BMC Budget 2024-25 : महापालिकेच्या अर्थसंकल्पाबाबत काय आहेत प्रतिक्रिया, जाणून घ्या

मुंबई महानगरपालिकेमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील तसेच इतर राज्यांतील रुग्णांना सुध्दा उत्तम आरोग्य सेवा पुरविल्या जातात. मुंबईकरांकडून प्राप्त होणाऱ्या कर तथा शुल्कातून महानगरपालिका आरोग्य सेवेवर मोठ्या प्रमाणात खर्च करत असल्याने महाराष्ट्राबाहेरुन उपचारासाठी येणाऱ्या लोकांसाठी स्वतंत्र शुल्क रचना लागू करण्याबाबत विचार करणे आवश्यक आहे - आशिष शेलार

834
BMC Budget 2024-25 : महापालिकेच्या अर्थसंकल्पाबाबत काय आहेत प्रतिक्रिया, जाणून घ्या

सन २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी मुंबई महापालिकेच्या प्रशासकांनी जो अर्थसंकल्प (BMC Budget 2024-25) सादर केला आहे तो म्हणजे स्वप्नरंजन आहे आणि मोठे मोठे आकडे दाखवत मुंबईकरांची फसवणूक करण्याचा प्रयत्न आहे, अशी प्रतिक्रिया माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी व्यक्त केली आहे.

मागच्या वर्षीचं बजेट (BMC Budget 2024-25) हे ५४,५०० कोटी रुपयांचे होते, जे वाढवून ६० हजार कोटी रुपयांचे केले गेले. म्हणजे थोडक्यात १० टक्के वाढ असलेला अर्थसंकल्प आहे. जवळपास साडेपाच हजार कोटी वाढवून हे सादर का केलं असा सवाल त्यांनी व्यक्त केला. मुंबई महापालिकेचं चालू असलेल्या आर्थिक वर्षाच्या मलमत्ता करातून अर्थात प्रॉपर्टी टॅक्समधून ४५०० कोटी रुपये गोळा करण्याचं उद्दिष्ट होते, त्याची बिलेही वेळेत न पाठवल्यामुळे आता कुठे २० टक्के प्रॉपर्टी टॅक्स गोळा झाला आहे. त्यामुळे यावर्षी पण उत्पन्नातील तूट ही वाढणारच आहे.

(हेही वाचा – Ram Singh Kuka: भारतीय स्वातंत्र्य योद्धे आणि कुका उठावाचे प्रणेते ‘रामसिंह कुका’)

फांजीजिबाल एफएसआयमधून महापालिकेला ह्या आधी दर वर्षी ४५०० ते ५००० करोड रुपये मिळायचे. जे यावर्षी फक्त १५०० कोटी रुपये इतकेच मिळाले आहेत. थोडक्यात उत्पनाचा अजून एक मोठा सोर्स हाती असून सुद्धा महापालिकेला त्यातून पैसे उभे करता आले नाहीत. (BMC Budget 2024-25)

मागच्या वर्षी महापालिकेच्या ९२,००० कोटी रुपयांच्या एफडी होत्या ज्या आता फक्त ८४००० कोटी राहिल्या आहेत. थोडक्यात या आर्थिक वर्षात ८००० कोटी रुपयांच्या एफडी तोडल्या. येत्या आर्थिक वर्षात ‘इंटर्नल ट्रान्सफर’च्या नावाखाली ११,६२७ कोटी रुपयांच्या एफडी तोडण्याचा डाव आहे. थोडक्यात २ वर्षांत २०,००० कोटी रुपयांच्या एफडी मोडल्या जाणार आहेत. एका बाजूला बजेट वाढवायचे आणि त्यासाठी एफडी मोडायचा हा चुकीचा पायंडा पाडला जात आहे. थोडक्यात मुंबईकरांना कोणतीही चांगली सुविधा न देता, अर्थसंकल्प वाढवून आणि त्यासाठी मुंबई महापालिकेच्या एफडी तोडून, मोठी पण खोटी स्वप्न दाखवणारं बजेट मुंबई महापालिका प्रशासकांनी सादर केलं आहे,अशी टीका त्यांनी केली आहे. (BMC Budget 2024-25)

(हेही वाचा – George Adamson : ‘बॉर्न फ्री’ नावाच्या बेस्टसेलर पुस्तकाचे लेखक जॉर्ज ऍडमसन)

शेलार म्हणतात, ती बाब आक्षेपार्ह व अन्यायकारक!

मुंबई महानगरपालिकेमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील तसेच इतर राज्यांतील रुग्णांना सुध्दा उत्तम आरोग्य सेवा पुरविल्या जातात. मुंबईकरांकडून प्राप्त होणाऱ्या कर तथा शुल्कातून महानगरपालिका आरोग्य सेवेवर मोठ्या प्रमाणात खर्च करत असल्याने महाराष्ट्राबाहेरुन उपचारासाठी येणाऱ्या लोकांसाठी स्वतंत्र शुल्क रचना लागू करण्याबाबत विचार करणे आवश्यक आहे. या शक्यतेची सुध्दा चाचपणी पालिका करेल, असे सूतोवाच आजच्या मुंबई महापालिका अर्थसंकल्पात करण्यात आले असून ही बाब आक्षेपार्ह व अन्यायकारक ठरणारी आहे. भाजपाचा याला विरोध राहिल,अशी प्रतिक्रिया मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार यांनी दिली. (BMC Budget 2024-25)

गेल्या पंचवीस वर्षात पेग्वीन सेनेने जो “चमकोगीरीचा” अजेंडा सुरु केला होता, त्यातून महापालिका आता बाहेर पडतेय असे आशावादी चित्र पहायला मिळतेय. “पेग पेग्वीन आणि पार्टी” कल्चरकडून गरिबांच्या सेवेकडे, मुंबईकरांना चांगल्या सुविधा देण्याकडे पालिकेचा कल दिसतोय. “मुख्यमंत्री शून्य प्रिस्क्रिप्शन धोरण” राबविण्यात येणार आहे ही बाब स्वागतार्ह आहोत.सफाई कामगारांसाठी अत्यंत महत्त्वाची असणारी आश्रय योजनेसाठी गतवर्षी 400 कोटी ची तरतूद होती यावर्षी त्यामध्ये वाढ करून 1055 कोटी एवढी घसघशीत रक्कम प्रस्तावित करण्यात आली आहे, याचेही शेलार यांनी स्वागत केले आहे. (BMC Budget 2024-25)

(हेही वाचा – Government Internships : गव्हर्नमेंट इंटर्नशिप करण्याचे ५ मुख्य फायदे कोणते आहेत?)

निराशाजनक आणि मुंबईकरांच्या तोंडाला पाने पुसणारा अर्थसंकल्प – आमदार रईस शेख

मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात मुंबई आणि महाराष्ट्राबाहेरून येणाऱ्या रुग्णांसाठी वेगळ्या शुल्काचा महापालिकेचा प्रस्ताव हा पूर्णपणे भेदभाव करणारा आहे. त्याचा आम्ही कडाडून विरोध करतो, तसेच नागरिकांना करसवलत मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र त्यांच्या पदरी निराशा आली,अशी प्रतिक्रिया समाजवादी पक्षाचे महापालिकेतील माजी गटनेते व आमदार रईस शेख यांनी यांनी व्यक्त केली. (BMC Budget 2024-25)

ठेकेदारांना लाभ होईल अशी निविदा प्रक्रिया बृहन्मुंबई महापालिका राबवते आहे. मोठ्या प्रकल्पाच्या किंमती वाढवल्या जात आहेत. त्यामध्ये काही सुधारणा करण्याचे सूतोवाच अर्थसंकल्पात केले जाईल अशी अपेक्षा होती मात्र तिथेही निराशाच झाली.दोन लाख कोटी रुपये इतके पालिकेवर दायित्व आहे. दायित्व पंधरा वर्षासाठी आहे म्हणणे म्हणजे दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे. दायित्वाचा दरवर्षी पालिका किती भार सोसणार आहे याची स्पष्टता दिली नाही. ह्यामुळे पालिका कर्जाच्या विळख्यात अडकण्याची शक्यता नाकारता येत नाही. पर्यायाने, या दायित्वामुळे पालिकेस मूलभूत सुविधा देणे अशक्य होणार आहे, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. (BMC Budget 2024-25)

(हेही वाचा – UlhasNagar Crime : आमदार गणपत गायकवाड यांच्याकडून शिंदे गटाच्या नेत्यावर गोळीबार)

प्रशासकाने मांडलेला अर्थसंकल्प हादिशाहीन, नीतिहीन… – वर्षा गायकवाड

अर्थसंकल्प हवा होता मुंबईकरांच्या आशा, इच्छा-आकांक्षा पूर्ण करणारा, मुंबईचा लोकाभिमुख विकास साधणारा.. पण यंदाचा मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प म्हणजे शिंदे सरकारच्या प्रशासकाने मांडलेला दिशाहीन, नीतिहीन, बेशिस्त मित्रकेंद्रित फुगवटा. मोठमोठ्या घोषणांचा केवळ वर्षाव आणि दूरदृष्टीचा अभाव असलेला दीनदलीत, गोरगरीब, मध्यमवर्गीय मुंबईकरांच्या तोंडाला पाने पुसणारा हा अर्थसंकल्प. (BMC Budget 2024-25)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.