BMC : वांद्रे पूर्व ते वाकोलादरम्यान यंदाही तुंबणार नाही पाणी; महापालिका प्रशासनाने केली ही उपाययोजना

या भागात गोळीबार नाला, एअर इंडिया रोड नाला, संदीप पाटील प्लॉट नाला, विद्यानगर मेट्रो स्टेशन नाला व बह्मानंद शिंदे प्लॉट जवळील उघडे नाले या सर्व ठिकाणी हे गेट्स बसवण्यात आले आहे.

199

वांद्रे ते सांताक्रुझ पूर्व भागात पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या पुरपरिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिकेच्यावतीने (BMC) यंदा या परिसरातील पाच प्रमुख नाल्यांच्या पातमुखांवर १ हजार घनमीटर प्रति तास क्षमतेचे १३ पंप बसवण्यात येणार आहे. या पातमुखांवर गेट्स बसवण्यात आले असून तीन वर्षांच्या कालावधीसाठी यावर १४.३२ कोटी रुपये खर्च केले जाणार आहे.

(हेही वाचा – BMC : रखडलेल्या विद्याविहार रेल्वे पुलावरील पहिला गर्डर बसवण्याचे काम पूर्ण)

मिठी नदी आणि वाकोला नदीच्या पाण्याचा उलट प्रवाह होऊन सांताक्रुझ ते वांद्रे पूर्व भागातील नाल्यामधून वाहतो. भरतीच्या वेळेस मोठ्याप्रमाणात पाऊस पडल्यास हे सर्व नाले पाण्याने भरुन जातात. त्यातच भरतीमुळे मिठी नदी व वाकोला नदीतील पाण्याचा प्रवाह उलट फिरुन नाल्यात फिरतो. त्यामुळे परिसर जलमय होते. परिणामी पाण्याचा निचरा होण्यास विलंब होतो. त्यामुळे याठिकाणी पोलादी पेनस्टॉक प्रकारचे ८ गेट्स बसवण्यात (BMC) आले आहे. जेणेकरून पावसाळयात मिठी नदी व वाकोला नदीच्या पाण्याचा उलट प्रवाह हा या भागातील पर्जन्य जलवाहिन्यांमध्ये प्रतिबंधित केला जाईल.

हेही पहा – 

या भागात गोळीबार नाला, एअर इंडिया रोड नाला, संदीप पाटील प्लॉट नाला, विद्यानगर मेट्रो स्टेशन नाला व बह्मानंद शिंदे प्लॉट जवळील उघडे नाले या सर्व ठिकाणी हे गेट्स बसवण्यात आले आहे. यामध्ये गोळीबार नाल्याच्या पातमुखावर ३ गेट आणि एअर इंडिया रोड पातमुखावर २ गेट्स बसवण्यात आले आहे. तर संदीप पाटील प्लॉट नाला, विद्यानगरी मेट्रो स्टेशन नाला आणि बह्मानंद शिंदे प्लॉट जवळील उघडे नाल्याच्याठिकाणी प्रत्येकी एक गेट्स बसवण्यात आले आहे. या सर्व नाल्यांवर पुरप्रतिबंधकक गेट्सची देखभाल दुरुस्ती तसेच पावसाचे पाणी उपसण्यासाठी १ हजार घनमीटर प्रति तास पंप पुढील तीन वर्षांकरता भाडेतत्वावर घेण्यात आले. यासाठी महाबल इन्फ्रा इंजिनिअर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची निवड करण्यात आली असून यासाठी तीन वर्षांसाठी १४ कोटी ३२ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे. (BMC)

याठिकाणी बसवण्यात आले आहेत उच्च क्षमतेचे पंप

गोळीबार नाला पातमुख : १००० घ.मीचे ५ पंप (५ हजार घ.मी प्रतितास)

एअर इंडिया रोड पातमुख : १००० घ.मीचे ३ पंप (३ हजार घ.मी प्रतितास)

संदीप पाटील प्लॉट नाला : १००० घ.मीचे २ पंप (२ हजार घ.मी प्रतितास)

विद्यानगरी मेट्रो स्टेशन नाला : १००० घ.मीचे २ पंप (२ हजार घ.मी प्रतितास)

बह्मानंद शिंदे प्लॉट जवळील उघडे नाले : १००० घ.मीचे १ पंप (१ हजार घ.मी प्रतितास)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.