BMC Budget 2025-26 : महापालिका अर्थसंकल्पाचा आकडा सात वर्षांनी वाढला तब्बल ५० हजार कोटींनी

73
BMC Budget 2025-26 : मुंबई महापालिकेने वाढीव अर्थसंकल्पातून आजचे मरण पुढे ढकलले!
BMC Budget 2025-26 : मुंबई महापालिकेने वाढीव अर्थसंकल्पातून आजचे मरण पुढे ढकलले!
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई 

मुंबई महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. भूषण गगराणी यांनी सन २०२५-२६ चा तब्बल ७४,४२७ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला. मात्र, मागील सार्वत्रिक निवडणुकीनंतर महापालिका अस्तित्वात आली तेव्हापासून म्हणजे सन २०१७-१८ च्या तुलनेत आगामी अर्थसंकल्पाचा आकडा तब्बल ५० हजार कोटींनी वाढल्याचे दिसून येत आहे. सन २०१७ -१८ रोजी महापालिकेने २५,१४१.५१ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मांडला होता. तर तब्बल सात वर्षांनी अर्थसंकल्पाचा आकडा ५० हजारांनी फुगवून सुमारे ७४ हजार कोटींवर जावून पोहोचल्याचे दिसून येत आहे. (BMC Budget 2025-26)

(हेही वाचा – Indians Deportation from US : बेकायदेशीरपणे राहणाऱ्या आणखी ४८७ भारतीय नागरिकांना अमेरिका करणार हद्दपार)

मुंबई महापालिकेचा २०१७ च्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी महापालिकेचा अर्थसंकल्प सन २०१६-१७ मध्ये ३७०५२.५२ कोटी रुपये एवढा होता, तर त्यानंतर सार्वत्रिक निवडणुकीनंतर महापालिका प्रस्थापित झाल्यानंतर तत्कालिन महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी अर्थसंकल्पाचा आकडा तब्बल १२ हजार कोटींनी कमी करत सन २०१७-१८ मध्ये २५१४१.५१ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मांडला होता. त्यानंतर अर्थसंकल्पाचा आकडा वाढतच जात असून त्यानंतर अजोय मेहता याच्या कारकिर्दीत अर्थसंकल्पाचा आकडा ३० हजार ६९२ कोटी रुपयांपर्यंत तर त्यानंतर २०२०-२१ मध्ये तत्कालिन आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांनी तीन हजार कोटींनी वाढ करत ३३,४४१ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मांडला. त्यामुळे २०१७-१८ ते २०२०-२१ या चार वर्षांत अर्थसंकल्पाचा आकडा २५ हजार कोटींवरून ३३ हजार कोटींवर म्हणजे तब्बल ८ हजार कोटींनी अर्थसंकल्पाचा आकडा वाढला गेला होता. (BMC Budget 2025-26)

(हेही वाचा – दिल्लीतील पराभव स्पष्ट दिसत असल्यानेच विरोधकांचा फेक नरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न; Pravin Darekar यांची टीका)

परंतु सन २०२१-२२ मध्ये तत्कालिन महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी थेट मागील अर्थसंकल्पाच्या तुलनेत सहा हजार कोटींनी वाढ करत ३९,०३८ कोटींचा अर्थसंकल्प मांडला.त्यानंतर पुढील आर्थिक वर्षांत सात हजार कोटींनी आणि त्यानंतर पुन्हा साडेसहा हजार कोटींनी तसेच त्यापुढील वर्षांत सात वर्षांनी वाढवत सन २०२४-२५ या वर्षांत ५९,९०० कोटींचा अर्थसंकल्प मांडला. हा अर्थसंकल्प प्रत्यक्षात ६५ हजार कोटींचा दाखवून तो ६४ हजार कोटी रुपयांनी सुधारीत केला. आता आगामी सन २०२५-२६ या वर्षांत सादर केलेल्या अर्थसंकल्पाच्या तुलनेत १४ हजार कोटींनी आणि सुधारीत अर्थसंकल्पाच्या तुलने दहा हजार कोटींनी अर्थसंकल्पाचा आकडा वाढला गेला. त्यामुळे सन २०१७-१८ च्या तुलनेत चालू अर्थसंकल्पाचा आकडा पाहता सात वर्षांत अर्थसंकल्पात ५० हजार कोटींनी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. (BMC Budget 2025-26)

(हेही वाचा – Kashmiri Hindu यांच्यासाठी ‘पनून कश्मीर’ नावाचा स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश तयार करण्याची मागणी)

अर्थसंकल्पाच्या आकडेवारी
  • सन २०१६-१७ मध्ये ३७०५२.५२ कोटी रुपये
  • सन २०१७-१८ मध्ये २५१४१.५१ कोटी रुपये (तब्बल १२ हजार कोटींनी केली घट, आयुक्त अजोय मेहता)
  • सन २०१८-१९ मध्ये २७२५८.०७ कोटी रुपये (तब्बल १९०० कोटींनी वाढवला आकडा, आयुक्त अजोय मेहता)
  • सन २०१९-२० मध्ये ३०६९२.५९ कोटी रुपये (तब्बल ३ हजार कोटींनी वाढवला आकडा, आयुक्त अजोय मेहता)
  • सन २०२०- २०२१मध्ये ३३४४१.०२ कोटी रुपये (तब्बल ३ हजार कोटींनी वाढला आकडा, आयुक्त प्रविणसिंह परदेशी)
  • सन २०२१-२२ मध्ये ३९०३८.८३ कोटी रुपये (तब्बल सहा हजार कोटींनी वाढला आकडा, आयुक्त इक्बालसिंह चहल)
  • सन २०२२-२३ मध्ये ४५,९४९.२१ कोटी रुपये (तब्बल सात हजार कोटींनी वाढला आकडा, आयुक्त इक्बालसिंह चहल)
  • सन २०२३-२४ मध्ये ५२,६१९.०७ कोटी रुपये (तब्बल ६६७० कोटींनी वाढला आकडा, आयुक्त इक्बालसिंह चहल)
  • सन २०२४- २५ मध्ये ५९,९५४.७५ कोटी रुपये (तबब्ल सात हजार कोटींनी वाढला आकडा, आयुकत इक्बालसिंह चहल)
  • सन २०२५-२६ मध्ये ७४,४२७.४१ कोटी रुपये (तब्बल १४ हजार कोटींनी वाढला आकडा, आयुक्त डॉ भूषण गगराणी)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.