मुंबई महापालिकेतील विविध प्रकल्प आणि अभियांत्रिकी कामांमधील अनुभवी अभियंत्यांची फळीच ३० जून रोजी सेवानिवृत्त होत आहे. त्यात उपायुक्त (विशेष अभियांत्रिकी) चंक्रधर कांडलकर, संचालक (अभियांत्रिकी सेवा व प्रकल्प) संजय कौंडण्यपुरे, प्रमुख अभियंता (रस्ते) मनिषकुमार पटेल, प्रमुख अभियंता (पूल) विवेक कल्याणकर यांचा समावेश असून महापालिकेच्या अभियांत्रिकी सेवेतील ही एक अनुभवी फळी म्हणून ओळखली जात होती, परंतु आता ही अनुभवी फळीही सेवानिवृत्त झाल्याने महापालिकेच्या अभियंत्यांसमोर मोठे आव्हान राहणार आहे. (BMC)
दरम्यान अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी निवृत्त होणाऱ्या या उपायुक्त (विशेष अभियांत्रिकी) चंक्रधर कांडलकर, संचालक (अभियांत्रिकी सेवा व प्रकल्प) संजय कौंडण्यपुरे, प्रमुख अभियंता (रस्ते) मनिषकुमार पटेल, प्रमुख अभियंता(पूल) विवेक कल्याणकर यांना यांचा सत्कार करत त्यांना पुस्तकांच्या संच प्रत्येकी भेट दिला. विशेष म्हणजे बांगर यांनी स्वतः या सर्व अधिकाऱ्यांसाठी निवडक पुस्तकांची खरेदी करून त्या पुस्तकांची भेट अधिकाऱ्यांना दिली. अशाप्रकारे अधिकाऱ्यांप्रती आदर व्यक्त करणारे अतिरिक्त आयुक्त पाहून या अधिकाऱ्यांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या होत्या. (BMC)
प्रमुख अभियंता गिरीश निकम यांच्याकडे रस्ते विभागाची जबाबदारी
महापालिकेचे रस्ते प्रमुख अभियंता मनिषकुमार पटेल हे सेवा निवृत्त होत असल्याने त्यांच्या रिक्त जागी कोस्टल रोड प्रकल्पाचे प्रमुख अभियंता गिरीश निकम यांच्याकडे रस्ते विभागाची जबाबदारी सोपवली आहे. तर कोस्टल रोड प्रकल्पाच्या कामांचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला. (BMC)
(हेही वाचा – BMC च्या सहायक आयुक्तांची खांदेपालट; मृदुला अंडे यांच्याकडे जी दक्षिण विभागाचा भार)
पूल विभागाच्या प्रमुख अभियंता पदी उत्तम श्रोते
तर पूल विभागाचे प्रमुख अभियंता विवेक कल्याणकर हे सेवा निवृत्त होत असल्याने त्यांच्या रिक्त जागी उत्तम विश्वनाथ श्रोते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे आता ऐन पावसाळ्यात रस्ते आणि पूल विभागाच्या प्रमुख अभियंता पदी नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे रस्ते आणि पूल विभागाची माहिती नव्याने घेऊन त्यांना आराखड्याची उजळणी करावी लागणर आहे. (BMC)
यतीन दळवी यांच्याकडे उपायुक्त विशेष अभियांत्रिकी पदाचा अतिरिक्त कार्यभार
उपायुक्त (विशेष अभियांत्रिकी) चंक्रधर कांडलकर हे सेवा निवृत्त होत असल्याने या पदाचा अतिरिक्त कार्यभार इमारत परिरक्षण विभागाचे प्रमुख अभियंता यतीन दळवी यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. यतीन दळवी यांच्याकडे इमारत परिरक्षण विभागाच्या प्रमुख अभियंता विभागाचा पदभार कायम ठेवून उपायुक्त (विशेष अभियांत्रिकी) पदाचा भार सोपवण्यात आला आहे. (BMC)
संचालक (अभियांत्रिकी सेवा व प्रकल्प) अतिरिक्त कार्यभार शशांक भोरे यांच्याकडे
संचालक (अभियांत्रिकी सेवा व प्रकल्प) संजय कौंडण्यपुरे हेही ३० जून रोजी सेवा निवृत्त होत असल्याने या रिक्त पदाचा भार प्रमुख अभियंता (मलनि:सारण प्रकल्प) शशांक भोरे यांच्याकडे सोपवण्यात आला. शशांक भोरे यांच्याकडे प्रमुख अभियंता (मलनि:सारण प्रकल्प) या विभागासह संचालक अभियांत्रिकी सेवा व प्रकल्प विभागचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात येत असल्याचे आदेशच सामान्य प्रशासन विभागाच्यावतीने जारी करण्यात आले आहे. (BMC)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community