BMC Budget 2025-26 : महापालिका शाळांमध्ये स्टेम रोबोटीक्स प्रयोगशाळा

43
BMC Budget 2025-26 : महापालिका शाळांमध्ये स्टेम रोबोटीक्स प्रयोगशाळा
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई

विद्यार्थ्यांना विज्ञान आणि तंत्रज्ञानाबाबत सखोल रुची निर्माण होऊन त्यांची विश्लेषणात्मक सव सर्जनशील विचार करण्याची क्षमता सुधारण्यासाठी महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी स्टेम रोबोटीक्स प्रयोगशाळा स्थापित करण्यात येणार आहेत. तसेच सन २०२५-२६ मध्ये ११२ संगणक प्रयोगशाळांचे नुतनीकरण आणि उपनगरांतील शाळांमध्ये सी.सी.टी.व्ही. बसवण्यात येणार आहे

मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागासाठी सन २०२५ २६ आगामी वर्षांसाठी ३९५५. ६४ कोटी रुपयांचा अर्थसंकल्पीय अंदाज तयार करण्यात आला असून या महापालिक अतिरिक्त आयुक्त डॉ. अमित सैनी यांनी हा अर्थसंकल्पीय अंदाज महापालिका प्रशासक डॉ. भूषण गगराणी यांना सादर केला. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त वीपीन शर्मा, अतिरिक्त अभिजित बांगर, महापालिकेच्या शिक्षण विभागाचा अर्थसंकल्प सादरीकरण प्रसंगी उपायुक्त (शिक्षण) डॉ. प्राची जांभेकर, उपायुक्त (वित्त) प्रशांत गायकवाड, निवृत्त लेखा अधिकारी वित्त सुनील जाधव आदींसह अधिकारी उपस्थित होते. (BMC Budget 2025-26)

महानगरपालिकेमार्फत सद्यस्थितीत बालवाडीचे ९०० वर्ग, एमपीएसचे ११० वर्ग, सीबीएसई, आयसीएसई, आयबी व आयजीसीएसई मंडळांचे ९३ वर्ग असे एकूण १,१०३ पूर्व प्राथमिक वर्ग सुरु आहेत. त्यामध्ये एकूण ४१,५८५ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यामध्ये सद्यस्थितीत असलेले शैक्षणिक उपक्रमांचे पुनर्विलोकन करून मिशन संपूर्ण अंतर्गत विभाजन करण्यात आले असून आवश्यकेनुसार नवीन शैक्षणिक उप्रकमांचा समावेश करण्यात आला असल्याचे नमुद करण्यात आले आहे.

(हेही वाचा – देशाचे तुकडे होण्यासाठी प्रयत्न करणारा पहिलाच विरोधी पक्षनेता पाहिला; Nishikant Dubey यांनी मागितला Rahul Gandhi यांचा राजीनामा)

आयसीएसई, सीबीएसई, आयजीसीएसई व आयबी शिक्षण मंडळाच्या शाळांची उभारणी

सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात मुंबई पब्लिक स्कूल शांती नगर-जी/दक्षिण, मुंबई पब्लिक स्कूल नटवर पारेख कंपाऊंड एम/पूर्व-१, मुंबई पब्लिक स्कूल मालवणी टाऊनशिप पी/उत्तर (मुंबई पब्लिक स्कूल वीर सावरकर मार्ग वर्षानगर एस विभाग या ४ नवीन सीबीएसई शाळा सुरु करण्यात आलेल्या आहेत. सद्यस्थितीत सीबीएसई मंडळाच्या १८ तसेच आयसीएसई, आयजीसीएसई व आयबी मंडळाची प्रत्येकी ०१ अशा एकूण २१ शाळा सुरु आहेत. या सर्व शाळांमध्ये नर्सरी ते इयत्ता १० वी पर्यंत एकूण ११,७३६ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तर सन २०२४-२५ मध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांकरिता के/पूर्व विभागात नटवर नगर महानगरपालिका विशेष शाळा सुरु करण्यात आली आहे.

खेळातून शिक्षण

इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांना पुरविण्यात आलेल्या एकूण १९,४०१ टॅबमध्ये खेळातून शिक्षण या संकल्पनेनुसार Gamifield Learning App ही सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तसेच सन २०२५-२६ मध्ये इयत्ता ८ वी व इयत्ता ९वी च्या विद्यार्थ्यांना पुरविण्यात आलेल्या एकूण ३२.६५९ टॅबमध्ये ही सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

डिजीटल क्लासरूम

सन २०२४-२५ पर्यंत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधील एकूण ७,९३४ वर्गखोल्यांपैकी ३,८१४ वर्गखोल्याना LED Interactive Panel द्वारे डिजीटल क्लासरुम करण्यात आले असून उर्वरीत ४,१२० वार्गखोल्या टप्प्याटप्याने डिजीटल करण्यात येणार आहेत.

ऑरगॅनिक फार्मिंग (किचन गार्डन)

मुंबई महानगरपालिकेच्या शहर विभागातील १०० शाळांमध्ये ऑरगॅनिक फार्मिंग (किचन गार्डन) ही संकल्पना यशस्वीरित्या राबविण्यात येत आहे. तसेच महानगरपालिका व जिल्हा नियोजन सामिती -मुंबई उपनगर, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त योगदानाने महानगरपालिकेच्या उपनगर विभागातील शाळांमध्ये ऑरगॅनिक फार्मिंग (किचन गार्डन) ही संकल्पना राबविण्यात येणार आहे.

स्वयंसेवी संस्थेच्या सहभागातून सुरु असलेले उपक्रम 

पोक्सो (POCSO) कायद्याबाबतचे मार्गदर्शन महाराष्ट्र बाल हक्क संरक्षण आयोग, महाराष्ट्र शासन व इतर सेवाभावी संस्थांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शिक्षक व पालकांकरिता पोक्सो (POCSO) कायद्याबाबतचे मार्गदर्शन करणारी व्याख्याने आयोजित करण्यात येत आहेत. (BMC Budget 2025-26)

शालेय इमारतींची दुरुस्ती, दर्जोन्नती व पुनर्बांधणी

महानगरपालिकेच्या स्वतःच्या मालकीच्या एकूण ४७९ शालेय इमारती आहेत. सन २०२३-२४ वर्षातील दुरुस्ती व दर्जोन्नतीची ४४ कामे व सन २०२४-२५ वर्षामध्ये २५ नोव्हेंबर २०२४ पर्यंत ठेकेदारांना कार्यदिश देण्यात आलेली दुरुस्ती व दर्जोन्नतीची २२ कामे अशी एकूण ६६ कामे प्रगतीपथावर आहेत. त्यापैकी मार्च २०२५ पर्यंत एकूण ४० कामे पूर्ण करण्यात येणार असून उर्वरित २६ कामे पुढील आर्थिक वर्षात पूर्ण करण्यात येणार आहेत.

(हेही वाचा – चीनला काँग्रेसने आपल्या डोक्यावर बसवले; MP Nishikant Dubey यांचा घणाघात)

पुनर्बांधणी व नवीन बांधकामे

सन २०२३-२४ वर्षातील पुनर्बाधणी व नवीन बांधकामांची ०८ कामे व सन २०२४-२५ वर्षामध्ये दि.२५ नोव्हेंबर २०२४ पर्यंत ठेकेदारांना कायदिश देण्यात आलेली पुनर्बाधणी व नवीन बांधकामांची ७ कामे अशी एकूण १५ कामे प्रगतीपथावर आहेत. त्यापैकी मार्च २०२५ पर्यंत एकूण ०५ कामे पूर्ण करण्यात येणार असून उर्वरित १० कामे पुढील आर्थिक वर्षात पूर्ण करण्यात येतील. अशा प्रकारे मार्च २०२५ पर्यंत दुरुस्ती, दर्जोन्नती, पुनर्बाधणी व नवीन बांधकामांची एकूण ४५ कामे पूर्ण करण्यात येणार असून उर्वरित ३६ कामे पुढील आर्थिक वर्षात पूर्ण करण्यात येतील.

परिमंडळनिहाय ठेकेदारांची नियुक्ती

शालेय इमारतींच्या किरकोळ व तात्काळ स्वरूपाच्या दुरुस्तीची कामे करण्यासाठी पुढील दोन वर्षांकरिता परिमंडळनिहाय ठेकेदारांची नियुक्ती करण्याकरिता निविदा प्रक्रिया कार्यान्वित करण्यात आली आहे. संगणक प्रयोगशाळा अद्ययावतीकरणः सन २०२५-२६ मध्ये ११२ संगणक प्रयोगशाळांचे अद्ययावतीकरण करण्यात येणार आहे.

सी.सी.टी.व्ही. कॅमेरा बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शहर विभागातील शालेय इमारतीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. तसेच सन २०२५-२६ मध्ये महापालिकेच्या उपनगर जिल्ह्यातील शालेय इमारतींमधील सीसी टिव्ही कॅमेरे बसण्यात येणार आहे.

गंधवेध यंत्र

मुंबई महानगरपालिकेच्या शहर विभागातील १०० व उपनगर विभागातील ४०० शालेय इमारतींमध्ये स्वच्छतागृहांसाठी प्रत्येक इमारतीस १० असे एकूण ५००० गंधवेध यंत्र स्थापित करण्याचे प्रस्तावित आहे. (BMC Budget 2025-26)

व्हाईट बोर्ड

शाळेमध्ये सद्यस्थितीत बसविण्यात आलेले जिर्ण व दुरावस्था झालेले फळे तथा बोर्ड बदलून शिक्षक व विद्यार्थ्यांना वापरास सुयोग्य असे फळे तथा बोर्ड बसविण्यात येणार असून सन २०२५-२६ मध्ये आवश्यकतेनुसार व्हाईट बोर्ड खरेदी करण्यात येणार आहेत.

जादुई पेटारा (ज्ञानपेटी)

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) २०२० अंतर्गत विद्यार्थ्यांच्या विचारशक्तीला व कृतीशीलतेला वाव देऊन त्यांना आनंददायी शिक्षण मिळावे याकरीता शैक्षणिक वर्ष सन २०२५-२६ मध्ये बालवाडीतील विद्यार्थ्यांना जादुई पेटारा उपलब्ध करुन देण्यात येईल. तसेच जादुई पेटारा (ज्ञानपेटी) ही संकल्पना इयत्ता १ ली व इयत्ता २ री करिता टप्प्याटप्प्याने राबविण्यात येईल.

बोलक्या भिंती

विद्यार्थ्यांना शालेय अभ्यासक्रमातील एखादी संकल्पना स्पष्ट करीत असताना सदर आशयाचे चित्र दाखविले असता ती संकल्पना विद्यार्थ्यांस लवकर समजण्यास मदत होईल. याकरिता शालेय इमारतीच्या संरक्षक भिंतीवर आतल्या बाजूस विद्यार्थ्यांना शैक्षणिक, नैतिक मूल्ये व सामाजिक जबाबदारीचे संदेश देणारे चित्र चित्रित करण्यात येणार आहेत.

(हेही वाचा – Pakistan मधील हिंदूंच्या ४०० हून अधिक अस्थीचे ८ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर होणार गंगेत विसर्जन; कराचीमधील महंत भारतात दाखल)

मुंबई महानगरपालिकेच्या आठ माध्यमांच्या ९३८ प्राथमिक शाळा

शाळेतील एकूण विद्यार्थी संख्या : २,६०,५४४ विद्यार्थ्यांना

शाळतील शिक्षक संख्या : ७,४०८

महानगरपालिकेच्या माध्यमिक शाळा १९१

माध्यमिक शाळेतील विद्यार्थी ३८,४५०

माध्यमिक शाळेतील शिक्षक १,२४४

महानगरपालिकेच्या विशेष शाळा : १९

विशेष शाळांमधील विद्यार्थी संख्या :८७६

विशेष शाळांमधील शिक्षक संख्या :७८

महानगरपालिकेची विद्यालये : ०२ अध्यापक व ०३ कनिष्ठ महाविद्यालये

महाविद्यालयातील शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या : एकूण २९५

महापालिका अनुदानित शाळा : ३७८

खाजगी अनुदानित शाळांमधील शिक्षक : एकूण २२४७

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.