BMC : सण-उत्सवांसाठी मुंबई महापालिका घेणार जनतेची अशी काळजी : मावा-मिठाई विकणाऱ्या दुकानांची होणार तपासणी

ही मोहीम केवळ गणपती पुरती मर्यादित नसून दिवाळी पर्यंत राहणार असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.

204
BMC : सण-उत्सवांसाठी मुंबई महापालिका घेणार जनतेची अशी काळजी : मावा-मिठाई विकणाऱ्या दुकानांची होणार तपासणी
BMC : सण-उत्सवांसाठी मुंबई महापालिका घेणार जनतेची अशी काळजी : मावा-मिठाई विकणाऱ्या दुकानांची होणार तपासणी
येत्या सण आणि उत्सवांच्या कालावधीत मोठ्या प्रमाणात मागणी असलेल्या मिठाई जन्य पदार्थांपासून नागरिकांच्या आरोग्याचा कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मुंबई महापालिका अलर्ट झाली आहे. या सण आणि उत्सवाच्या काळात मिठाई सेवनाने विषबाधेचे प्रकार घडू नये म्हणून खाद्य पदार्थ विकणाऱ्या दुकानदारांनी विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याने केले असून या आगामी काळात वैद्यकीय आरोग्य अधिकारी, स्वच्छता निरीक्षक त्यांच्या आपापल्या कार्यकक्षेतील मावा, मिठाईची दुकाने, मावा साठवणूक शीतगृह यांची कसून तपासणी करावी, असे निर्देश महानगरपालिका प्रशासनाने दिले आहेत. ही मोहीम केवळ गणपती पुरती मर्यादित नसून दिवाळी पर्यंत राहणार असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.
मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याने सण-उत्सवांच्या कालावधीत विशेष खबरदारी घेत मुंबईत मावा-मिठाई विकणाऱ्या दुकानाची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. नागरिकांना विषबाधा होऊ नये म्हणून महानगरपालिकेने या पार्श्वभूमीवर सर्व वैद्यकीय आरोग्य अधिकारी, स्वच्छता निरीक्षकांना १ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर २०२३ या काळात गणेशोत्सव, नवरात्र, दसरा, दिवाळी व नाताळ इत्यादी सणांच्या पार्श्वभूमीवर विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश देण्यात आले असल्याची माहिती कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा यांनी दिली आहे.
सणासुदीच्या कालावधीत अन्न विषबाधासारखी कोणतीही घटना घडणार नाही यासाठी वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांनी आपआपल्या विभागांत मिठाई विषबाधेबाबतच्या भित्तीपत्रकांचे वाटप करावे व जनजागृती करावी, असेही निर्देशित करण्यात आले आहे व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, मिठाईचा रंग बदलत असल्यास अथवा उग्र वास येत असल्यास अथवा बुरशी दिसल्यास अशा मिठाई पदार्थांचे सेवन करू नये व असे पदार्थ आढळल्यास बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य खात्याच्या विभागीय वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांच्या निदर्शनास आणून द्यावी.
हेही पहा – https://www.youtube.com/watch?v=78twL-uocLI&t=9s
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.