- सचिन धानजी,मुंबई
मुंबई महापालिकेचा निधी आमदार व खासदारांना दिल्याबद्दल जोरदार चर्चा असून पालकमंत्र्यांच्या शिफारशीनुसारच मुंबईतील केवळ दोनच खासदारांना महापालिकेचा निधी मंजूर झाला आहे. यात शिवसेनेच्या एकाही खासदाराचा सामावेश नसून भाजपच्या तीन पैकी केवळ दोन खासदारांनी महापालिकेचा निधी मिळवला आहे. भाजपाचे उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी आणि उत्तर मध्य मुंबईचे खासदार पूनम महाजन यांना महापालिकेचा प्रत्येकी २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे महापालिका निधीचे लाभार्थी हे भाजपचे दोन खासदार ठरले असून सरकारमध्ये असलेल्या शिवसेनेचे राहुल शेवाळे आणि गजानन किर्तीकर यांना हा निधीही मंजूर होऊ शकले नाहीत. (BMC)
मुंबई महापालिकेत सध्या प्रशासक नियुक्त असल्याने मुंबईतील विकासकामांना गती मिळावी म्हणून शहर व उपनगरांचे पालकमंत्री यांच्या शिफारशीनुसार विकासकामांसाठी आमदारांना निधी उपलब्ध करून देण्याचे परिपत्रक प्रशासनाच्यावतीने काढण्यात आले. या परिपत्रकानुसार शहराचे पालकमंत्री दिपक केसरकर यांनी सहा आणि उपनगराचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी १० आमदारांच्या विकासकामांच्या निधीकरता शिफारस केली आहे. तर हे परिपत्रक जारी होण्यापूर्वी मुख्यमंत्री यांनी पाच आमदारांना महापालिकेचा निधी मंजूर केला होता. त्यामुळे अश्याप्रकारे एकूण २१ आमदार आणि दोन खासदार यांना एकूण ६२० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. (BMC)
(हेही वाचा – Anza Football Boots : पूर्णपणे भारतीय बनावटीचे अंझा बूट गेमचेंजर कसे ठरले?)
या विकासकामांसाठी निधी मंजूर
मुंबईत सध्या ३ शिवसेना आणि ३ भाजप खासदार आहेत. शिवसेनेच्या तीन पैकी दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत हे उबाठा गटात आहेत. तर राहुल शेवाळे आणि गजानन किर्तीकर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत आहेत. तर भाजपचे गोपाळ शेट्टी, पूनम महाजन आणि मनोज कोटक असे तीन खासदार असून त्यातील केवळ शेट्टी आणि महाजन यांना महापालिकेचा निधी मंजूर झाला आहे. प्रत्येकी २५ कोटी रुपयाचा हा महापालिका निधी असून शेट्टी यांना मालाड पी- उत्तर विभागातील विकास कामांसाठी तर महाजन यांना वांद्रे पूर्व या एच-पूर्व आणि कुर्ला, चांदिवली या एल विभागातील विकास कामांसाठी हा निधी मंजूर झाला आहे. (BMC)
शेट्टी यांचा हा निधी २२ नोव्हेंबर २०२३ रोजी मंजूर करण्यात आला असून महाजन यांना १२ डिसेंबर २०२३ रोजी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे २१ आमदारांपाठोपाठ दोन खासदारांना महापालिकेचा निधी मंजूर झाला आहे. राहुल शेवाळे हे चार वेळा महापालिका स्थायी समितीचे अध्यक्ष होते, तसेच शिवसेनेचे संसदेतील नेते आहेत. परंतु त्यांना महापालिकेच्या निधीसाठी पाठपुरावा करता आलेला नाही. शिवाय गजानन किर्तीकर यांनाही महापालिकेचा निधी मिळाला नाही. विशेष भाजपचे अनेक वर्षे गटनेते पद भुषवलेल्या मनोज कोटक यांनाही महापालिकेचा निधी मिळालेला नाही. त्यामुळे शिवसेनेच्या एकाही खासदाराला महापालिकेला निधी मंजूर न झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. (BMC)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community