BMC Budget : मुंबई महापालिकेचे बजेट कोलमडणार,काय आहे कारण जाणून घ्या!

3699
Tansa Water Pipeline : रेसकोर्समधील त्या जुन्या जलवाहिनींचे आयुष्य आणखी ४० वर्षांनी वाढणार
Tansa Water Pipeline : रेसकोर्समधील त्या जुन्या जलवाहिनींचे आयुष्य आणखी ४० वर्षांनी वाढणार
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई 

मुंबई महापालिकेच्या (BMC Budget) आर्थिक स्थितीवरून चिंता व्यक्त केली जात असतानाच प्रत्यक्षात येत्या भविष्यात महापालिकेचा अर्थसंकल्पाच (बजेट) कोलमडण्याची शक्यता आहे. अर्थात महापालिकेच्या आर्थिक स्थितीबाबतचे हे गणित योग्य जुळेल की नाही याबाबत जरी सांगता येत नसले महापालिकेचे बजेट (BMC Budget) कोलमडणार हे मात्र निश्चित झाले आहे. त्याचे कारण म्हणजे महापालिकेच्या बजेटची धुरा सांभाळणारे अनुभवी अधिकारी  हे यंदा नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत.  त्यामुळे अनुभवी अधिकारी नसल्याने ही भीती वर्तवली जात असून  आधीच महापालिका आर्थिक संकटाच्या उंबरठ्यावर उभी आहे, त्यातच त्यातच अनुभवी अधिकारी नसल्याने यंदाच्या अर्थसंकल्पात त्यांची उणीव भासणार आहे.  मात्र, एकाबाजुला विभागाची आणि महापालिकेची गरज लक्षात निवृत्त होणाऱ्या अधिकाऱ्यांची सेवा महापालिकेत विशेष पदे निर्माण करून घेतली जातात, तिथे महापालिकेला अत्यंत गरज असलेल्या या पडवळ यांची निवृतीनंतरची सेवा महापालिकेला (Municipal Corporation) मिळावी म्हणून प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारच्या हालचाली केल्या जात नाही याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. (BMC Budget)

मुंबई महापालिकेचे प्रभारी लेखापाल (वित्त) प्रदीप पडवळ (Pradeep Padwal) हे नियत वयोमानानुसार येत्या एक जून रोजी सेवानिवृत्त होत आहेत. प्रदीप पडवळ (Pradeep Padwal) हे महापालिकेच्या लेखा विभागातील  अत्यंत हुशार अधिकारी म्हणून ओळखले जातात. मागील अनेक दशके महापालिकेच्या अर्थसंकल्प विभागाची धुरा वाहणाऱ्या प्रदीप पडवळ यांच्याकडे लेखापाल (वित्त) या विभागाच्या प्रभारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. लेखा विभागातील सर्वात अनुभवी अधिकारी असलेल्या पडवळ यांचे प्रत्येक खात्यांचे सांकेतांक हे तोंडपाठ असून कोणत्या विकास कामांसाठी कितीची तरतूद तरतूद आहे हे सुद्धा ते चुटकीसरशी सांगू शकतात, अशी त्यांची ख्याती आहे.  (BMC Budget)

(हेही वाचा- Mumbai Local Train: वीकेंडला ‘मेगा हाल’! जम्बो ब्लॉकमुळे बेस्ट प्रशासनाकडून कोणत्या भागांमध्ये अतिरिक्त बसेसची व्यवस्था?)

आज मुंबई महापालिका एक प्रकारे आर्थिक संकटाच्या उंबरठ्यावर उभी असतानाच अशा प्रकारचे हुशार अधिकारी हे सेवानिवृत्त होत असल्याने महापालिकेच्या चिंतेत अधिकच भर पडली जात आहे.  मुंबई महापालिकेत पडवळ हे सेवानिवृत्त होत असले तरी त्यांची या आर्थिक संकटाच्या काळात अत्यंत आवश्यकता आहे. परंतु अशा संकटकाळी ते सेवानिवृत्त होत असताना महापालिका प्रशासनाकडून त्यांची मदत मिळावी म्हणून विशेष कार्य अधिकारी किंवा त्यांच्यासाठी विशेष पद निर्माण करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा प्रयत्न केला जात नाही. (BMC Budget)

मागील काही महिन्यांपूर्वी मुंबई महापालिकेने आवश्यकता नसतानाही उल्हास महाले यांना सेवा निवृत्तीनंतर पुन्हा त्यांच्या त्याच उपायुक्त (पायाभूत सुविधा) या पदावर कंत्राटी तत्वावर सामावून घेतले. महाले यांच्या निवृतीमुळे महापालिकेचे कोणतेही नुकसान होणार नव्हते, पण त्यांना त्याच पदावर कंत्राटी तत्वावर सामावून घेण्यासाठी प्रशासनाने जीवाची बाजू लावली, तसा प्रयत्न आज महापालिका आर्थिक संकटात असताना पडवळ यांची सेवा निवृतीनंतरही महापालिकेला सेवा मिळावी म्हणून प्रयत्न केले जात नाही. विशेष म्हणजे पडवळ यांची पुढील दोन ते तीन वर्षे मदत घेऊन विद्यमान अर्थसंकल्प विभागाला योग्यप्रकारे मार्गदर्शन करून त्यांच्याकडून या अर्थसंकल्पाची मांडणी करून घेण्याइतपत सक्षम बनवणे आवश्यक आहे. आतापर्यंत प्रदीप पडवळ  सेवेत असल्याने त्यांच्या नेतृत्त्वाखाली या विभागातील कर्मचारी हे बिनधास्त राहून काम करत होते. परंतु पडवळ यांच्या सेवा निवृत्तीनंतर यापुढे या विभागातील अधिकाऱ्यांना स्वतःच्या अनुभवाच्या जोरावर बजेट बनवावे लागणार आहे. मात्र, हे बजेट बनवताना त्यात काही चुका किंवा त्रुटी असल्यास ते तपासण्यासाठी तसेच या विभागाला मार्गदर्शन करण्यासाठी पडवळ यांची नितांत गरज आहे.  (BMC Budget)

(हेही वाचा- Donald Trump यांच्या अडचणी वाढल्या! ३४ प्रकरणात दोषी, तरीही निवडणूक लढवणार ?)

त्यामुळे या विभागाला पडवळ यांचे मार्गदर्शन लाभल्यास हा विभाग अधिक सक्षम बनू शकतो. कारण आज लेखा विभागांतील या अर्थसंकल्प विभागांमध्ये काम करण्यास कुणीही अधिकारी तयार नसतो. त्यामुळे या विभागातील अधिकाऱ्यांना केवळ तटस्थ राहून मार्गदर्शन करण्याची आणि अधिकाऱ्यांनी केलेले काम योग्यप्रकारे केले किंवा नाही याची तपासणी करण्यासाठी आजच्या घडीला पडवळ यांच्यासारख्या अभ्यासू, अनुभवी अधिकाऱ्यांची महापालिकेला गरज आहे,असे खुद्द कर्मचाऱ्यांचेही म्हणणे आहे. (BMC Budget)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.