-
विशेष प्रतिनिधी, मुंबई
मुंबई महापालिकेच्या मुदतठेवींचा आकडा कमी झाल्याची बोंब ठोकली जात असली प्रत्यक्षात महापालिकेने तब्बल २ लाख ३२ हजार कोटींची विकासकामे हाती घेतली आहे. पायाभूत सेवा सुविधांच्या प्रकल्प कामांसाठी चालू अर्थसंकल्पात २५ हजार २३६ कोटी रुपयांची तरतूद केली होती. त्यातुलनेत आगामी सन २०२५-२६ या वर्षांसाठी ३५ हजार ९८१ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केलेली आहे. मात्र, या सर्व प्रकल्प कामांसाठी ८३ हजार कोटींच्या मुदतठेवी मोडल्या जातील अशाप्रकारचे चित्र निर्माण केले जात असले तरी प्रत्यक्षात या मुदतठेवींपैंकी केवळ ४२,२३० कोटी रुपयांच्या कोणत्याही प्रकारचा हात घालण्याचा अधिकार नसून प्रकल्प कामांसाठी केवळ ३९,५४३ कोटी रुपयेच खर्च करता येणार आहे. (BMC Budget 2025-26)
मुंबई शहराच्या पायाभूत सुविधांमध्ये दर्जात्मक सुधारणा करण्यासाठी महापालिकेने मोठ्याप्रमाणात महत्वाचे पायाभूत सुविधा प्रकल्प हाती घेतले आहेत. मोठ्या गुंतवणुकीद्वारेच मुंबईतील पायाभूत सुविधा जागतिक दर्जाच्या करणे शक्य आहे. राखीव निधीच्या गुंतवणुकीतून महापालिकेला किरकोळ व्याज मिळते. खर्चाचे नियोजन न केल्यास शहराच्या पायाभूत सुविधांचा दर्जा घसरुन जागतिक शहरांच्या स्पर्धेत असलेल्या आपल्या स्थानात घसरण होईल. म्हणूनच महापालिका मागील ३ वर्षांपासून आपल्या निधींचा काही भाग महत्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांवर नियोजनपूर्वक खर्च करत आहे. (BMC Budget 2025-26)
(हेही वाचा – कोथरुडमधील वाहतूककोंडी सोडवण्यासाठी Chandrakant Patil यांच्याकडून उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे निधीची मागणी)
महापालिकेच्या एकूण ८१,७७४.४२ कोटी रुपयांची रक्कम मुदतठेवींमध्ये गुंतवलेली आहे. त्यातील राखीव निधींमध्ये ठेवण्यात आलेली ४२,२३०.४८ कोटी रुपयांची रक्कम बांधिल दायित्वापोटी आहे. तर उर्वरीत ३९,५४३.६४ कोटी रुपये एवढी रक्कम विविध पायाभूत प्रकल्पांसाठी आहे. त्यामुळे राखीव निधी हे मुंबईकरांच्या सुविधेसाठी पायाभूत सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठी लागणाऱ्या भांडवली खर्चाकरता वापरण्यात येतील असे महापालिका आयुक्त डॉ. भूषण गगराणी यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात स्पष्ट केले. (BMC Budget 2025-26)
मुंबई महापालिकेने प्रत्यक्षात हाती घेतलेल्या विकासकामांसाठी ३५९८१ कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे, त्यातुलनेत मुदत ठेवीतील पायाभूत सुविधांसाठी वापरता येणारी रक्कम ही ३९,५४३ कोटी रुपये एवढी आहे. त्यामुळे प्रत्यक्ष कामांसाठी केलेल्या निधीची तरतूद आणि मुदत ठेवीतील वापरता येणारी रक्कम यामध्ये केवळ चार हजार कोटी रुपयेच अधिक आहे. त्यामुळे महापालिकेने आता महसूल वाढीवर अधिक भर दिला आहे. (BMC Budget 2025-26)
(हेही वाचा – “उमेद, धाडस वाढविण्यासाठी चांगली पुस्तके वाचा!”; उपसभापती Dr. Neelam Gorhe यांचे आवाहन)
मुंबई महापालिकेने चालू आर्थिक वर्षांत सन २०२४-२५ या आर्थिक वर्षांत महसुली उत्पन्नाचे लक्ष्य ३५,७४९ एवढे होते, ते आता सुधारित करून महापालिकेने महसुली उत्पनाचे लक्ष्य ४०,६९३ कोटी रुपये केले आहे. म्हणजे महसुली उत्पन्न सुमारे पाच हजार कोटींनी वाढवले आहे. त्यातील ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत २८,३०८.३७ कोटी रुपयांचा महसूल जमा झाला आहे. त्यामुळे आगामी अर्थसंकल्पात म्हणजे सन २०२५-२६ या आर्थिक वर्षांसाठी महसूली उत्पन्न हे ४३,१५९ .४० कोटी रुपये एवढे प्रस्तावित केले. (BMC Budget 2025-26)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community