होत असून ११ व १२ जानेवारी रोजी याचा सराव केला जाणार आहे. आणि १३ जानेवारी रोजी गणवेषात याचे या हवाई प्रात्यक्षिकांचा सराव करून जवान आपले कौशल्य, क्षमता दाखवणार आहे. आणि रविवारी १४ जानेवारी रोजी अंतिम हवाई प्रात्यक्षिक होणार असून राज्यपालांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम होणार आहे. सकाळी दहा ते दुपारी एक या वेळेत हा कार्यक्रम होणार आहे. ही प्रात्यक्षिके पाहण्यासाठी व्हीआयपी, व्हीव्हीआयपी तसेच सामन्य जनतेसह एनसीसी, शाळा, महाविद्यालयांमधील विद्यार्थी उपस्थित राहणार आहे. त्यामुळे शनिवारी होणाऱ्या सराव एअर शो (Airshow) आणि रविवारी होणाऱ्या एअर शो (Airshow) पाहण्यासाठी उपस्थित राहणाऱ्या मान्यवरांसाठी सभा मंडप तसेच बसण्याची व्यवस्था व इतर सर्व प्रकारची व्यवस्था मुंबई महापालिकेच्यावतीने करण्याची विनंती एअर फोर्सने केली आहे. (BMC)
(हेही वाचा – Illegal Gambling : ठाण्यातील ‘द ग्रेट गॅम्बलर’ बाबू नाडारचे बेकायदेशीर जुगारांचे अड्डे उध्वस्त)
त्यानुसार मरीन ड्राईव्ह (Marine Drive) परिसरात ही सर्व प्रकारची आसन व्यवस्था करतानाच स्वच्छता राखणे, त्यासाठीच्या जाहिराती प्रदर्शित करणे, वाहने उभी करण्याची व्यवस्था करणे, पिण्याची पाणी, गर्दी नियंत्रणात ठेवणे, सुरक्षा, प्रसारमाध्यमे, वाहतूक व्यवस्था, रुग्णवाहिका तसेच अग्निशमन दलाच्या वाहनांची, सुरक्षेच्या दृष्टीकोनातून प्रवेशिकांचे नियोजन आदी प्रात्यक्षिके पाहता यावीत यासाठीची सर्व व्यवस्था महापालिकेच्या निधीतून करण्याची विनंती एअर फोर्सच्यावतीने करण्यात आली आहे. त्यामुळे रविवारी होणाऱ्या सुर्यकिरण एअर शो पाहण्याची सर्व व्यवस्था महापालिकेच्यावतीने निधीतून केली जाणार असून जिथे एअर फोर्सने किंवा शासनाच्या वतीने याचा खर्च करणे अपेक्षित आहे, तिथे महापालिकेच्या पैसा खर्च केला जात असल्याचे पहायला मिळत आहे. विशेष म्हणजे याला महापालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल (Iqbal Singh Chahal) यांनी मंजुरी दिल्याचीही माहिती मिळत आहे. (BMC)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community