- सचिन धानजी,मुंबई
मुंबई महापालिकेच्या सन २०२४-२५ चा अर्थसंकल्प येत्या शुक्रवारी २ फेब्रुवारी २०२४ रोजी मांडला जाणार आहे. महापालिकेत सध्या प्रशासक नियुक्त असल्याने शिक्षण विभागाचा अर्थसंकल्पीय अंदाज अतिरिक्त आयुक्त आश्विनी भिडे किंवा उपायुक्त (शिक्षण) चंदा जाधव तर मुख्य अर्थसंकल्प अतिरिक्त आयुक्त प्रकल्प पी वेलरासु हे महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल यांना सादर करतील. विशेष म्हणजे हा अर्थसंकल्प महत्वाचा ठरणार असून प्रशासक याच्याकडून मांडल्या जाणाऱ्या या अर्थसंकल्पात भांडवली खर्चाच्या आकडा वाढला जाणार आहे. येत्या अर्थसंकल्पात भांडवली खर्चाचा आकडा ६० टक्क्यांवर पोहोचला जाण्याची शक्यता आहे, तर महसुली खर्चाचा आकडा ४० टक्क्यांवर येईल असे दिसून येत आहे. परिणामी हा अर्थसंकल्प तुटीच्या आसपास जाण्याची शक्यता आहे. (BMC Budget २०२४-२५)
महसुली खर्च पोहोचणार ४० टक्क्यांवर
सर्वसाधाणपणे जेव्हा महसुली खर्च कमी होतो अर्थात उत्पन्नातून मिळणाऱ्या महसुलाच्या भाग कमी होतो आणि खर्च वाढतो तेव्हा निश्चितच अर्थसंकल्प तुटीत जात असतो. सन २०१७- १८ मध्ये महसुली खर्च हा ७५ टक्के एवढा होता, तर भांडवली खर्च हा २५ टक्के एवढा होता. पण सन २०२३- २४ मध्ये महसुली खर्च हा ४८ टक्के झाला आणि भांडवली खर्च हा ५२टक्के एवढा झाला. तर येत्या अर्थसंकल्पात हा आकडा ४०:६० टक्के असा असेल असा अंदाज आहे. त्यामुळे जेव्हा प्रकल्प आणि विकास कामे व योजनांवर केल्या जाणाऱ्या भांडवली खर्चाचा आकडा वाढला जात असल्याने महापालिकेचा येता अर्थसंकल्प नाममात्र शिलकीत किंवा तुटीत जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. (BMC Budget २०२४-२५)
मागील वर्षी अंतर्गत निधीतून उचलले २६१८ कोटी रुपये
सन २०२२-२३ च्या अर्थसंकल्पात ४९९८ कोटी रुपयांचा निधी तात्पुरत्या अंतर्गत हस्तांतरणाद्वारे उभारण्याचे महापालिका प्रशासकांनी प्रस्तावित केले होते, पण त्या आर्थिक वर्षात केवळ २३८० कोटी रुपये एवढाच निधी उभारता आला होता. म्हणजे मागील आर्थिक वर्षांत जेवढा निधी उभारायचा होता त्यात २६१८ कोटी रुपये उभारण्याची गरज भासली नाही. (BMC Budget २०२४-२५)
विद्यमान अर्थसंकल्पाचा आकडा असा होईल कमी
पण असे असतानाही महापालिका प्रशासनाने सन २०२२- २३च्या ४५,९४९ कोटी रुपयांच्या तुलनेत मूळ अर्थसंकल्पाचा आकार २३४२ कोटींनी कमी करून ४३,६०७ कोटी रुपये आणि पुन्हा मागील वर्षांच्या तुलनेत सात हजार कोटींनी अर्थसंकल्पाचा आकडा वाढून तो ५२, ६१९ कोटी रुपयांचा मांडला. (BMC Budget २०२४-२५)
मात्र चालू आर्थिक वर्षांतही तात्पुरत्या अंतर्गत हस्तांतरणाद्वारे उभारण्यात येणाऱ्या निधीची रक्कम ५९७० एवढी प्रस्तावित केली आहे, जी महापालिकेला केवळ साडेतीन ते चार कोटींच्यावर उभारली जावू शकते. त्यामुळे महापालिकेच्या सुधारीत अर्थसंकल्पाचा आकडाही सुमारे साडेतीन ते चार कोटींनी कमी होऊन तो सुधारीत ४९ ते ५० हजार कोटींच्या घरात जाण्याची शक्यता आहे. (BMC Budget २०२४-२५)
विकास नियोजन शुल्क, मालमत्ता कर आदींच्या घटलेला महसूल आणि नवीन महसूल वाढीचा कोणताही प्रयत्न न केल्याने महसुलाची रक्कम कमी होत आहे, तर दुसरीकडे मागील अनेक वर्षांपासून विकास प्रकल्पाची कामे ही केवळ तरतूद रकमे पुरती मर्यादित असली तरी आता मात्र हे प्रकल्प ७० ते ९० टक्के पूर्णत्वास येत असल्याने याचे पैसे देण्याची वेळ आली आहे. त्यामुळे कालपर्यंत तरतूद रकमे पैकी ५ ते १० टक्के निधीचा वापर व्हायचा तिथे आता तरतूद निधी पैकी ७० ते ८० टक्के निधीचा वापर होऊ शकतो. त्यामुळे यंदा हा अर्थसंकल्प काही करून शिलकित दाखवण्याचा प्रयत्न झाला तरी पुढील वर्षांत हा अर्थसंकल्प तुटीत दाखवण्याशिवाय पर्याय नसेल असेही बोलले जात आहे. (BMC Budget २०२४-२५)
(हेही वाचा – Divya Deshmukh : भारताची आंतरराष्ट्रीय मास्टर बुद्धिबळपटू दिव्या देशमुख प्रेक्षकांवर का चिडली?)
मागील सात वर्षांतील महसुली आणि भांडवली खर्चांची टक्केवारी खालीलप्रमाणे :
सन २०१७- १८ : महसुली खर्च : ७५ टक्के, भांडवली खर्च : २५ टक्के
सन २०१८- १९ : महसुली खर्च : ७४टक्के, भांडवली खर्च : २६ टक्के
सन २०१९- २० : महसुली खर्च : ७१ टक्के, भांडवली खर्च : २९ टक्के
सन २०२०- २१ : महसुली खर्च : ७२ टक्के, भांडवली खर्च : २८ टक्के
सन २०२१- २२ : महसुली खर्च : ६५ टक्के, भांडवली खर्च : ३५ टक्के
सन २०२२- २३ : महसुली खर्च : ५२ टक्के, भांडवली खर्च : ४८ टक्के
सन २०२३- २४ : महसुली खर्च : ४८ टक्के, भांडवली खर्च : ५२टक्के
सन २०२३- २४ : संभाव्य महसुली खर्च : ४० टक्के, संभाव्य भांडवली खर्च :६० टक्के (BMC Budget २०२४-२५)
हेही पहा – https://www.youtube.com/watch?v=OI2sttckJYw
Join Our WhatsApp Community