BMC Budget 2025-26 : देवनारमधील डम्पिंग ग्राऊंडवरील वीज निर्मिती प्रकल्प ऑक्टोबर २०२५ ला होणार सुरु

38
BMC Budget 2025-26 : देवनारमधील डम्पिंग ग्राऊंडवरील वीज निर्मिती प्रकल्प ऑक्टोबर २०२५ ला होणार सुरु
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई

मुंबई महानगरपालिकेने देवनार क्षेपणभूमी येथे ६०० टन प्रतिदिन क्षमतेचा कचऱ्यापासून वीजनिर्मिती प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पामध्ये कचऱ्यावर शास्त्रोक्त पध्दतीने प्रक्रिया करुन सुमारे ७ मेगावॅट वीजनिर्मिती होणार आहे. प्रकल्पाच्या बांधकाम व उभारणीचे काम सुरू असून हा प्रकल्प ऑक्टोबर २०२५ पासून कार्यान्वित होईल असे महापालिका आयुक्त डॉ भूषण गगराणी यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात सांगितले. (BMC Budget 2025-26)

घन कचरा व्यवस्थापन प्रकल्पांकरिता सन २०२४-२५ च्या अर्थसंकल्पात२७७ कोटी रुपयांची तरतूद केली हाती व आगामी सन २०२५-२६ च्या अर्थसंकल्पीय अंदाजामध्ये ३०० कोटी एवढी तरतूद करण्यात आली आहे. (BMC Budget 2025-26)

देवनार क्षेपणभूमी येथे बायो-सीएनजी प्रकल्प

देवनार क्षेपणभूमी येथे सुमारे १००० टन प्रतिदिन इतक्या नागरी घन कचऱ्यापासून बायो-सीएनजी निर्मिती प्रकल्प उभारण्यासाठी महानगर गॅस लिमिटेड यांच्यासोबत सामंजस्य करार केला आहे. सद्यस्थितीत, याचा सवलत करारनामा संबंधीची प्रक्रिया सुरु आहे. (BMC Budget 2025-26)

(हेही वाचा – Kashmir मध्ये ५०० संशयितांना सुरक्षा दलाने घेतले ताब्यात; माजी जवानावरील हल्ल्यानंतर कारवाईला वेग)

मुलुंड डम्पिंग ग्राऊडवरील १०.७० मेट्रिक टन कचऱ्याची पुढील वर्षांत विल्हेवाट

मुलुंड डम्पिंग ग्राऊंड येथे जमीन पुनः प्राप्त करण्यासाठी मुलुंड क्षेपणभूमी येथे जून २०२५ पर्यंत ७० लाख मे. टन इतक्या जुन्या साठलेल्या कचऱ्यावर प्रक्रिया व विल्हेवाट लावून क्षेपणभूमीची २४ हेक्टर जमीन पुनःप्राप्त करण्याकरिता महानगरपालिकेने प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पाचे काम सुरु असून ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत सुमारे ४०.९३ लाख मेट्रीक टन जुन्या साठलेल्या कचऱ्यावर प्रक्रिया करुन त्याची विल्हेवाट लावण्यात आली आहे. जानेवारी २०२५ ते मार्च २०२५ दरम्यान सुमारे १८.३७ लाख मेट्रीक टन जुन्या साठलेल्या कचऱ्यावर प्रक्रिया व विल्हेवाट लावण्याचे नियोजित असून आगामी आर्थिक वर्षांत म्हणजे सन २०२५-२६ मध्ये सुमारे १०.७० लाख मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया करुन विल्हेवाट लावण्यात येणार आहे. (BMC Budget 2025-26)

मुंबईत प्रत्येकी ६०० टनाच्या प्रकल्पांमध्ये बांधकाम कचऱ्यावर प्रक्रिया

बांधकाम व निष्कासन कचऱ्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करण्यासाठी महानगरपालिकेने दहिसर व डायघर येथे प्रत्येकी ६०० टन प्रतिदिन क्षमतेची २ केंद्र उभारली आहेत. या दोन्ही केंद्रांनी एकत्रित क्षमता या प्रकल्पाच्या कामाला सुरुवात झाली आहे. पुनः प्रक्रिया केलेले साहित्य बिगर-संरचनात्मक बांधकामांकरिता उपलब्ध करुन दिले जात असून त्यामुळे चक्राकार अर्थव्यवस्थेस चालना मिळते. आतापर्यंत या सेवांद्वारे २६,००० मेट्रिक टनाहून अधिक डेब्रिजची हाताळणी करण्यात आली. त्याद्वारे डेब्रिज इतस्तः टाकण्याच्या प्रमाणाला आळा बसून पर्यावरणाची हानी कमी झाली आहे. (BMC Budget 2025-26)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.