गुरुवारी महापालिका व शासकीय केंद्रांतील लसीकरण बंद

लस साठा उपलब्ध झाल्यास पुढील दिवसापासून लसीकरण पुन्हा सुरू करण्यात येईल.

127

मुंबईत ४५ वर्षांवरील व्यक्तींचे मोफत लसीकरण सध्या महापालिका आणि शासकीय रुग्णालयांच्या माध्यमातून सुरू आहे. पण तरीही पुन्हा लसींचा तुटवडा निर्माण झाल्याने, गुरुवारी ३ जून रोजी महापालिका व शासकीय केंद्रावरील लसीकरण बंद राहणार आहे.

लस साठा संपल्यामुळे लसीकरण बंद

मुंबई महापालिकेच्या २४५ केंद्रांपैकी ८१ केंद्र आणि शासकीय रुग्णालयांमधील २५ केंद्रांवर लसीकरण करण्यात येत असून, कोविड-१९ प्रतिबंधक लसीकरण मोहिमेंतर्गत पुरेसा लससाठा उपलब्ध नसल्यामुळे, मुंबई महापालिका क्षेत्रातील शासकीय आणि महापालिका लसीकरण केंद्रांवर गुरुवार ३ जून २०२१ रोजी लसीकरण बंद राहणार असल्याची माहिती प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.

लसींचा साठा ज्या प्रमाणात प्राप्त होईल, त्या अनुरुप योग्य निर्णय घेऊन मुंबईकर नागरिकांना सातत्याने अवगत करण्यात येते. दरम्यान, गुरुवारी दिवसभरामध्ये लस साठा प्राप्त होण्याची शक्यता असल्याचेही प्रशासनाने म्हटले आहे. लस साठा उपलब्ध झाल्यास पुढील दिवसापासून लसीकरण पुन्हा सुरू करण्यात येईल, असेही प्रशासनाने म्हटले आहे.

मुंबईत दिवसभरात ४९ हजार ८३३ नागरिकांचे लसीकरण

मुंबईत बुधवारी एकूण ४९ हजार ८३३ जणांचे लसीकरण पार पडले. १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींचे खासगी रुग्णालयांमध्ये ३९ हजार ५३० जणांचे लसीकरण पार पडले. तर उर्वरित दहा हजार लसीकरण हे महापालिका व शासकीय लसीकरण केंद्रांमध्ये मोफत पार पडले. तर खासगी रुग्णालयांमधील केंद्रांमध्ये शुल्क आकारले जाते. तर इंटरनॅशनल स्टुडंटस ७११, आरोग्य विभागाचे कर्मचारी ४३४, फ्रंटलाईन वर्कर ४२७, ६० वर्षांवरील ३०७१, ४५ ते ५९ वयोगटातील ५ हजार ५५९, स्तनदा महिला १०१ आदींचे बुधवारी लसीकरण पार पडले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.