BMC CFC Center :महापालिकेच्या नागरी सुविधा केंद्रात आता टोकन प्रणाली, जी दक्षिण विभागांत प्रथम सुरुवात

480
BMC CFC Center :महापालिकेच्या नागरी सुविधा केंद्रात आता टोकन प्रणाली, जी दक्षिण विभागांत प्रथम सुरुवात
BMC CFC Center :महापालिकेच्या नागरी सुविधा केंद्रात आता टोकन प्रणाली, जी दक्षिण विभागांत प्रथम सुरुवात
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई 
मुंबई महापालिका कार्यालयांमध्ये नागरी सुविधा केंद्रात, नागरिकांना त्यांची कामे वेळेत लवकरात लवकर करण्याकरिता रांग लावण्याबाबतची नविन प्रणाली विकसित करण्यात आली आहे. परंतु या रांगेत किती वेळ लागेल याची कल्पना नसल्याने अनेकांना उभे राहावे लागते. यावर उपाय म्हणून बँकेतील टोकन पद्धतीच्या धर्तीवर या नागरी  सुविधा केंद्रात टोकन पद्धतीच्या वापर केला जात आहे. प्रायोगिक तत्त्वावर याची पहिली सुरुवात जी दक्षिण विभाग कार्यालयापासून होत आहे. जी दक्षिण विभागाच्या सहायक आयुक्त मृदुला अंडे यांच्या पुढाकाराने ही पहिली प्रणाली सुरू झाली असून याचा लाभ आता नागरी सुविधा केंद्रात येणाऱ्या नागरीकांना होत आहे. या प्रणाली मुळे नागरिकांची नंबर लावून उभे राहण्याचा त्रास बराच कमी झाला आहे. (BMC CFC Center)
नागरी सुविधा केंद्रात मालमत्ता कर, जलकर, जन्म व मृत्यू दाखला व विविध चलनाचा भरणा करण्यासाठी तसेच  इतर कामासाठी  नागरिक येत असतात.  या केंद्रात नागरीकांना त्यांच्या देयकाची भरणा करण्याकरिता रांगेत उभे राहावे लागते. परंतु रांगेत  गर्दी आहे म्हणून इतर  कामे आटोपून घ्यावी असा जरी विचार सोडून निघून गेले तरी त्यांचा रांगेतील नंबर जातो. त्यामुळे रांगेत उभे राहण्याशिवाय पर्याय नसतो. त्यामुळे आपला नंबर येई पर्यंत रांगेतच उभे राहावे लागते. (BMC CFC Center)
त्यामुळे नागरीकांना बराच वेळ रांगेत ताटकळत उभे रहायला लागू नये तसेच नागरीकांचा वेळ वाचावा याकरीता जी/दक्षिण विभागाकडून रांगेचे नियमन करण्याकरिता टोकण प्रणालीचा अवलंब करण्यात आला आहे. याची प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्यात आली असून प्रत्येक नागरिकाला टोकन क्रमांक दिल्यानंतर डिजिटल बोर्ड वर तो नंबर प्रदर्शित झाल्यानंतर संबंधित नागरिकाला खिडकीवर जावून आपले कागदोपत्री सोपस्कार करून तथा देयकाची रक्कम भरता येते. या टोकन पद्धत प्रणाली मुळे नागरीकांना नागरी सुविधा केंद्रात अडकून न पडता इतर बाकीची कामे उरकून घेता येत असल्याने नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. जी दक्षिण विभाग कार्यालयातील नागरी सुविधा केंद्रात टोकन पद्धतीचा वापर करण्यात येत असतानाच स्तनदा मातांची विशेष काळजी घेतली जात आहे. स्तनदा मातांना स्तनपानाकरिता हिरकणी कक्षही स्थापन करण्यात आला आहे. (BMC CFC Center)
महापालिका आयुक्त डॉ भूषण गगराणी यांनी काही दिवसांपूर्वी के पश्चिम विभागातील नागरी सुविधा केंद्रात भेट देत येथील कार्य प्रणालीचे कौतुक केले होते. त्यानंतर ऑक्टोबर महिन्यात आयुक्तांनी, नागरिकांना विविध सेवा-सुविधा पुरविणे, हे महानगरपालिकेचे आद्यकर्तव्य असूनउप आयुक्‍त, सहायक आयुक्‍त यांनी नागरी सुविधा केंद्राला आकस्मिक भेट द्यावी,असे निर्देश दिले होते. (BMC CFC Center)
नाग‍री सुविधा केंद्रात नागरिकांसाठी पुरेशी आसन व्‍यवस्‍था, पिण्‍याचे पाणी, अडथळाविरहीत वावरता येईल अशी जागा इत्‍यादी उपलब्‍ध करून दिले पाहिजे. इंटरनेट, सर्व्‍हर, सिस्टिम सुरळीत सुरू राहिल, याची दक्षता घ्‍यावी. एकूणच, नागरिकांना हेलपाटे मारावे लागू नयेत. कमी वेळेत, कमी खर्चात नागरी सुविधा उपलब्‍ध करून देण्‍याची जबाबदारी महानगरपालिकेची असल्याचे  सांगत परिमंडळ उप आयुक्‍तांनी महिन्यातून एकदा आणि सहायक आयुक्‍तांनी महिन्‍यातून दोनदा नागरी सुविधा केंद्राला भेट देऊन कामकाजाचा आढावा घ्‍यावा, नागरिकांशी संवाद साधून त्‍यांना भेडसावणा-या अडीअडचणींचे निराकरण करावे, असे निर्देशही महानगरपालिका आयुक्‍त भूषण गगराणी यांनी  दिले होते. (BMC CFC Center)
हेही पहा- 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.