‘कोविड’ च्या उपचारासाठी ‘या’ रुग्णालयांमध्ये व्यवस्था

191
संभाव्य कोविडच्या साथीचा प्रादुर्भाव राखण्यासाठी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून उपाययोजना राबवण्याचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. या अंतर्गत रुग्णालयांमध्ये खाटांची सुविधा तयार करण्यात आली असून, यात मुंबई महानगरपालिकेची  सेव्हन हिल्स (१७०० बेड) आणि कस्तुरबा (३५ बेड) ही दोन रुग्णालये आहेत. तर  कामा रुग्णालय (१००), सेंट जॉर्ज रुग्णालय (७०), टाटा रुग्णालय (१६), जगजीवन राम रुग्णालय (१२)चार सरकारी रुग्णालये आणि ८७१ खाटांची २६ खासगी रुग्णालये आहेत. ज्यात कोविड रुग्णांवर उपचार करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. शिवाय ऑक्सिजन आणि आयसीयू बेडही पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत. या सर्व रुग्णालयातील रुग्णांच्या भरतीचे व्यवस्थापन वॉर्ड वॉर रूमद्वारे केले जाईल, असे महापालिका आरोग्य विभागाने कळवले आहे.
महानगरपालिकेने कोविड-१९ रूग्णांच्या उपचारासाठी सुसज्ज रुग्णालये आणि जनरल बेड, ऑक्सिजन बेड, अतिदक्षता बेड उपलब्ध करून दिली आहेत. या उपाययोजना कोविड-१९ विषाणूचा प्रसार नियंत्रित करण्यात आणि जनतेचे आरोग्य राखण्यात महत्त्वपूर्ण ठरले आहे. महानगरपालिकेच्या २४ वार्डांमध्ये, वॉर्ड वॉर रूम २४ x ७ कार्यरत आहेत, नागरिक कोणत्याही अडचणीच्यावेळी त्यांच्याशी संपर्क साधू शकतात. कोविड-१९ रुग्णांचे व्यवस्थापन करण्यासाठी लिक्विड मेडिकल ऑक्सिजन (LMO), ड्युरा सिलेंडर्स आणि PSA टँकच्या स्वरूपात पुरेशी ऑक्सिजन सुविधा उपलब्ध असल्याचे मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.
कोविड-१९ विषाणूबद्दल जनजागृती वाढवणे आणि कोविडचा प्रसार रोखण्यासाठी योग्य/ सुसंगत वर्तनाचा वापर करणे, कोविड रुग्ण व त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचे सर्वेक्षण करणे, नियमित RT-PCR चाचणीवर भर देणे, वॉर्ड वॉर रूमद्वारे जनतेशी प्रभावीपणे संवाद साधणे, लसीकरण मोहीम प्रभावीपणे पार पाडणे आदी उपक्रम महापालिकेच्या माध्यमातून राबवण्यात येणार आहेत.

कशी  घ्याल काळजी

  • सार्वजनिक ठिकाणी मास्क लावणे
  • इतरांपासून अंतर राखणे
  • साबण आणि पाण्याने वारंवार हात धुणे, आणि
  • आजारी असताना घरी अलगीकरणात राहणे.
  • वृद्ध नागरिक आणि मधुमेह आणि उच्च रक्तदाबाच्या रुग्णांनी योग्य ती खबरदारी घ्यावी.
  • सर्व नागरिकांनी लसीकरण आणि प्रिकॉशनरी डोस घ्यावा.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.