BMC : महापालिकेत बायोमेट्रिक हजेरी मशिन्स होणार हद्दपार, हजेरी नोंदणीसाठी ‘या’ मशिन्सवर देणार भर

16036
BMC : महापालिकेत बायोमेट्रिक हजेरी मशिन्स होणार हद्दपार, हजेरी नोंदणीसाठी 'या' मशिन्सवर देणार भर
  • सचिन धानजी, मुंबई

आधार व्हेरिफाईड फेशियल हजेरी प्रणाली अर्थात फेशियल एटेंड्स मशिनद्वारे हजेरी नोंदवण्याची चाचणी प्रयोग यशस्वी ठरल्यानंतर आता महापालिकेच्या सर्व कार्यालयांमधील बायोमेट्रिक मशिन्स आता हद्दपार केल्या जाणार आहे. मुंबई महापालिकेच्या सर्व कार्यालयांमध्ये १७५३ फेशियल मशिन्स बसवल्या जाणार असून पहिल्या टप्प्यात २४० मशिन्स बसवून हजेरी या प्रणालीद्वारे व्यापक केली जाणार आहे. (BMC)

मुंबईतील नायर रुग्णालयासह महापालिका मुख्यालय इमारतीत फेशियल हजेरी मशिन्स बसवण्यात आल्या आहेत. या एका मशिन्सवर १०० कर्मचाऱ्यांची हजेरी नोंदवली जात आहे. जिथे बायोमेट्रिक हजेरी मशिन्सवर ४० कर्मचाऱ्यांची हजेरी नोंदवली जात आहे. (BMC)

(हेही वाचा – Water Supply : जुलैच्या सुरुवातीला निम्म्यावर आलेला जलसाठा आता मागील दोन वर्षांच्या तुलनेत सर्वांधिक)

कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी

विशेष म्हणजे बायोमेट्रिक मशिन्सच्या तुलनेत व्हेरिफाईड फेशियल मशिन्सची किंमत माफक असून मुख्यालयातील ९० टक्के कर्मचाऱ्यांची यासाठी आवश्यक असणारी नोंदणीही पूर्ण झाल्याने एचआर विभाग किंवा मुख्यालय इमारत देखभाल विभागाच्या वतीने या मशिन्स बसवण्यासाठी कोणताही प्रयत्न केला जात नव्हती. परिणामी कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात होती. (BMC)

बायोमेट्रिक मशिन्समध्येही गैरप्रकार होत असल्याचे प्रकार समोर आल्याने अखेर फेशियल हजेरी मशिन्स बसवण्याची मागणी होत होती. त्यामुळे महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाची जबाबदारी असलेल्या अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांनी आग्रही भूमिका घेत या फेशियल मशिन्स बसवण्याचा निर्णय तातडीने घेतला. त्यानुसार, महापालिकेच्या यांत्रिक व विद्युत विभागाच्यावतीने १७ ५३ मशिन्सची खरेदी करण्यात येत असून त्यानुसार पहिल्या टप्प्यात २४० मशिन्स विविध कार्यालय इमारतींमध्ये बसवल्या जाणार आहेत. तसेच पुढील टप्प्यात ८०० मशिन्स आणि त्या पुढील टप्प्यात ७०० मशिन्स बसवल्या जाणार असल्याची माहिती मिळत आहे. (BMC)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.