BMC : महापालिकेच्या चाणाक्ष अधिकाऱ्याने वाचवले १७ कोटी रुपये

2855
BMC : महापालिकेच्या चाणाक्ष अधिकाऱ्याने वाचवले १७ कोटी रुपये
  • सचिन धानजी, मुंबई

मुंबई किनारी रस्ते प्रकल्पांतर्गत येणाऱ्या वर्सोवा ते दहिसर मार्गाच्या बांधकामातील चारकोप ते गोराई आणि गोराई ते दहिसर या दरम्यानच्या पुलांच्या बांधकामासाठी नेमण्यात येणाऱ्या प्रकल्प व्यवस्थापन व सल्लागार सेवेसाठी जास्त पैसे देण्याचा प्रयत्न महापालिकेच्या लेखा विभागामुळे फसला गेला. प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार सेवेसाठी अधिक पैसे मोजले जात असल्याची बाब उपायुक्त (वित्त) यांच्या चाणाक्ष नजरेत आल्यानंतर त्यांनी ही बाब संबंधित विभागाच्या निदर्शनास आणून देत नेमके त्यावरच बोट ठेवले. त्यामुळे अखेर त्यासाठी निश्चित केलेल्या सल्लगार शुल्कातील रक्कम कमी करण्यात आली आणि यामुळे महापालिकेचे तब्बल १७ कोटी रुपये वाचले गेले. (BMC)

(हेही वाचा – Maharashtra Politics : भाजपा मुख्यमंत्री पदाबाबत धक्कातंत्र देण्याच्या तयारीत?)

मुंबई महापालिकेच्यावतीने वर्सोवापासून पुढे गोरेगाव, मालाड, चारकोप, दहिसर भाईंदर दरम्यान मुंबई किनारा रस्ते प्रकल्प (उत्तर) हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पांतर्गत चारकोप खाडी ते गोराई आणि गोराई ते दहिसर आंतरबदल या कामासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराची नेमणूक करण्यात आला. चारकोप खाडी ते गोराई या कामासाठी एल अँड टी कंपनीची निवड करण्यात आली असून या कामाला जून २०२४ पासून सुरुवात झाली आहे. (BMC)

(हेही वाचा – MHADA : कोंकण मंडळाच्या २२६४ घरांसाठी आतापर्यंत सुमारे १२ हजार अर्ज)

तर गोराई ते दहिसर या पुलाच्या बांधकामासाठी ऍपको इन्फ्राटेक कंपनीची निवड करण्यात आली असून याचे कामही मे २०२४ पासून सुरु झाले आहे. या दोन्ही भागातील उन्नत मार्गाच्या बांधकामासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून निवड करण्यासाठी या प्रकल्पासाठी नेमलेल्या सर्वसाधारण सल्लागार मार्फत निविदा मागवण्यात आली होती. यामध्ये सर्वसाधरण सल्लागाराने या दोन्ही पुलांच्या बांधकामासाठी सल्लागार सेवा म्हणून १७०.०४ कोटी रुपयांची अंदाजित रक्कम निश्चित केली होती. यामध्ये निप्पॉन कोई इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनी अंदाजित दरापेक्षा ६.६९ टक्के अधिक म्हणजे १८१.४२ टक्के एवढ्या रकमेची बोली लावली. याबाबत पूल विभागाने कमी बोली लावलेल्या पात्र कंपनीची निवड करून पुढील मान्यतेसाठी आपला प्रस्ताव पाठवला होता. मात्र, याबाबतचा प्रस्ताव पूल विभगााकडून लेखापाल (वित्त) विभागाला सादर झाल्यानंतर मंजुरीसाठी उपायुक्त (वित्त) यांच्याकडे आला असता, त्यांनी सल्लागार शुल्काबाबतचे निकष समजून घेतले. त्यानुसार, कोस्टल रोड उत्तर प्रकल्पातील या दोन उड्डाणपुलांच्या बांधकामातील सल्लागार शुल्कासाठी अधिक पैसे दिले जात असल्याची बाब समोर आली आहे. (BMC)

(हेही वाचा – Delhi Assembly Election : आता लक्ष्य दिल्ली विधानसभा निवडणूक)

गोरेगाव चित्रनगरी ते मुलुंड खिंडीपाडा (अमर नगर) येथे दुहेरी बोगद्याचे व फिल्मसिटीमधील पेटी बोगद्याची मार्किंग, बांधकाम, प्रचालन तसेच यांत्रिक विद्युत व इतर संलग्नित कामासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार निवडीबाबत प्रकल्प सेवा शुल्क मर्यादा ही प्रकल्पांच्या एकूण खर्चाच्या २.९९ टक्के एवढा असावा असे कळवण्यात आले. त्यामुळे कोस्टल रोड (उत्तर) मधील दोन उन्नत मार्गाच्या बांधकामासाठी नियुक्त केलेल्या निप्पॉन कोई इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला या निकषानुसार एकूण प्रकल्प खर्चाच्या २.९९ टक्के एवढा म्हणजे १६४.३२ कोटी रुपये एवढे सल्लागार शुल्क देण्याची शिफारस उपायुक्त (वित्त) प्रशांत गायकवाड यांनी केली. (BMC)

(हेही वाचा – MHADA : म्हाडा कोकण मंडळाची सुमारे १४ हजार घरे विक्रीअभावी पडून; सुमारे ३ हजारांचा निधी पडला अडकून)

त्याअनुषंगाने निप्पॉन कोई इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने बोली लावलेल्या १८१.४२ टक्के एवढया रकमेच्या तुलनेत १६४.३२ कोटी रुपयांमध्ये काम करण्यास संमती दर्शवली. त्यामुळे वित्त विभागाच्या अधिकाऱ्यांच्या चाणाक्ष नजरेमुळे महापालिकेचे सल्लागार सेवेपोटी दिले जाणारे १७ कोटी रुपये वाचले गेले. या सल्लागार कंपनीने केनिया राष्ट्री महामार्ग प्राधिकरणांतर्गत केलेल्या जाणार१या मोम्बासा गेट ब्रिज कंस्ट्रक्शन प्रकल्पासाठी केबल स्टेड पुलासाठी सल्लागार सेवा दिली होती. तसेच फिलीपिन्समधील केबल स्टेड पूल, पेरुमधील महामार्ग तथा उन्नत मार्ग, हैद्राबादमधील महामार्ग तथा उन्नत मार्गासाठी सल्लागार सेवा दिली आहे. (BMC)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.