BMC : मुंबईतील उद्यान, मैदानांच्या देखभाल कंत्राटात संगनमत? महापालिका प्रशासन आर्थिक नुकसान टाळण्यासाठी हे करेल का?

381
BMC : मुंबईतील उद्यान, मैदानांच्या देखभाल कंत्राटात संगनमत? महापालिका प्रशासन आर्थिक नुकसान टाळण्यासाठी हे करेल का?
BMC : मुंबईतील उद्यान, मैदानांच्या देखभाल कंत्राटात संगनमत? महापालिका प्रशासन आर्थिक नुकसान टाळण्यासाठी हे करेल का?
विशेष प्रतिनिधी ,मुंबई
मुंबईतील उद्यान, मैदान आणि मनोरंजन मैदानांची वार्षिक देखभालीच्या कामांसाठी मागवलेल्या निविदा पुन्हा एकदा वादात अडकण्याची शक्यता आहे. महापालिकेच्यावतीने जिथे २४ विभाग कार्यालयांच्या हद्दींमध्ये स्वतंत्र कंत्राटदारांची निविदा काढली जाते तिथे तीन परिमंडळांसाठी स्वतंत्र निविदा काढली आणि उर्वरीत वॉर्डांसाठी प्रत्येकी कंत्राटदारांची निवड करण्यासाठी  एकूण १६ निविदा काढल्या. अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे (Additional Commissioner Ashwini Bhide) असताना त्यांनी उद्यान विभागाच्या देखभालीच्या निविदांमध्ये कंत्राटदारांनी संगनमत करून काम मिळवल्याचे निदर्शनास आल्यावर सर्वांची अनामत रक्कम जप्त करून नव्याने निविदा मागवली होती, तशीच वेळ पुन्हा एकदा महापालिकेवर आली आहे. या निविदेत परिमंडळांसाठी मागवलेल्या निविदांमध्ये संगनमत करून कामे मिळवल्याची दाट शंका असून प्रशासनाने आधीच परिमंडळ निहाय कामे देण्याचा घेतलेला निर्णय आणि त्यातच या कामांमध्ये वॉर्डांच्या कामांपैकी परिमंडळांमधील कंत्राटदारांनी (contractor) लावलेली बोली याचा विचार करता या कामांची चौकशी करून या निविदाच रद्द करण्याची वेळ आली आहे. (BMC)
मुंबईतील उद्यान, मैदान, क्रीडांगण, मनोरंजन मैदान यांची वार्षिक देखभाल करण्यासाठी यापूर्वी नेमलेल्या कंत्राटदारांची मुदत संपुष्टात येत असल्याने महापालिकेच्यावतीने सुमारे २०० कोटी रुपयांच्या कामांच्या निविदा (Tender for works) निमंत्रित केल्या. परंतु आजवर २४ वॉर्डकरता २३ कंत्राटदारांची निवड केलेली जात असताना उद्यान विभागातील अधिकाऱ्यांनी काही ठराविक कंपन्यांना डोळ्यासमोर ठेवून तीन परिमंडळांसाठी स्वतंत्र निविदा काढल्या आणि उर्वरीत वॉर्डांसाठी स्वतंत्र निविदा काढली. यापूर्वी परिमंडळ एक मधील ए, बी, सी आणि ई यांच्यासाठी स्वतंत्र निविदा काढली जात होती, परंतु याठिकाणी वॉर्डांसाठी स्वतंत्र कंत्राटदाराची निविदा न मागवता सर्व वॉर्डांसाठी एक म्हणजे परिमंडळ एक एकच निविदा काढली, तसेच एच पूर्व, एच पश्चिम आणि के पूर्व या परिमंडळ ३,  एल, एम पूर्व अणि एम पश्चिम या परिमंडळ ५ मधील वॉर्डांसाठी स्वतंत्र निविदा न काढता परिमंडळ निहाय कंत्राटदारांची निवड करण्यासाठी निविदा काढली.
याच्या निविदा चार दिवसांपूर्वी उघडण्यात आल्या. त्यात प्रत्येक वॉर्डमध्ये कंत्राटदारांनी महापालिकेच्या अंदाजित दरापेक्षा २ ४ ते ३८ टक्के कमी दराने बोली लावल असल्याचे दिसून आहे, तर परिमंडळांसाठीच्या निविदांमध्ये कंत्राटदारांनी १२ ते १६ टक्के कमी दराने बोली लावली. त्यामुळे जिथे वॉर्डांमध्ये ३८ टक्के कमी दरात काम करायला कंत्राट कंपन्या तयार असताना, परिमंडळांसाठीच्या कामांमध्ये  १२ ते १६ टक्के कमीची बोली लावली. यामुळे महापालिकेचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान संभवते आहे. (BMC)
परिमंडळ १, ३ आणि ५मधील या निविदांमध्येच प्रत्येकी ३ कंपन्यांनी सहभाग नोंदवला आहे आणि वॉर्डांच्या निविदांमध्ये प्रत्येकी पाच ते सहा कंपन्यांनी सहभाग नोंदवला आहे. त्यामुळे परिमंडळांसह के पश्चिम विभागांच्या निविदांमध्येच कंत्राटदारांनी संगनमत करून काम मिळवल्याची शंका उपस्थित होत आहे.
त्यामुळे महापालिकेच्या उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांनी परिमंडळांसाठी मागवलेल्या निविदेतील पात्र कंत्राटदारांशी वाटाघाटी करून वॉर्डांसाठी पात्र ठरलेल्या कंपन्यांनी लावलेल्या दरामध्ये काम करायला लावल्यास महापालिकेचे संभाव्य नुकसान टाळता येवू शकते. परंतु याठिकाणी संगनमत झाल्याची शंका अधिक दिसून असल्याने महापालिका प्रशासनाने परिमंडळ निहाय निविदा काढण्याच्या कामांची चौकशी करून संगनमत करून मिळवलेल्या कामांचीही चौकशी केल्यास सत्य समोर येईल आणि महापालिकेचे संभाव्य आर्थिक नुकसान टाळता येवू शकणारे आहे. त्यामुळे या कामांची ही चौकशी करेपर्यंत परिमंडळांच्या कामांना स्थगिती दिली जावी तसेच यात या कंपन्या दोषी आढळून आल्यास त्यांची अनामत रक्कम जप्त करून संबंधित कंपन्यांना काळ्या यादीत टाकण्याची तरतूदही महापालिकेच्या अधिनियमांमध्ये स्पष्ट आहे.

लोकायुक्त यांच्याकडे करणार तक्रार

माजी विरोधी पक्षनेते रवी राजा (Ex Leader of Opposition Ravi Raja) यांनी यावर प्रतिक्रिया देताना, जर विभाग निहाय या कामांसाठी कंत्राट कंपन्या नेमल्या जात असताना काही विभागांचे एकत्र परिमंडळ निहाय निविदा का काढल्या असा सवाल करून कुठे तरी कंत्राटदारांच्या  घशात पैसे घालण्याचा प्रयत्न आहे. वॉर्डात जर ३८ टक्के कमी दरात बोली लावून काम मिळवलेले असताना परिमंडळ निहाय कंत्राटदार १२ ते १६ टक्के कमी दराने काम दिल्यास महापालिकेचे नुकसान होणार आहे. यात पुर्णपणे कंत्राट कंपन्यांचे संगनमत असल्याचे दिसून येत आहे. याची चौकशी व्हायला हवी. जर ही चौकशी करून हे कंत्राट रद्द न झाल्यास आपण लोकायुक्त यांच्याकडे तक्रार करणार असे त्यांनी म्हटले आहे.

संगनमत झाल्याचा संशय काय येतो?

परिमंडळ १, ३, ५ आणि के पश्चिम या चार निविंदांमध्ये प्रत्येकी चार कंपन्यांनी सहभाग नोंदवला. या चारही कामांमध्ये सहभागी होणाऱ्या कंपन्यांमध्ये ठराविक कंपन्यांनीच सहभाग नोंदवला. त्यामुळे ठराविक कंपनीला काम मिळवण्यासाठी आणि स्पर्धात्मक निविदा करण्यासाठी हा सहभाग नोंदवला गेला असे स्पष्ट दिसून येत आहे. तसेच केवळ सहभागी होण्यासाठी या कंपन्यांनी निविदेत भाग घेतला असेही स्पष्ट दिसून येत आहे. त्यामुळे या चारही कामांची चौकशी केल्यास सत्य समोर येवू शकते, असे बोलले जात आहे. विशेष म्हणजे या चारही निविदांमध्ये पात्र ठरलेल्या कंपनीपेक्षा अधिक कुणीही कमी दराने बोली न लावता त्यापेक्षा कमीच बोली लावली आहे, जेणेकरून पात्र ठरवल्या जाणाऱ्या कंपनीची निवड होईल आणि स्पर्धात्मक निविदाही होईल, असा प्रयत्न असल्याचे दिसून येत आहे.

नियुक्त कंपनी, कंत्राट रक्कम आणि कंसात किती टक्के कमी बोली लावून मिळवले काम…

परिमंडळ १: आर शाह सिव्हिल इंजिनिअरिंग: १०.३२ कोटी(-१२.६०० टक्के)
परिमंडळ ३: हिरावती एंटरप्राइजेस, २.३० कोटी(-१५ .३०० टक्के)
के पश्चिम: कमला सिविल इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड, २०.०९ कोटी(-१६.७५० टक्के)
परिमंडळ पाच :डी बी इन्फ्राटेक, २०.३५ कोटी(१२.५४० टक्के)
परिमंडळ १ (ए,बी,सी ई, डी):
आर शाह सिव्हिल इंजिनिअरिंग: १०.३२ कोटी(-१२.६०० टक्के)
एफ उत्तर: सूर्या उजस कन्ट्रक्शन: ४.८९ कोटी (-३२.५००)
एफ दक्षिण: रिद्धी एंटरप्राइजेस, ३.३४ कोटी(-३८.९९० टक्के)
जी दक्षिण: स्वस्तिक कंट्रक्शन: २.३३कोटी(-३३.९३० टक्के)
जी उत्तर:  श्री एंटरप्राइजेस, १.८४ कोटी(-३७.१९० टक्के)
परिमंडळ ३ (एच/ पूर्व, एच/पश्चिम , के पूर्व)
 हिरावती एंटरप्राइजेस,२.३० कोटी(-१५ .३०० टक्के)
के पश्चिम: कमला सिविल इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड, २०.०९ कोटी(-१६.७५० टक्के)
पी दक्षिण : बिलिव्ह इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड:७.२४ कोटी (-३२.००० टक्के)
पी उत्तर: बिलिव्ह इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड:७.२४ कोटी (-३३.४०० टक्के)
परिमंडळ पाच :,(एल, एम/ पूर्व, एम/पश्चिम)
डी बी इन्फ्राटेक, २०.३५ कोटी(१२.५४० टक्के)
एस विभाग :राठोड ब्रदर्स,७.४० कोटी(-२८.५१० टक्के)
एन विभाग: विरल असोसिएटेस,४.३७ कोटी (-३०.९००टक्के)
 टी विभाग: आर.एस कन्ट्रक्शन, ६.३६ कोटी( २८.०६० टक्के)
आर मध्य विभाग: इस्बी इंटरप्रायजेस, ८. ७२ कोटी (-३५ टक्के)
आर दक्षिण: आर शाह सिविल इंजिनिअरिंग,९.३९ कोटी(-२८.५४० टक्के)
आर दक्षिण: वरुण कन्ट्रक्शन, ६.३१कोटी (-३५.१९० टक्के)

हेही वाचा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.