- विशेष प्रतिनिधी, मुंबई
मुंबई महापालिकेचा महसूल वाढवण्यासाठी आता सर्वप्रकारच्या उपाययोजना केल्या जात आहेत. जिथे ५०० चौरस फुटांच्या घरांना मालमत्ता करात माफी दिल्याने शेकडो कोटी रुपयांच्या महसुलावर पाणी सोडावे लागते तिथे आता महापालिकेने झोपडपट्टयांमधील रहिवाशी सदनिकांना वगळून कमर्शियल वापर होत असलेल्या झोपड्यांना लक्ष्य करण्यास सुरुवात केले आहे. या दृष्टीकोनातून महापालिका आयुक्त डॉ. भूषण गगराणी यांनी झोपडपट्टी भागातील व्यावसायिक मालमत्तांचा शोध घेऊन त्यांना करकक्षेत आणावे, असे निर्देश दिले आहेत. (BMC)
मुंबई महानगरपालिकेच्या करनिर्धारण व संकलन खात्याच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समवेत महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी सोमवारी १३ जानेवारी २०२५ संवाद साधला. भायखळा (पूर्व) येथील अण्णा भाऊ साठे सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी, सहआयुक्त (करनिर्धारण व संकलन) विश्वास शंकरवार, सहायक आयुक्त (करनिर्धारण व संकलन) गजानन बेल्लाळे आदी उपस्थित होते. (BMC)
(हेही वाचा – Swami Vivekanand यांच्या जयंतीनिमित्त ‘राष्ट्रीय युवा दिन’ साजरा)
महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी म्हणाले की, मालमत्ता कर हा महानगरपालिकेच्या उत्पन्नाचा प्रमुख स्रोत आहे. आजमितीला मुंबई महानगरपालिकेच्या करनिर्धारण व संकलन खात्याकडे २ लाख ४३ हजार ९८९ मूळ मालमत्तांची नोंद आहे. त्यात निवासी आणि अनिवासी (व्यावसायिक) मालमत्तांचा समावेश आहे. शहर विभागात जुन्या मालमत्तांचा विकास होऊन उत्तुंग इमारती तयार होत आहेत. तसेच, उपनगरांमध्येही नवीन मालमत्तांमध्ये वाढ होत आहे. (BMC)
मालमत्तांचे मूल्यांकन करण्यासाठी महानगरपालिकेने टप्पे निश्चित केले आहेत. त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी झाली पाहिजे. कर आकारणीमध्ये आवश्यक बदल करण्यासाठी सर्व नवीन बांधकामे, विद्यमान बांधकामे आणि मालमत्तेतील बदल, जर काही असतील तर, याची माहिती इमारत प्रस्ताव, इमारत व कारखाने विभागाकडून उपलब्ध करून घेतली पाहिजे. त्यासाठी महानगरपालिकेच्या विविध विभागांमध्ये समन्वय साधणे अत्यावश्यक आहे, असेही गगराणी यांनी नमूद केले. (BMC)
(हेही वाचा – New Districts In Maharashtra : महाराष्ट्रात २१ नवीन जिल्ह्यांची निर्मिती प्रस्तावित; ऐतिहासिक बदलाच्या दिशेने पाऊल)
मालमत्ता कर ऑनलाईन पद्धतीने भरण्याची प्रक्रिया महानगरपालिकेने सोपी, सुलभ केली असली तरी त्यात आणखी सुधारणा करण्यास वाव आहे. नेट बँकिंग, एनईएफटी, आरटीजीएस, यूपीआय, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्डद्वारे नागरिक कर भरणा करू शकतात. मात्र, आणखी सोपे पर्याय महानगरपालिकेने उपलब्ध करून दिले पाहिजेत. नागरिकांना नागरी सुविधा केंद्रावर प्रत्यक्ष जाण्याची आवश्यकता भासणार नाही, अशी यंत्रणा उपलब्ध करून देण्याची सूचना गगराणी यांनी केली. आर्थिक वर्षाच्या अखेरीस, मालमत्ता कराचे उद्दिष्ट गाठण्यासाठी धावाधाव करण्यापेक्षा आर्थिक वर्षाच्या प्रारंभीच कालबद्ध कार्यक्रम निश्चित करायला हवा, असेही गगराणी यांनी स्पष्ट केले. (BMC)
करनिर्धारण व संकलन खात्याच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी अधिक चांगल्या कामगिरीची नोंद करावी, अशी अपेक्षा महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी व्यक्त केली.या संवाद कार्यक्रमात करनिर्धारण व संकलन खात्याने केलेली कर वसुली, स्थावर व जंगम मालमत्ता जप्ती व अटकावणी कारवाई, कर भरण्यासाठीची जनजागृती, थकीत मालमत्ता कर वसुलीची कार्यवाही, महसूल वाढीचे नवीन स्रोत, कर वसुलीत येणाऱ्या अडचणी कामकाजात सुलभता व सुसूत्रता येण्याकरिता उपाययोजना आदीं विषयांवर चर्चा झाली. (BMC)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community